इंटरनेट

ई-मेलचे मॅनेजमेंट

दोन तास १४ मिनिटे ... आपण दिवसातील एवढा वेळ ई -मेल तपासण्यासाठी घालवत असतो . याचाच अर्थ असा की आपण आपले ई - मेल्स तपासणे आणि त्याला उत्तरे देण्यासाठी आपल्या कामाच्या वेळेतील २५ टक्के वेळ खर्च करत असतो . मॅकेन्सीने नुकतेच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार सन २०१२मध्ये ' ई - मेल ' हे दैनंदिन कामातील सर्वात मोठे काम असल्याचे समोर आले आहे .  इनबॉक्समध्ये येणाऱ्या ई - कॉमर्स किंवा डिस्काउंटच्या जाहिराती त्रासदायक ठरतात . बड्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या एका माणसाला दिवसाला किमान १०० ई - मेल्स वाचायचे असतात . ही माहिती टेक्नॉलॉजी मार्केटिंग फर्म रडेकटी ग्रुपने केलेल्या पाहणीत समोर आली आहे . यातील बहुतांश मेल्स डीलीट करण्यात वेळ वाया जातो . कामाच्या गडबडीत वेळ वाचवायचा असेल तर काही सुविधांचा वापर करता येऊ शकेल .  अनरोल डॉट मी (Unroll.me) - यामध्ये सर्व ई - मेल्सच्या इनबॉक्समधील जाहिरातींचे मेल्स आपण एकाच वेळी जमा करू शकतो . याला ' डेली डायजेस्ट ' म्हणतात . तुमच्या मेल्समधील मसेजेस इथं आले की , तुम्ही ते सर्व ई -मेल्स डिलिट करू शकतात . ही सेवा जीमेल आणि याहू मेल यांच्यासाठी उपलब्ध आहे .  फॅन मिक्स (FanMix) - जे सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करतात अशा युजर्ससाठी ही सेवा उपयुक्त ठरूशकते . यामध्ये आपल्या ई - मेलवर येणारे सर्व नोटिफिकेशन्स एकत्र केली जातात . याचा फायदा असा की ,आपल्याला ट्विटर , फेसबुक , लिंक्डइन आणि ब्लॉग कन्व्हरसेशन एका ठिकाणी दिसू शकतात . यात आपल्याला फेसबुक नोटिफिकेशनबरोबरच फेसबुक मेसेजेसही पहावयास मिळतात .  सेनबॉक्स (SaneBox) - या सेवेमध्ये महत्त्वाचे नसलेले ई - मेल्स एकत्रित केले जातात . जेणेकरून इनबॉक्समध्ये आपल्याला केवळ महत्त्वाचे मेल्स उपलब्ध राहतील . ही सुविधा आपण जीमेल , याहू , एओएल , अॅपल मेल ,आऊटलूक , आयफोन , अँड्रॉइड या सर्वांसाठी उपलब्ध आहे .  द ई - मेल गेम (The Email Game) - आपला इनबॉक्समध्ये एकही बिनकामाचा मेल न ठेवण्याचा सर्वात चांगला पर्याय म्हणजे ' द ई - मेल गेम ' यामध्ये आपल्या इनबॉक्समधील मेल्सचे व्यवस्थित बायफरकेशन केले जाते .यामुळे आपला इनबॉक्स अधिक स्वच्छ दिसू शकतो .  झीरो बॉक्सर (0Boxer) - ही एक जीमेलची प्लगइन टूल आहे . या माध्यमातून आपण आपले मेल्स अर्काइव्हमध्ये ठेऊ शकतो तसेच आपल्या ई - मेल्सला रिप्लायही देऊ शकतो . ही सुविधा सध्या बीटा मोडमध्ये उपलब्ध आहे .पण या सुविधेमध्येही आपण आपला इनबॉक्समध्ये एकही मेल राहणार नाही याची काळजी घेऊ शकतो .

इंटरनेट सोपं करण्यासाठी… एव्हरनोट

इंटरनेट सोपं करण्यासाठी… एव्हरनोट

मनोरंजन , ऑनलाइन व्हिडीओ आणि गेम्स , डॉक्युमेंटवर काम करणे , डाटाबेस हे सर्व क्लाऊडवर करण्याचे प्रमाण वाढले आहे . सोशल नेटवर्किंगवर मित्र आणि कुटुंबांबरोबर गप्पा होत असतात . हे सर्व करताना मोबाइलवरील इंटरनेटचा ब्राऊजर महत्त्वाची भूमिका बजावत असतो . ब्राऊजर हे एक प्रकारचे फ्री मिळणारे अॅप्लिकेशन आहे . मात्र , या सॉफ्टवेअरवर काही विशेष सुविधा आपल्या अॅड करता येऊ शकतात .  वेबपेजवर एखादा लेख वाचताना अनेक स्पॉन्सर्ड लिंक ( अॅड ) असतात . त्या फोटो , पॉपअप स्वरूपात पुढे येतात. मात्र , अशा अॅड वाचण्यात अडथळा निर्माण करतात . मात्र , पुन्हा तेच आर्टिकल ऑनलाइन स्वरूपात वाचायचे असल्यास पॉपअपचा अडथळा टाळता येऊ शकतो . ' एव्हरनोट ' मुळे हे करता येणे शक्य आहे . डार्क आणि लाइट थीम यात निवडता येते . ' एव्हरनोट ' चे अकाऊंट असल्यास संबंधित लेखाचे क्लिप किंवा त्यातील काहीभाग अधोरेखित करून संदर्भासाठी वाचता येतो .  डाऊनलोड Evernote :  >>>>>  एव्हरनोट  <<<< फायरफॉक्स , क्रोम वापरणाऱ्यांना ही सुविधा वापरता येते .इंटरनेट एक्सप्लोअरर वापरत असलेल्या ' एव्हरनोट ' वेब क्लिपरचा वापर करता येऊ शकतो . मात्र , यासाठी 'एव्हरनोट ' प्रोग्रॅम कम्प्युटरवर लोड करावा लागतो . ही विशिष्ट अॅप्लिकेशन वापरल्यास वेब वापरण्याचा अनुभव सु्खद होऊ शकतो . त्यामुळे या अॅप्लिकेशनचा विचार करायला हरकत नाही . स्मार्टफोन आणि इंटरनेट प्लॅन रास्त दरात उपलब्ध असल्याने मोबाइलवर इंटरनेट सर्फ करण्याचे प्रमाण वाढले आहे . ऑनलाइन व्हिडीओ बघणे अनेकांना आवडते . ब्राऊजरमधील प्लग - इनच्यामार्फत आवडते व्हिडीओ डाऊनलोड करता येतात . इंटरनेट एक्सप्लोअरर वापरणारे यूजर आयई डाऊनलोड हेल्परचा वापर करता येऊ शकतो . इंटरनेट एक्सप्लोअररच्या नव्या ३ . ५ व्हर्जनवर व्हिडीओ फाइलच्या साइझबाबत मर्यादा आहेत .त्यामुळे आयईचे ३ . ३ च्या व्हर्जनचा विचार करता येईल . फायरफॉक्स वापरणाऱ्यांनी व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी व्हिडीओ डाऊनलोड हेल्परची मदत घ्यावी . वेबपेजचा अॅक्सेस केल्यावर या एक्स्टेंशन प्रोससमुळेव्हिडीओ हा एएलव्ही , एमपी४ आणि ३जीपी फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करता येऊ शकतो . याचे रेझोल्यूशन१०८० पिक्सेलपर्यंत असू शकतो . क्रोम वापरणारे यूजर यू - ट्यूब डाऊनलोडरचा विचार करू शकतात . आपण पाहत असलेल्या व्हिडीओच्या खालीच डाऊनलोड बटन असते . त्यामुळे फाइल डाऊनलोड करणे सोपे जाते . Tubemate : >>>> tubemate.net <<<< * marathitech does not take responsibility...

AMAZING WEBSITE: फ्लाईटची माहिती घेण्‍यासाठी अत्‍यंत उपयुक्‍त

AMAZING WEBSITE: फ्लाईटची माहिती घेण्‍यासाठी अत्‍यंत उपयुक्‍त

www.flightradar24.com हे संकेतस्थळ पाहून तुम्ही नक्कीच आश्यर्यचकित व्हाल. तंत्रज्ञान काय काय करू शकते, हे या संकेतस्थळाच्या माध्यमातून तुम्हाला जाणून घेता येईल....

गुगलवरच गुगली

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात बदल ही नवीन गोष्ट नसली तरी तेसर्वांनाच पसंत पडतील याची खात्री मात्र कुणीच देऊ शकतनाही . अगदी बड्या कंपन्यांनाही त्यामुळे टीकेचा सामना करावा लागतो . सध्या गुगलवर ही वेळ आली असूनजीमेल , डूडल आणि प्रायव्हसी पॉलिसीवरुन गुगलला टीकेचा सामना करावा लागतो आहे . जीमेल मध्ये नवीन ईमेल टाइप करण्यासाठी पूर्वी नवीन पेज दिसत होते . पण त्याऐवजी आता नवीन पॉप - अपविंडो ओपन होऊ लागली आहे . ऑक्टोबरपासून गुगल त्याची चाचपणी करत होते आणि पूर्वीच्या पेक्षा ही पद्धतअधिक वेगवान असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे . जीमेल युझर मात्र यावर खूश नाहीत . त्यांनी ट्विटरवरयाविषयी नापसंती व्यक्त केली असून इतर ईमेल सर्विसचा वापर करण्याचा विचार करत असल्याचे त्यांचे म्हणणेआहे . मात्र ज्या युझर्सला हा बदल आवडलेला नाही त्यांना जुन्या पद्धतीनेच ईमेल टाइप करण्याची सोय उपलब्धआहे . त्यासाठी कंपोझ बटनावर क्लिक केल्यावर नवीन ईमेल टाइप करण्यासाठी पॉप अप विंडो ओपन होईल .त्या विंडोमध्ये उजव्या हाताच्या खालील भागात more options असा पर्याय उपलब्ध आहे . त्यावर क्लिककेल्यावर temporily switch back to old compose असा ऑप्शन उपलब्ध आहे . त्यावर क्लिक केल्यावरपूर्वीप्रमाणे नवीन मेल टाइप करण्यासाठी स्वतंत्र पेज ओपन होईल . इस्टरच्या डुडलवरून टीका सीझार चावेझ यांच्या जयंतीनिमित्त इस्टरच्या दिवशी गुगलने तयार केलेले डूडल अनेक अमेरिकन नागरिकांनापसंत पडले नाही . अमेरिकेतील नॅशनल फार्म वर्कर्स असोसिएशनचे सहसंस्थापक असलेल्या चावेझ यांचे १९९३मध्ये निधन झाले होते . गेल्यावर्षी ३१ मार्च हा दिवस ओबामा यांनी सीझार चावेझ डे म्हणून जाहीर केला होता. त्यामुळे गुगलने रविवारी तयार केलेल्या डूडलमध्ये गुगल लोगोच्या मध्यभागी चावेझ यांचा चेहरा बसविण्यातआला होता . मात्र नेमका त्याच दिवशी इस्टर असल्याने इस्टरऐवजी चावेझ यांच्यावर डूडल तयार केल्याने अनेकनागरिक नाराज झाले . गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी इरिक स्मिड आणि ओबामा यांच्यातील घनिष्टसंबंधांमुळे हे डूडल तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यापर्यंत अनेकांची मजल गेली . प्रायव्हसीवरुन युरोपियन देशांचा रोष ब्रिटन , फ्रान्स , नेदरलँड , जर्मनी , स्पेन आणि इटली या सहा देशांनी मिळून गुगलच्या प्रायव्हसीपॉलिसीविरोधात संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे . गेल्यावर्षी कंपनीने ६० स्वतंत्र प्रायव्हसीपॉलिसी एकत्र करून एक युनिव्हर्सल पॉलिसी तयार केली होती . मात्र त्यामुळे गुगलकडे ग्राहकांची काय माहितीआहे आणि ती कंपनीकडे किती काळ राहील हे त्यांना कळत नसल्याचा आरोप या देशांनी केला आहे . माहितीतंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांना मात्र कंपनीच्या सर्च इंजिनच्या यशस्वितेसाठी ही पॉलिसी गरजेची असल्याचे वाटते .

‘यू ट्यूब’ला आव्हान व्हेवो

' यू ट्यू ' ब हे नाव कुणाला माहीत नाही ? पण उठल्यासुटल्या त्यावर आपण जे व्हिडिओ पाहतो , ते नक्की कोण अपलोड करतं , एखादी ठराविक कंपनी ' यू-ट्यूब ' ला डेटा...

Page 28 of 32 1 27 28 29 32
ADVERTISEMENT
error: Content is protected!