MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home लॅपटॉप्स

ॲपलचा नवीन मॅकबुक प्रो सादर : प्रथमच टचस्क्रीन डिस्प्लेसह!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 29, 2026
in लॅपटॉप्स
Apple MacBook Pro Touch Screen Display

ॲपलने नवीन MacBook Pro सादर केले असून यामध्ये पहिल्यांदाच मॅकसाठी टचस्क्रीनचा समावेश करण्यात आला आहे. PROLED XDR डिस्प्ले, M5 Pro आणि M5 Max चिप्स, Dynamic Island आणि २४ तासांपर्यंत बॅटरी लाइफ ही या नव्या लॅपटॉपची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. भारतात या मॅकबुक प्रोची किंमत ३,४९,००० रुपये पासून सुरू आहे.

ॲपल ने २८ ऑक्टोबर २०२६ रोजी आपल्या मॅकबुक प्रो मालिकेतील नवीन मॉडेल्स सादर केली आहेत. बिझनेस युजर्स, व्हिडिओ एडिटर्स, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, 3D आर्टिस्ट आणि AI क्षेत्रात काम करणाऱ्यांना लक्षात घेऊन हे लॅपटॉप तयार करण्यात आले आहेत. नवीन मॅकबुक प्रो मध्ये डिस्प्लेपासून ते प्रोसेसर आणि वापरण्याच्या पद्धतीपर्यंत अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

MacBook Pro मध्ये पहिल्यांदाच टचस्क्रीन

नवीन मॅकबुक प्रोचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा टचस्क्रीन डिस्प्ले. ॲपल ने पहिल्यांदाच मॅकबुक प्रोमध्ये थेट स्क्रीनवर स्पर्श करून काम करण्याची सुविधा दिली आहे. वापरकर्त्यांना स्क्रीनवर स्क्रोल करणे, फोटो झूम करणे, 3D मॉडेल फिरवणे शक्य होईल. क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही सुविधा विशेष उपयोगी ठरू शकते.

याशिवाय ॲपलने त्यांच्या पूर्वीच्या लॅपटॉप्समध्ये मागच्या बाजूला Glow करणारा लोगो आता या नव्या मॅकबुक प्रोमध्ये परत आणला आहे!

PROLED XDR डिस्प्लेची प्रमुख वैशिष्ट्ये

ॲपल ने या डिस्प्लेसाठी PROLED XDR हे नाव वापरले आहे. यामध्ये Tandem OLED तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून उत्तम कॉन्ट्रास्ट, अधिक ब्राइटनेस आणि अचूक रंग दाखवण्यावर भर देण्यात आला आहे. नवीन मॅकबुक प्रो दोन स्क्रीन आकारांमध्ये उपलब्ध असेल. १४ इंच मॉडेलमध्ये १४.२ इंचाचा डिस्प्ले तर १६ इंच मॉडेलमध्ये १६.३ इंचाचा डिस्प्ले मिळतो.

डिस्प्लेची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

  • 2,000 nits ब्राइटनेस: HDR आणि SDR कंटेंटसाठी 2,000 nits पर्यंत पीक ब्राइटनेस.
  • 10,000,000:1 कॉन्ट्रास्ट रेशो: गडद भागांमध्ये अधिक खोल काळा रंग आणि उजळ भागांमध्ये स्पष्ट तपशील.
  • 120Hz रिफ्रेश रेट: स्क्रीनवरील हालचाली अधिक स्मूथ दिसण्यासाठी व्हेरिएबल रिफ्रेश रेट.
  • P3 आणि Adobe RGB कलर सपोर्ट: फोटो एडिटिंग, व्हिडिओ प्रॉडक्शन आणि रंगांच्या अचूकतेला महत्त्व देणाऱ्या कामांसाठी विस्तृत कलर गॅमट.
  • विशेषतः फोटो एडिटिंग, कलर ग्रेडिंग आणि HDR व्हिडिओ तयार करणाऱ्या व्यावसायिकांसाठी हा डिस्प्ले महत्त्वाचा अपग्रेड ठरू शकतो.

M5 Pro आणि M5 Max चिप्समुळे अधिक परफॉर्मन्स

नवीन मॅकबुक प्रोमध्ये ॲपल च्या M5 Pro आणि M5 Max या चिप्स देण्यात आल्या आहेत. जास्त प्रोसेसिंग पॉवर आणि ग्राफिक्स परफॉर्मन्सची गरज असणाऱ्या वापरकर्त्यांसाठी या चिप्स तयार करण्यात आल्या आहेत. M5 Pro चिपसह कोड कंपाइल करणे, मोठे सॉफ्टवेअर प्रोजेक्ट्स हाताळणे आणि एकाच वेळी अनेक व्हिडिओ स्ट्रीम एडिट करणे यांसारखी कामे करता येतील. M5 Max चिप अधिक प्रगत ग्राफिक्स आणि कॉम्प्युटिंग क्षमतेची गरज असणाऱ्या 3D आर्टिस्ट, AI डेव्हलपर्स आणि फिल्म कम्पोझर्ससाठी उपयुक्त ठरेल.

कॉन्फिगरेशननुसार नवीन MacBook Pro मध्ये 128GB पर्यंत Unified Memory आणि 16TB पर्यंत स्टोरेज निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. ॲपल ने AI संबंधित कामगिरीवरही भर दिला आहे. GPU मधील Neural Accelerators आणि Neural Engine च्या मदतीने डिव्हाइसवरच AI मॉडेल्स चालवणे आणि विविध AI टास्क हाताळणे शक्य होईल. यामुळे काही कामांसाठी क्लाउड सर्व्हरवर अवलंबून राहण्याची गरज कमी होऊ शकते.

MacBook मध्येही Dynamic Island

iPhone मध्ये लोकप्रिय असलेले Dynamic Island आता मॅकबुक प्रोमध्येही आणण्यात आले आहे. Mac वरील Dynamic Island मधून Spotlight सर्च, Live Activities आणि Siri AI यांसारख्या सुविधांपर्यंत पोहोचता येईल. यामधून रिअल-टाइम अपडेट्स पाहणे, संगीत नियंत्रित करणे, AirDrop स्वीकारणे आणि Siri AI शी संवाद साधणे यांसारखी कामे करता येतील. ॲपलच्या macOS 27 या ऑपरेटिंग सिस्टीमसह नवीन मॅकबुक प्रोमध्ये ॲपल Intelligence आणि Siri AI ची वैशिष्ट्ये उपलब्ध होतील.

नवीन मॉडेल्सची जाडी आणि वजनही कमी करण्यात आले आहे. १४ इंच मॉडेलचे वजन सुमारे १.३८ किलो तर १६ इंच मॉडेलचे वजन सुमारे १.८२ किलो आहे.

लॅपटॉपमध्ये सहा स्पीकर्सची सुधारित साउंड सिस्टीम देण्यात आली आहे. व्हिडिओ कॉलसाठी 12MP Center Stage कॅमेरा आणि स्टुडिओ-गुणवत्तेचे मायक्रोफोनही देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी Thunderbolt 5, HDMI, MagSafe 3, SDXC कार्ड स्लॉट, Wi-Fi 7 आणि Bluetooth 6 यांचा समावेश आहे. M5 Pro मॉडेलमध्ये तीन डिस्प्ले तर M5 Max मॉडेलमध्ये चार डिस्प्ले जोडता येतात.

भारतातील MacBook Pro ची किंमत

  • १४ इंच MacBook Pro, M5 Pro ₹3,49,900
  • १६ इंच MacBook Pro, M5 Pro ₹4,09,900
  • १४ इंच MacBook Pro, M5 Max ₹5,49,900
  • १६ इंच MacBook Pro, M5 Max ₹5,89,900

ॲपलच्या घोषणेनुसार, नवीन मॅकबुक प्रोसाठी प्री-ऑर्डर २८ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. ग्राहकांना आणि अधिकृत विक्रेत्यांकडे हे लॅपटॉप ९ नोव्हेंबर २०२६ पासून उपलब्ध होण्यास सुरुवात होईल.

या मॅकबुकसोबत ॲपलने M6 प्रोसेसर असलेला २४ इंची iMac (किंमत १४७९००), OLED डिस्प्ले असलेला iPad mini (किंमत ८२९००) सुद्धा सादर केले आहेत.

Tags: AppleLaptopsMacBookMacbook Pro
ShareTweetSend
Previous Post

टेस्लाची Roadster कार चक्क कोलांटी उडी मारून काही सेकंद उडू शकते!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Pro Touch Screen Display

ॲपलचा नवीन मॅकबुक प्रो सादर : प्रथमच टचस्क्रीन डिस्प्लेसह!

October 29, 2026
टेस्लाची Roadster कार चक्क कोलांटी उडी मारून काही सेकंद उडू शकते!

टेस्लाची Roadster कार चक्क कोलांटी उडी मारून काही सेकंद उडू शकते!

October 16, 2026
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
टेस्लाची Roadster कार चक्क कोलांटी उडी मारून काही सेकंद उडू शकते!

टेस्लाची Roadster कार चक्क कोलांटी उडी मारून काही सेकंद उडू शकते!

October 16, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Pro Touch Screen Display

ॲपलचा नवीन मॅकबुक प्रो सादर : प्रथमच टचस्क्रीन डिस्प्लेसह!

October 29, 2026
टेस्लाची Roadster कार चक्क कोलांटी उडी मारून काही सेकंद उडू शकते!

टेस्लाची Roadster कार चक्क कोलांटी उडी मारून काही सेकंद उडू शकते!

October 16, 2026

ॲपलचा नवीन मॅकबुक प्रो सादर : प्रथमच टचस्क्रीन डिस्प्लेसह!

टेस्लाची Roadster कार चक्क कोलांटी उडी मारून काही सेकंद उडू शकते!

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech