MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

आता युट्युबचाच ‘रिवाइंड २०१८’ आहे सर्वाधिक ‘डिसलाईक्स’ असलेला व्हिडिओ!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 13, 2018
in इंटरनेट

दरवर्षी चर्चेत असलेल्या युट्युबर्सना घेऊन वर्षाअखेरीस एक खास व्हिडिओ युट्युब स्वतः बनवतं…! मात्र यावेळच्या व्हिडीओला त्यांच्या अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद लाभलेला नसून उलट आता त्यांच्याच प्लॅटफॉर्मवर त्यांचाच व्हिडीओ सर्वाधिक डिसलाईक असलेला व्हिडीओ बनला आहे!

रिवाइंड २०१८ या व्हिडिओला तब्बल १ कोटी यूजर्सनी डिसलाईक (नापसंती) दर्शवली आहे! 

आजवर सर्वाधिक नापसंती असलेला व्हिडीओ जस्टिन बिबर या गायकाचा ‘बेबी’ नावाच्या गाण्याचा २०१० मध्ये आलेला व्हिडीओ होता. आता आठ वर्षांनी या नको असलेल्या विक्रमाला मागे टाकत युट्युब रिवाइंड २०१८ ने आघाडी घेतली आहे आणि ते सुद्धा अवघ्या आठ दिवसातच…! गेल्या काही वर्षांपासून हे डिसलाईकचं प्रमाण वाढत होतंच मात्र यावेळी बरेच यूजर्स फारच नाराज असल्याचं दिसून येत आहे!

ADVERTISEMENT
युट्युब रिवाइंड २०१८ व्हिडीओ

युट्युबच्या क्रिएटर्सकडे लक्ष देण्याऐवजी जाहिरातदारांना खूष करण्याच्या प्रयत्नावर यूजर्स नाराज झाले असून या वर्षात युट्युबवर घडलेल्या बऱ्याच मोठ्या गोष्टींना आणि मोठ्या युट्युबर्सना समाविष्ट न केल्यामुळे थेट डिसलाईक करून निषेध नोंदवण्यास सुरुवात केली आहे. सर्वाधिक सबस्कायबर्स असलेला प्युडिपाय (PewDiePie), शॉन डॉसन, लोगन पॉलच वादग्रस्त प्रकरण, लोगन आणि केएसआय यांच्यातील युद्धाचा (जी सर्वात मोठी पेड सिरीज होती) अनुल्लेख, निंजा नावाच्या गेम स्ट्रीमरचा समावेश (जो खरेतर युट्युबऐवजी ट्विच या दुसऱ्या गेम स्ट्रीम साईट वर प्रसिद्ध आहे), फोर्टनाईटचा अतिरेकी उल्लेख, विल स्मिथ व इतर टीव्ही सेलिब्रिटीजचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसताना केलेला समावेश यामुळे युट्युब त्यांच्या क्रिएटर्स (व्हिडीओ तयार करणारे) व प्रेक्षक यांच्याकडे लक्ष देण्याऐवजी जाहिरातदारांच्या धमक्यांना बळी पडत त्यांच्या मनाप्रमाणे प्लॅटफॉर्म चालत असल्याचं सांगितलं आहे. अनेक युट्युबर्सनीसुद्धा यावर नाराजी व्यक्त करणारे व्हिडीओ टाकत आहे.

युट्युबवर सर्वाधिक ‘डिसलाईक्स’ असलेले व्हिडिओ!

  1. YouTube Rewind 2018: Everyone Controls Rewind
  2. Baby : Justin Bieber featuring Ludacris
  3. It’s Everyday Bro : Jake Paul featuring Team 10
  4. Call of Duty: Infinite Warfare Reveal Trailer
  5. Can this video get 1 million dislikes? : PewDiePie
  6. Despacito : Luis Fonsi featuring Daddy Yankee
  7. Friday : Rebecca Black
  8. How It Is (Wap Bap …) : BibisBeautyPalace
  9. Cortando o Botão do YouTube : Aruan Felix
  10. Masha and the Bear : Recipe for Disaster

मार्कस ब्राऊनली (MKBHD) ने तर स्वतः त्या व्हिडीओमध्ये असूनही यावेळी युट्युबकडून कोणत्या चुका झाल्या यावर प्रकाश टाकला आहे!

Tags: MKBHDYouTubeYouTube RewindYouTubers
Share7TweetSend
Previous Post

गूगल इयर इन सर्च : जगभरात लोकांनी २०१८ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

Next Post

एबीपी माझा डिजिटल महाराष्ट्र कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Ronaldo YouTube Channel

फुटबॉलपटू रोनाल्डोचं यूट्यूब चॅनल : २४ तासात तब्बल २ कोटी सबस्क्रायबर्स!

August 22, 2024
MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

June 2, 2024
YouTube Adblockers

यूट्यूबने ॲडब्लॉकर्सना ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे!

November 1, 2023
नवा व्हिडिओ : यूट्यूब प्रीमियमचा स्वस्त फॅमिली प्लॅन कसा घ्यायचा?

नवा व्हिडिओ : यूट्यूब प्रीमियमचा स्वस्त फॅमिली प्लॅन कसा घ्यायचा?

April 9, 2023
Next Post
एबीपी माझा डिजिटल महाराष्ट्र कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

एबीपी माझा डिजिटल महाराष्ट्र कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Affinity by Canva FREE

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

November 7, 2025
ChatGPT GO Free India

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

November 4, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech