गूगल इंडियाने नवी ऑफर जाहीर केली असून ही ऑफर विशेषतः भारतातील १८ वर्षांवरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आहे. गुगलचा उद्देश विद्यार्थ्यांना अत्याधुनिक एआय साधनांचा वापर करून त्यांचे शिक्षण, संशोधन आणि करिअरच्या तयारीमध्ये मदत करणे हा आहे. यामध्ये विद्यार्थ्याना Gemini 2.5 Pro, Deep Research, Veo 3, NotebookLM, 2TB Cloud Storage, Gemini Live या सोई वर्षभर मोफत वापरता येतील. यासाठी, विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत या ऑफरसाठी खालील लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
लिंक : http://goo.gle/freepro
Google Gemini AI Pro मध्ये काय मिळेल?
या मोफत सबस्क्रिप्शनमध्ये विद्यार्थ्यांना अनेक उत्कृष्ट एआय टूल्स आणि सेवांचा लाभ घेता येईल, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:
- Gemini 2.5 Pro: गुगलचा सर्वात प्रगत एआय मॉडेल, जो विद्यार्थ्यांना गृहपाठ, परीक्षेची तयारी आणि लेखन सहाय्यासाठी मदत करेल. यात अवघड विषय समजून घेणे, नोकरीच्या मुलाखतीची तयारी करणे आणि नवनव्या गोष्टी विकसित करणे समाविष्ट आहे.
- Deep Research: हे टूल विद्यार्थ्यांना संशोधनासाठी आणि तपशीलवार अहवाल तयार करण्यासाठी मदत करेल. तासांचे काम मिनिटांमध्ये पूर्ण करण्याची क्षमता यामुळे मिळेल.
- NotebookLM: नोट्स व्यवस्थित करण्यासाठी आणि त्यांची मर्यादा ५ पटीने वाढवण्यासाठी हे टूल अत्यंत उपयुक्त ठरेल.
- Veo 3 Fast: मजकूर किंवा फोटोंवरून डायनॅमिक AI व्हिडिओ तयार करण्यासाठी हे एआय-शक्तीशाली टूल विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल.
- Gemini Live: रिअल-टाइम व्हॉइस चॅटद्वारे एआयसोबत चर्चा करण्याची आणि सादरीकरणाचा सराव करण्याची सुविधा.
- गुगल ॲप्समध्ये एआय सहाय्य: Gmail, Docs, Sheets आणि Slides सारख्या आपल्या आवडत्या गुगल ॲप्समध्ये थेट एआयची मदत मिळेल.
- 2TB क्लाउड स्टोरेज: Google Drive, Gmail आणि Google Photos मध्ये मोठ्या प्रमाणावर डेटा साठवण्यासाठी 2TB क्लाउड स्टोरेज मिळेल!
या ऑफरचा लाभ कसा घ्यावा?
- पात्रता तपासा: तुम्ही १८ वर्षांवरील भारतीय महाविद्यालयीन विद्यार्थी असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे वैध कॉलेज ईमेल आयडी किंवा विद्यार्थी म्हणून पडताळणी करण्यासाठी आवश्यक स्टुडंट आयडी कागदपत्रे असावीत.
- Google One शी संलग्न नसणे: जर तुमच्याकडे आधीच Google One सबस्क्रिप्शन असेल, तर तुम्ही या ऑफरसाठी पात्र नसाल.
- नोंदणी करा: विद्यार्थ्यांना Google च्या अधिकृत ऑफर पेज (gemini.google/students/?gl=IN) वर जाऊन नोंदणी करावी लागेल.
- विद्यार्थी स्थिती पडताळणी: SheerID या पडताळणी प्लॅटफॉर्मद्वारे तुम्हाला तुमची विद्यार्थी स्थिती सत्यापित करावी लागेल.
- पेमेंट पद्धत जोडा: जरी शुल्क आकारले जाणार नसले तरी, तुम्हाला पेमेंट पद्धत जोडण्यास सांगितले जाईल. मोफत १२ महिन्यांच्या कालावधीत कोणतेही शुल्क कापले जाणार नाही.
- one.google.com/offer/studentoffer या लिंकवर नियम व अटी सविस्तर वाचू शकता.
काही मुद्दे लक्षात ठेवा
- तुमच्या मोफत १२ महिन्यांच्या सबस्क्रिप्शनची मुदत संपल्यावर, तुमची सेवा आपोआप रद्द होईल. तुम्हाला Google Gemini AI Pro ची वैशिष्ट्ये वापरता येणार नाहीत, जोपर्यंत तुम्ही सबस्क्रिप्शन घेत नाही.
- गुगल तुम्हाला तुमच्या मोफत सबस्क्रिप्शनची मुदत संपण्यापूर्वी ईमेलद्वारे सूचित करेल. यामुळे तुम्हाला सदस्यत्व चालू ठेवायचे आहे की नाही याचा निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.
- तुम्ही Google Gemini AI Pro च्या सबस्क्रिप्शन renew केलं नाही तर तुमच्या Google Drive मध्ये साठवलेल्या फाइल्स आणि इतर डेटा सुरक्षित राहतील. तुम्हाला आहे त्या फाइल्स पाहता येतील मात्र नव्या फाइल्स अपलोड करता येणार नाहीत.
- तुमच्या खात्यासाठी उपलब्ध असलेल्या स्टोरेज मर्यादेपर्यंत (15GB) तुमचा डेटा कायम राहील. जर तुमचा डेटा त्या मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला अतिरिक्त स्टोरेज खरेदी करण्याचा किंवा काही फाइल्स हटवण्याचा पर्याय दिला जाईल.
- मूळ 15GB च्या मर्यादेच्यावर डेटा साठवला असल्यास तुम्हाला ईमेल्स सुद्धा येणं बंद होतील हे लक्षात घ्या.
- १२ महिन्यांचं मोफत सबस्क्रिप्शन संपल्यावर गूगल त्या 2TB चा डेटा लगेच डिलिट करणार नसला तरी भविष्यात ते कधीही डिलिट करण्याचा निर्णय घेऊ शकतात त्यावेळी आपल्याला सबस्क्रिप्शन घेणं किंवा डेटा डिलिट करणं किंवा गूगलला डेटा डिलिट करू देणं हेच तीन पर्याय राहतात. तिन्ही बाबत गूगल वारंवार ईमेलद्वारे माहिती देईलच.
- त्यामुळे केवळ फ्री स्टोरेजसाठी म्हणून ही ऑफर वापरणार असाल तर केवळ इथेच महत्वाचा डेटा स्टोअर करून निवांत राहू नका.