AMAZING WEBSITE: फ्लाईटची माहिती घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त
www.flightradar24.com हे संकेतस्थळ पाहून तुम्ही नक्कीच आश्यर्यचकित व्हाल. तंत्रज्ञान काय काय करू शकते, हे या संकेतस्थळाच्या माध्यमातून तुम्हाला जाणून घेता येईल....
www.flightradar24.com हे संकेतस्थळ पाहून तुम्ही नक्कीच आश्यर्यचकित व्हाल. तंत्रज्ञान काय काय करू शकते, हे या संकेतस्थळाच्या माध्यमातून तुम्हाला जाणून घेता येईल....
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात बदल ही नवीन गोष्ट नसली तरी तेसर्वांनाच पसंत पडतील याची खात्री मात्र कुणीच देऊ शकतनाही . अगदी बड्या कंपन्यांनाही त्यामुळे टीकेचा सामना करावा लागतो . सध्या गुगलवर ही वेळ आली असूनजीमेल , डूडल आणि प्रायव्हसी पॉलिसीवरुन गुगलला टीकेचा सामना करावा लागतो आहे . जीमेल मध्ये नवीन ईमेल टाइप करण्यासाठी पूर्वी नवीन पेज दिसत होते . पण त्याऐवजी आता नवीन पॉप - अपविंडो ओपन होऊ लागली आहे . ऑक्टोबरपासून गुगल त्याची चाचपणी करत होते आणि पूर्वीच्या पेक्षा ही पद्धतअधिक वेगवान असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे . जीमेल युझर मात्र यावर खूश नाहीत . त्यांनी ट्विटरवरयाविषयी नापसंती व्यक्त केली असून इतर ईमेल सर्विसचा वापर करण्याचा विचार करत असल्याचे त्यांचे म्हणणेआहे . मात्र ज्या युझर्सला हा बदल आवडलेला नाही त्यांना जुन्या पद्धतीनेच ईमेल टाइप करण्याची सोय उपलब्धआहे . त्यासाठी कंपोझ बटनावर क्लिक केल्यावर नवीन ईमेल टाइप करण्यासाठी पॉप अप विंडो ओपन होईल .त्या विंडोमध्ये उजव्या हाताच्या खालील भागात more options असा पर्याय उपलब्ध आहे . त्यावर क्लिककेल्यावर temporily switch back to old compose असा ऑप्शन उपलब्ध आहे . त्यावर क्लिक केल्यावरपूर्वीप्रमाणे नवीन मेल टाइप करण्यासाठी स्वतंत्र पेज ओपन होईल . इस्टरच्या डुडलवरून टीका सीझार चावेझ यांच्या जयंतीनिमित्त इस्टरच्या दिवशी गुगलने तयार केलेले डूडल अनेक अमेरिकन नागरिकांनापसंत पडले नाही . अमेरिकेतील नॅशनल फार्म वर्कर्स असोसिएशनचे सहसंस्थापक असलेल्या चावेझ यांचे १९९३मध्ये निधन झाले होते . गेल्यावर्षी ३१ मार्च हा दिवस ओबामा यांनी सीझार चावेझ डे म्हणून जाहीर केला होता. त्यामुळे गुगलने रविवारी तयार केलेल्या डूडलमध्ये गुगल लोगोच्या मध्यभागी चावेझ यांचा चेहरा बसविण्यातआला होता . मात्र नेमका त्याच दिवशी इस्टर असल्याने इस्टरऐवजी चावेझ यांच्यावर डूडल तयार केल्याने अनेकनागरिक नाराज झाले . गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी इरिक स्मिड आणि ओबामा यांच्यातील घनिष्टसंबंधांमुळे हे डूडल तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यापर्यंत अनेकांची मजल गेली . प्रायव्हसीवरुन युरोपियन देशांचा रोष ब्रिटन , फ्रान्स , नेदरलँड , जर्मनी , स्पेन आणि इटली या सहा देशांनी मिळून गुगलच्या प्रायव्हसीपॉलिसीविरोधात संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे . गेल्यावर्षी कंपनीने ६० स्वतंत्र प्रायव्हसीपॉलिसी एकत्र करून एक युनिव्हर्सल पॉलिसी तयार केली होती . मात्र त्यामुळे गुगलकडे ग्राहकांची काय माहितीआहे आणि ती कंपनीकडे किती काळ राहील हे त्यांना कळत नसल्याचा आरोप या देशांनी केला आहे . माहितीतंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांना मात्र कंपनीच्या सर्च इंजिनच्या यशस्वितेसाठी ही पॉलिसी गरजेची असल्याचे वाटते .
' यू ट्यू ' ब हे नाव कुणाला माहीत नाही ? पण उठल्यासुटल्या त्यावर आपण जे व्हिडिओ पाहतो , ते नक्की कोण अपलोड करतं , एखादी ठराविक कंपनी ' यू-ट्यूब ' ला डेटा...
ईमेलच्या माध्यमातून घोटाळा होण्याचे प्रमाण वाढत आहे .सायबर गुन्हेगार विविध युक्त्या त्यासाठी शोधून काढत आहेत . वकील , पोलिस किंवा मित्रांच्या नावानेहीसंशयास्पद आशय असणारे ई - मेल आल्यास फसू नका . सायबर गुन्हेगारांनी घोटाळे काढण्यासाठी नवे मार्गशोधले आहेत . अशा प्रकारच्या ई - मेलमध्ये क्रेडिट कार्ड , बँक अकाऊंटबद्दल माहिती विचारणाऱ्या लिंक असतात . नुकताच मारुती उद्योग कर्मचारी भरती करीत असून , अंतिम मुलाखतीसाठी दिल्लीला येण्यासाठी रक्कमजमा करा , अशा आशयाचा ई - मेल एकाला आला ; तसेच तुमच्या विरूद्ध स्थानिक कोर्टात खटला दाखल झालाआहे , अशा आशयाचेही ई - मेल येऊ लागले आहेत . असे ई - मेल हे पूर्ण अभ्यास करूनच पाठविण्यात येत आहेत. गेल्या काही वर्षांत इंटरनेट वापरणाऱ्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्या प्रमाणात सायबरगुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे . इंटरनेट वापरणारे नवखे युजर , अशा ई - मेलना बळी पडत आहेत . इंटरनेट स्कॅमचा सर्वांत मोठा स्रोत भारत होता . पण आता हा क्रम बदलला असून चीन आणि अमेरिकेनंतर भारताचा क्रमांकलागतो आहे , असे इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाचे म्हणणे आहे . काही दिवसांपूर्वी चुकीच्या ठिकाणी पार्किंग केल्याने दंड जमा करण्याची मागणी करणारा एक मेल चेन्नईत एकाला मिळाला . त्यात क्रेडिट कार्डने पेमेंट करण्यासाठीच्या अनेक लिंक किंवा स्टेट बँकेच्या अमूक एकाअकाऊंटमध्ये पैसे भरा , असे लिहिले होते . मात्र , पोलिसांकडून असा कोणताही ई - मेल पाठविण्यात आलानसल्याचे स्पष्ट झाले . त्यामुळे वकील , पोलिसांच्या नावाचा वापरही सायबर गुन्हेगार करू लागले आहेत . इंटरनेट वापरणाऱ्यांनी कोणताही पैसे मागणाऱ्या ई - मेल आल्यास त्याला प्रतिसाद देता काम नये . बँका कधीहीई - मेलमार्फत पैशाची मागणी करीत नाहीत . त्यामुळे इंटरनेट युजर्सनी अशा ई - मेलबाबत सजग राहण्याचीगरज आहे . ई - मेलमध्येही एखादा मेल फिशिंग स्कॅम असल्याचे नोटिफिकेशन येण्यास सुरुवात झाली आहे . 'अनेक लोकांनी यास फिशिंग स्कॅम मेल , असे शेरा दिला आहे . त्यामुळे यात असुरक्षित आशय असू शकतो ,' असेनोटिफिकेशन मेलमध्ये येत आहे . त्यामुळे त्याकडे युजरनी लक्ष द्यायला हवे . email, junk, spam
यूजरने पाठविलेला (सेन्ट) किंवा स्वीकारलेला (इनबॉक्स) प्रत्येक मेल गुगलतर्फे वाचला जातो , असा खळबळजनक दावा सॉफ्टवेअरनिर्मात्या ' मायक्रोसॉफ्ट ' ने केला आहे. ' डोंट गेट स्क्रूगल्ड बाय जी-मेल ' या...
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech