MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ऑपरेटिंग सिस्टिम्स Android

अँड्रॉइड धोक्यात येईल का ?

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 3, 2012
in Android, ऑपरेटिंग सिस्टिम्स

विंडोज ८  लॉचिंग अनेक गोष्टी पुन्हा चर्चेत आल्या आहेत . यामुळे अँड्रॉइड धोक्यात येईल का ? ग्राहक पुन्हा कम्प्युटर खरेदीकडे वळतील का ? विंडोजकडे पुरेसे अॅप्स आहेत का ? या प्रश्नांवर जगभरातील तज्ज्ञ चर्चा करत आहेत . मायक्रोसॉफ्टसह गुगलचे भवितव्यच नव्या लाँचवर अवलंबून असल्याने या चर्चा होणे स्वाभाविक आहे . अॅपलचे टॅबलेट मार्केटमधील स्थान मजबूत असल्याने त्यांचा याचा फरक पडणार नसला तरी सॅमसंग , आसुस , तोशिबा यासारख्या अँड्रॉइड टॅबलेट बनविणा – या कंपन्यांनी विंडोज ८ टॅबलेटच्या निर्मितीची तयारी करून स्वतःचे स्थान डळमळीत होणार याची काळजी घेण्यास सुरूवात केली आहे . 

आयपॅड नको असलेल्यांसाठी सध्या अँड्रॉइड टॅबलेटचा पर्याय उपलब्ध असला तरी त्याची विक्री म्हणावी तितकी नाही . गेल्यावर्षी लॉँच झाला तेव्हा गॅलेक्सी टॅब १० . १ हा आयपॅडला उत्तम टक्कर देईल अशी चर्चा होती . मात्र अॅपल विरुद्धच्या खटल्यात सॅमसंगने नमूद केलेल्या माहितीनुसार अमेरिकत केवळ ७ लाख १२ हजार गॅलेक्सीटॅबची विक्री झाली आहे . कंपन्यांनी निर्यात केलेल्या सर्व प्रकारच्या अँड्रॉइड टॅबलेट्सचे आकडे खूप मोठे दिसतअसले तरी कित्येक टॅब विक्रेत्यांकडे पडून असल्याचे आयडीसी या संशोधन संस्थेने म्हटले आहे . 

विडोंज ८ मुळे अँड्रॉइड पूर्णपणे इतिहासजमा होणार नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे . प्रामुख्याने स्वस्तातीलआणि ७ ते १० इंच आकारात उपलब्ध असलेल्या नॉन ब्रँडेड अँड्रॉइड टॅबलेटच्या विक्रीवर फारसा परिणाम होणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे . ग्राहक प्रामुख्याने गेम खेळणे , व्हीडिओ पाहणे , गाणी ऐकणे , इंटरनेट अॅक्सेस यासारख्या गोष्टींसाठी अँड्रॉइड टॅबलेट वापरतील असे गार्टनरच्या कॅरोलिना मिलानेसी म्हणतात .हार्डवेअर उत्पादकांनी अॅपलच्या व्यतिरिक्त दुसरी कंपनी टॅबलेट निर्मितीस परवानगी देईल या आशेने अँड्रॉइडसाठी गुगलबरोबर करार केला होता . मात्र आता त्यांनी मायक्रोसॉफ्टसोबतही हातमिळवणी केली आहे . 

अँड्रॉइडचे एक बलस्थान म्हणून अॅप्सकडे पाहिले जाते . सध्या गुगल प्ले स्टोअरवर ६ . ७५ लाखाहून अधिक अॅप्सउपलब्ध आहेत . त्याचवेळी मायक्रोसॉफ्टने अजून अॅप स्टोअरची घोषणा केलेली नाही . मात्र विंडोजकडे अँड्रॉइडच्या कितीतरी पट अधिक अॅप्स असल्याचे तज्ज्ञ सांगतात . गुगलनेही विंडोज ८ चा धोका लक्षात घेऊन आता अॅप्स डेव्हलपर्ससाठी नवे दिशानिर्देश जाहीर केले आहेत . कारण हेच डेव्हलपर विंडोज ८ साठीही अॅप तयारकरणार आहेत . 

ADVERTISEMENT
Tags: AndroidOperating Systems
ShareTweetSend
Previous Post

काही वर्षांत गुगलची सद्दी संपेल ??

Next Post

टॅबलेटसाठी भारत मोठी बाजारपेठ || — स्‍वस्‍त टॅबलेटची विक्री सर्वात जास्‍त

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

February 20, 2025
Crowdstrike BSOD Windows

जगभरातील विंडोज वर्क पीसीज् बंद : बँका, विमानतळे, रेल्वे अशा सेवा विस्कळीत!

July 19, 2024
Next Post
टॅबलेटसाठी भारत मोठी बाजारपेठ ||  —  स्‍वस्‍त टॅबलेटची विक्री सर्वात जास्‍त

टॅबलेटसाठी भारत मोठी बाजारपेठ || -- स्‍वस्‍त टॅबलेटची विक्री सर्वात जास्‍त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech