MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Wearables

घड्याळांचा ‘स्मार्ट’ चॉइस (smart watch)

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 16, 2013
in Wearables
घड्याळांचा 'स्मार्ट' चॉइस

(smart watch) घड्याळ म्हणजे सर्वसामान्यांसाठी वेळ बघण्याचे एक साधेसे उपकरण. उच्चभ्रूंसाठी फार-फार तर स्टेटस सिम्बॉल. रोलेक्स, टॉमी हिलफायर, फास्टट्रॅक अशी घड्याळं आजकाल स्टेटस सिम्बॉल समजली जातात. साधारण तीन, चार वर्षांपूर्वी हाताळण्यास सोप्या असलेल्या लहान हँटसेट्सना पसंती दिली जायची. मात्र आजकाल हाताच्या पंजातही मावणार नाहीत, असे स्मार्टफोन आले आहेत. ट्रेन किंवा बसच्या गर्दीत असे भलेमोठे मोबाइल्स काढून त्यावर बोलणे शक्यच होत नाही. बऱ्याचदा बॅटरी संपल्याची अडचणही उदभवते… ही अडचण लक्षात घेत स्मार्टफोन्स बनवणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांनी स्मार्टवॉच बनवण्याची युक्ती केली. सामान्य घड्याळ्यांप्रमाणे ही स्मार्टवॉच वेळ दाखवतातच, मात्र त्या बरोबरच या स्मार्टवॉचमधून तुम्ही तुम्हाला येणारे कॉलही घेऊ शकता. ईमेल, एसएमएस, नोटिफिकेशन्स बघणे यामुळे शक्य होईल. सोनी, सॅमसंग यासारख्या आघाडीच्या कंपनीनी तयार केलेल्या स्मार्टवॉचमध्ये कॅमेरा, मायक्रोफोन, जीपीएस अशी फीचर्स हमखास मिळतात. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या काही स्मार्टवॉचच्या पर्यायांवर ‘मटा’च्या टेक्नो टीममधील वैभव राऊळ यांनी टाकलेला हा दृष्टिक्षेप…

सोनी स्मार्टवॉच २सोनी स्मार्टवॉच २ (sony smartwatch 2) किंमतः १५,००० रुपये स्मार्टवॉचची सुरुवात सोनीने केली होती. आता तर त्यांनी एनएफसी देऊन हे स्मार्टवॉच अपडेट केले आहे. डस्ट आणि वॉटरप्रूफ अशी स्मार्टवॉचपण अँड्रॉइडसाठी तयार करण्यात आली आहेत. पण ही वॉच आयओएसशी कनेक्ट होत नाहीत, हे लक्षात ठेवा. यात १.६ इंच स्क्रीन असून काँल्स, टेक्स्ट, फेसबूक, ईमेल नोटिफिकेशन्स बघण्यासाठी या स्मार्टवाँचचा उपयोग करता येईल. चार्जिंग पूर्ण असेल, तर तीन दिवस हे स्मार्टवॉच वापरता येईल, असा दावा सोनीने केला आहे. 
बलस्थानेः वॉटरप्रूफ, अॅप्सचा खजाना आणि तुलनेत कमी किंमत. 
दुबळ्याबाजूः यातील टेक्स्टचा आकार खूपच लहान असल्याने डोळ्यांना त्रास होऊ शकतो, वाय-फाय तसेच थ्रीजी कनेक्टिविटीचा अभाव यात असून याचा सेटअपही काहीसा किचकट आहे.

ADVERTISEMENT

सॅमसंग गॅलेक्सी गीअरसॅमसंग गॅलेक्सी गीअर (samsung galaxy gear smartwatch) किंमतः २३,००० रुपये झकास मार्केटिंग गमक वापरत नोट थ्रीसह हे वॉच लाँच करण्यात आले आहे. अँडड्राँइड ४.३ जेलिबीनवर हे चालत असून ठराविक गॅलेक्सी फोनलाच ते सपोर्ट करते. येत्या काही दिवसांत ब्लूटूथ ४.० असलेल्या फोनसह हे वापरता येतील. काळा, राखाडी, केशरी, हिरवा, पिवळा या रंगात ही स्मार्टवॉच उपलब्ध आहेत. १.६३ इंचीचा सुपर अॅमोल्ड डिस्प्ले असून १.९ इंचीचा मेगापिक्सल कॅमेरादेखील आहे. सध्या गॅलेक्झी गीअरसाठी ७० अॅप्स उपलब्ध आहेत. सॅमसंगच्या या स्मार्टवॉचमध्ये ५१२ एमबीचा रॅम व ४ जीबी स्टोरेज उपलब्ध आहे. अन् पूर्ण चार्ज केल्यास २५ तासांचा बॅटरी बॅकअपदेखील आहेच. 
बलस्थानेः प्रिमिअर डिझाइन, सोपा मेन्यू, कॅमेरा. 
दुबळ्याबाजूः अवास्तव किंमत, बॅटरीलाइफ.

कॅसिओ जीशॉककॅसिओ जीशॉक GB900AB1 (CASIO G-SHOCK) किंमतः १०,००० रुपये. या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ ४.० चा पर्याय देण्यात आला असून त्याद्वारे टेक्स्ट मेसेज व कॉल घेता येऊ शकतात. २X२ इंचीचे हे घड्याळ किंचीत वजनदार असून लाल, निळा, पिवळा, पांढरा व काळ्या रंगात उपलब्ध आहे. हे फक्त आयफोनसोबतच वापरू शकता. आयओएस ५.१ व त्यापुढच्या व्हर्जन्समध्ये जीशॉक+ हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर आपण हे घड्याळ वापरू शकतो. मात्र जी-शॉकचे हे स्मार्टवॉच अँड्रॉइड फोनसह वापरता येऊ शकत नाही. आयफोनशी जोडल्यावर कॉल, ईमेल किंवा नोटिफिकेशन्सला वायब्रेट होते. स्मार्टवॉचच्या एलसीडीवर डबल टॅप करून नोटिफिकेशन्स क्लिअर करता येतात. बलस्थानेः स्पोर्टी लूक. दुबळ्याबाजूः खूपच वजनदार.

आयअॅम वॉचआयअॅम वॉच (IM WATCH) किंमतः १४,००० रुपये हे वॉच तुमच्या आयओएस, अँड्रॉइड तसेच ब्लॅकबेरी १० ओएससह वापरू शकता. १.५ इंचीचा डिस्प्ले या वॉचमध्ये देण्यात आला असून अँड्रॉइडचे कस्टमाइज व्हर्जन आयअॅमड्रॉइड २वर हे चालते. यासाठी अॅप्स डाऊनलोड करायचे असतील तर याच कंपनीच्या आयमार्केटवर जाता येईल. यात ईमेल, फेसबुक, मेसेज ब्लूटूथला तुमचा फोन कनेक्ट करुन वापरू शकता. बलस्थानेः हेडफोन स्लाँट, फुल टेक्समध्ये फेसबुक ट्विटर मॅसेज. वापरण्यास सोपे. कमकुवत दुवेः फारसा प्रभावी नसलेला स्क्रीनटच.

#1 Best Smartwatch - Pebble E-Paper Watch

Other Options include : 
1. Pebble Smartwatch ( This is also a better option)
2. Martian Smartwatch
3. ConnecteDevice Cookoo Smartwatch

Incoming search terms : sony smartwatch samsung galaxy gear casio pebble best top smart watches in the world

(smart watch) स्मार्टवॉचची क्रेझ पाहून येत्याकाळात अजून काही स्मार्टवॉच येत आहेत. यामध्ये अॅपलचे आयवॉच, गुगलचे स्मार्टवॉच, स्मार्टवॉच बाय एचटीसी, क्वालकॉचे स्मार्टवॉच, नोकियाचे मल्टीस्क्रीन स्मार्टवॉच यांचा समावेश आहे. बघायला गेले तर स्मार्टवॉच ही अफलातून संकल्पना आहे, पण हे तंत्रज्ञान नवीन असून त्याला विकसित व्हायला अजून बराच कालावधी लागेल. अॅलर्ट महत्त्वाचे असतातच, पण सततचे नोटिफिकेशन्स बऱ्याचदा त्रासदायकही ठरू शकतात. स्मार्टवाच हा खरेतर स्मोर्टफोनची एक एक्सेसरी आहे, पण त्याची किंमत त्या स्मार्टफोनएवढीच असल्याने बरेचजण हा पर्याय फारसा पडताळत नाही. त्यातच या स्मार्टवॉचची बॅटरी लाइफ फारशी नसल्याने रोज आपल्या फोनसह त्यालाही चार्ज करावे लागेल. तर मग आहे मंजूर ? मग हे स्मार्टवॉच वापरायला हरकत नाही.

Tags: CasioGalaxyIMPebbleSamsungSmart WatchesSony
ShareTweetSend
Previous Post

गुगल मदतनीस : गुगल हेल्पआऊट (तज्ज्ञांशी चॅटिंग)

Next Post

देशातील इंटरनेट यूजर्स @ २४.३ कोटी ???? (जून २०१४ अखेर)

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
सॅमसंगचे Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S25, S25+ आणि S25 Ultra सादर!

January 23, 2025
सॅमसंग Galaxy Z Fold6, Flip6 सादर : सोबत Watch Ultra, Galaxy Ring

सॅमसंग Galaxy Z Fold6, Flip6 सादर : सोबत Watch Ultra, Galaxy Ring

July 12, 2024
सॅमसंगची Galaxy S24, S24+ आणि S24 Ultra सादर! आता GalaxyAI सह!

सॅमसंगची Galaxy S24, S24+ आणि S24 Ultra सादर! आता GalaxyAI सह!

January 18, 2024
Next Post

देशातील इंटरनेट यूजर्स @ २४.३ कोटी ???? (जून २०१४ अखेर)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech