MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ऑपरेटिंग सिस्टिम्स Windows

Windows 11 सादर : अनेक नव्या सोयी, नवं डिझाईन आणि नवा स्टार्ट मेन्यू!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 24, 2021
in Windows, ऑपरेटिंग सिस्टिम्स
Windows 11

मायक्रोसॉफ्टने आज त्यांच्या मायक्रोसॉफ्ट इव्हेंटमध्ये विंडोज ऑपरेटिंग सिस्टमची नवी आवृत्ती Windows 11 सादर केली आहे. २०१५ मध्ये विंडोज १० सादर केल्यानंतर आज तब्बल ६ वर्षांनी विंडोज ११ च्या रूपात नवी ऑपरेटिंग सिस्टम आणण्यात आली आहे. विंडोज ११ आता अधिक वेगवान, अधिक सोयींसोबत नव्या डिझाईनसह उपलब्ध होत आहे.

नवं डिझाईन, नवं स्टार्ट बटन, वॉलपेपर, आयकॉन्स, विंडोसाठी गोलाकार कोपरे, रंगसंगतीचे बरेच पर्याय, विंडो मॅनेज करण्यासाठी नवे पर्याय, नवं ॲक्शन सेंटर, नवं मायक्रोसॉफ्ट स्टोअर, विजेट्स, इ बऱ्याच गोष्टी पाहायला मिळत आहेत. यामध्ये स्टार्ट मेन्यू जरी मध्यभागी दिसला असला तरी तो नेहमीप्रमाणे डावीकडेसुद्धा ठेवता येतो.

ADVERTISEMENT

यासोबत नव्या विंडोजमध्ये असलेल्या स्टोअरवर चक्क अँड्रॉइड ॲप्ससुद्धा इंस्टॉल करता येणार आहेत! मायक्रोसॉफ्टने यासाठी ॲमेझॉन ॲप स्टोअरची मदत घेतली आहे आणि इंटेलचं तंत्रज्ञान जोडून तुम्हाला विंडोज पीसीवरच अँड्रॉइड ॲप्ससुद्धा वापरता येतील!

Windows 11 Widgets
  • स्टार्ट मेन्यू : विंडोज ११ मध्ये नेहमी डाव्या बाजूला असणारा स्टार्ट मेन्यू आता मधल्या भागात आणण्यात आला असून यामध्ये Apps, Files, People अधिक वेगाने सर्च करून उघडता येतील. स्टार्ट मेन्यू आधीप्रमाणे डावीकडेही ठेवता येईल.
  • विंडोज अपडेट्स : विंडोज अपडेट्स आता ४० टक्के कमी साईज असलेले आणि अधिक वेगाने डाउनलोड होतील.
  • Snap Layouts : ही सोय नक्कीच बरीच उपयोगी पडेल कारण यामध्ये विंडो मॅनेज करणं खूप सोपं होणार आहे.
  • Microsoft Teams : मायक्रोसॉफ्ट टीम्स आता विंडोजमध्येच जोडण्यात आलं असून याद्वारे एका क्लिकमध्येच व्हिडिओ कॉल्स, मेसेजेस सुरू करता येतील!
  • Windows Widgets : स्टार्ट मेन्यू मधील विजेट्स आता स्वतंत्ररित्या उपलब्ध असतील. यावर क्लिक केल्यास डाव्या बाजूने नवा ग्लास पॅनल उघडेल. यामधील कंटेंट खास तुमच्यासाठी AI द्वारे निवडण्यात आलेला असेल.
  • Graphics & Games : ग्राफिक्समध्येही सुधारणा करण्यात आल्या असून आता विंडोज स्वतः Auto HDR द्वारे गेम्समधील रंग अॅडजस्ट करेल. गेम्सवरही खास लक्ष देण्यात आलं असून गेम पास आणि स्टोअरवर नवे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. एक्सबॉक्समधील Direct Storage API सुविधा आता पीसीवर आणण्यात आली आहे. यामुळे गेम्स अधिक वेगाने सुरू होतील.
  • मायक्रोसॉफ्ट स्टोअर : मायक्रोसॉफ्ट स्टोअरमध्ये आता मोठ्या प्रमाणावर ॲप्स उपलब्ध होतील जे बाहेरून डाउनलोड करण्यापेक्षा नक्कीच सुरक्षित असेल. शिवाय मायक्रोसॉफ्ट स्टोअरवर ॲप्स प्रकाशित करणाऱ्या डेव्हलपर्सकडून कोणतीही फी घेतली जाणार नाही.
  • अँड्रॉइड ॲप्स : ॲमेझॉन ॲप स्टोअरच्या मदतीने अँड्रॉइड ॲप्ससुद्धा मायक्रोसॉफ्ट स्टोअरमध्येच उपलब्ध होत आहेत! येथेच आपण आवडीचं अँड्रॉइड ॲप सर्च करून इंस्टॉल करू शकता!
Windows 11 Microsoft Store with Android Apps

Minimum system requirements for Windows 11

  • Processor : 1 gigahertz (GHz) or faster with 2 or more cores on a compatible 64-bit processor or System on a Chip (SoC)
  • Memory : 4 GB RAM
  • Storage : 64 GB or larger storage device
  • System firmware UEFI, Secure Boot capable
  • TPM Trusted Platform Module (TPM) version 2.0
  • Graphics card DirectX 12 compatible graphics / WDDM 2.x
  • Display >9” with HD Resolution (720p)
  • Internet connection Microsoft account and internet connectivity required for setup for Windows 11 Home

https://aka.ms/GetPCHealthCheckApp हे ॲप इंस्टॉल करून तुम्ही तुमच्या पीसीवर विंडोज ११ वापरू शकाल का ते पाहता येईल.

Windows 10 ची Genuine/लायसन्स कॉपी असणाऱ्या सर्वांना Windows 11 मोफत मिळणार आहे! विंडोज ११ कधी उपलब्ध होणार हे जाहीर करण्यात आलं नसलं तरी ऑक्टोबर महिन्यात हे उपलब्ध होण्यास सुरुवात होऊ शकते.

काही दिवसांपूर्वीच लीक झाल्यामुळे आता बऱ्याच जणांना आज मायक्रोसॉफ्टच्या कार्यक्रमात विंडोज ११ सादर होणार याची कल्पना होतीच. चीनी वेबसाइट बायडूवर चक्क Windows 11 चा डेव्हलपर प्रीव्यू सुद्धा लीक झाला होता. त्यावरून विंडोज ११ कसं दिसेल याचा अंदाज आला होताच.

खरंतर मायक्रोसॉफ्टने २०१५ मध्ये विंडोज १० ही विंडोजची शेवटची आवृत्ती असेल असं सांगितलं होतं आणि विंडोज १० लाच पुढे अपडेट केलं जाईल असं ठरवण्यात आलं होतं. मात्र आता मायक्रोसॉफ्ट त्यांच्या आधीच्या व्यक्तव्यावरून माघार घेत नवी आवृत्ती आणली आहे. त्यांनी विंडोज १० च्या पेजवर आता विंडोज १० चा सपोर्ट १४ ऑक्टोबर २०२५ मध्ये बंद करण्यात येईल असं लिहिलं आहे.

Search Terms Microsoft Windows 11 What’s New in Windows 11 Download Windows 11 ISO Windows 10 Vs Windows 11

Via: Introducing Windows 11
Tags: EventsMicrosoftOperating SystemsWindowsWindows 11
ShareTweetSend
Previous Post

जिओचा सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन JioPhone Next जाहीर : गूगलसोबत भागीदारी!

Next Post

Battlegrounds Mobile India आता अँड्रॉइडवर सर्वांसाठी उपलब्ध!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025
microsoft 365 Office Icons 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

October 4, 2025
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
Next Post
BGMI

Battlegrounds Mobile India आता अँड्रॉइडवर सर्वांसाठी उपलब्ध!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Affinity by Canva FREE

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

November 7, 2025
ChatGPT GO Free India

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

November 4, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech