Sooraj Bagal

Sooraj Bagal

गुगल आणि सॅमसंगचा अत्याधुनिक लॅपटॉप

गुगल आणि सॅमसंगचा अत्याधुनिक लॅपटॉप

मायक्रोसॉफ्टला टक्‍कर देण्यासाठी गुगल आणि सॅमसंग दोन कंपनी एकत्र आल्या आहेत. गुगल आणि सॅमसंगने नुकताच एक हलक्या वजनाचा अत्याधुनिक लॅपटॉप...

जगातील पहिला हायडेफिनेशन स्‍मार्टफोन लॉंन्‍च

जगातील पहिला हायडेफिनेशन स्‍मार्टफोन लॉंन्‍च

बहुप्रतिक्षीत HTC कंपनीचा हायडेफिनेशन डिस्‍प्‍ले असलेला स्‍मार्टफोन बाजारात लॉंन्‍च झाला आहे. जपानमध्‍ये कंपनीने नवा HTC बटरफ्लाई J लॉंन्‍च केला आहे....

विंडोजची ‘आठवी’ खिडकी : Windows 8 येत आहे भन्नाट सुविधांसह

विंडोजची ‘आठवी’ खिडकी : Windows 8 येत आहे भन्नाट सुविधांसह

' विंडोज फोन ८ ' हे मायक्रोसॉफ्टचं सर्वात प्रसिद्ध आणि प्रगत व्हर्जन. सध्या ' विंडोज ८ ' पीसी ओएसच्या बाबतीत जितकी उत्सुकता आहे. तितकीच उत्सुकता ' विंडोज फोन ८ ' या...

टॅबलेट आणि स्‍मार्टफोन असलेला ASUS चा पॅडफोन- 2

टॅबलेट आणि स्‍मार्टफोन असलेला ASUS चा पॅडफोन- 2

असूसने तैवानमध्‍ये नवा पॅडफोन लॉंन्‍च केला आहे. या डिव्‍हाईसचे नामकरण त्‍यांनी पॅडफोन- 2 असे ठेवले आहे. असूस ग्राहकांना क्‍वॉड कोअर...

मालवेअर रोखणारं ‘इंटरनेट एक्स्प्लोलर ९’ : मॉझिला , क्रोम , सफारी या ब्राऊजर्सना पुन्हा मागे टाकले : मालवेअर , फ्रॉड्स  कळतात तातडीने

मालवेअर रोखणारं ‘इंटरनेट एक्स्प्लोलर ९’ : मॉझिला , क्रोम , सफारी या ब्राऊजर्सना पुन्हा मागे टाकले : मालवेअर , फ्रॉड्स कळतात तातडीने

मायक्रासॉफ्टचं कोणतंही उत्पादन कम्प्युटर बाजारात चाललंनाही असं नाही . मग याला ' इंटरनेट एक्स्प्लोलर ९ ' ('आयई९ ') अपवाद कसं ठरणार . एक्स्प्लोरर लाँच झाल्यानंतर अल्पावधीतच गेल्या काही महिन्यांमध्ये मार्केटमध्येआपलं स्थान प्रस्थापित केलेल्या मॉझिला , क्रोम  , सफारी या ब्राऊजर्सना पुन्हा मागे टाकले आहे . एनएसएसनेलॅबने केलेल्या पाहणीत ही बाब प्रकर्षाने जाणवली आहे . ' इंटरनेट एक्स्प्लोलर ९ ' मध्ये वेबसाइट ओपन केली की, त्यातील मालवेअर , फ्रॉड्स तातडीने कळतात . यामुळे या ब्राऊजरला सर्वाधिक पसंती मिळत असल्याचं निरीक्षणयात नोंदविण्यात आलं आहे .  एनएसएसने गेले ७५ दिवस विविध ब्राऊजर्सवर ओपन झालेल्या वेबसाइट्स आणि त्यांनी रोखलेले मालवेअर यांचेसर्वेक्षण केले . यामध्ये ' आयई९ ' वर ओपन झालेल्या एकूण साइट्सपैकी सुमारे ९५ टक्के मालवेअर रोखण्यात त्यांना यश आले आहे . फायफॉक्स आणि सफारी हे ब्राऊजर्स मालवेअर रोखण्याच्या स्पर्धेत कुठेच नसल्याचे दिसूनआले आहे . या दोन्ही ब्राऊजर्सनी केवळ सहा टक्केच मालवेअर रोखले आहेत . क्रोमने यामध्ये समाधानकारककामगिरी केली असून या ब्राऊजरला ७४ टक्के मालवेअर रोखण्यात यश आले आहे . यासाठी एनएसएसने प्रत्येकब्राऊजर्सच्या सुमारे साडे सात लाख वेब पेजेस टेस्ट केले आहेत . ब्राऊजर सिक्युरिटी हे आपल्याला पूर्णतः सुरक्षादेत नाहीत . त्याचा वापर केवळ प्राथमिक सुरक्षा म्हणून केला जाऊ शकतो , असे एनएसएसने आपल्यानिरीक्षाणात नमूद केले आहे . ब्राऊजर्सची ही सुरक्षा क्लाऊड तंत्राज्ञानावर अवलंबून आहे . ज्या कंपनीची क्लाऊडटेक्नॉलॉजी चांगल्या दर्जाची आहे त्यांना ही मालवेअर सुरक्षा पुरविणंच शक्य होणार आहे . आपण जेव्हा एखादीवेबसाइट ओपन करतो तेव्हा ती साइट ' बॅड ' म्हणून दर्शविण्यात आली तर ती ओपन होण्याआधी युजर वॉर्निंगदेण्यात येते . तरीही युजरला ती साइट ओपन करायची असेल तर तो पर्यायही खुला राहतो . अशाच अनेकप्रकरांमधून अॅण्टीव्हारसचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षणही सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे . ' आयई९ 'आणि क्राममध्ये मालवेअर असलेले वेबपेज ओपन होते मात्र त्या पेजेसवरून डाऊनलोडिंग करता येत नाही .बहुतांश मालवेअर हे अॅडच्या माध्यमातून पसविले जातात , असे निरीक्षण एनएसएसने या सर्वेक्षणात नोंदविलेआहे . यामध्ये गुन्हेगारांना पे - पर - क्लिकनुसार पैसे मिळत असतात . क्लिक फ्रॉड रोखण्याचे काम सर्वाधिकचांगल्याप्रकारे ' आयई९ ' ने केलेले आहे . त्याचेप्रमाण ९६ . ६ टक्के इतके आहे . त्याखालोखाल क्रोम १ . ६ टक्के ,फायरफॉक्स ० . ८ टक्के आणि सफारी ० . ७ टक्के असे मालवेअर रोखण्याचे ब्राऊजर्सचे प्रमाण आहे .

Page 309 of 319 1 308 309 310 319
ADVERTISEMENT
error: Content is protected!