इंटरनेट

यूट्यूबचा नवा हिरो

सामाजिक संदेश देणारा कुठलाही व्हिडीओ यूट्यूबवर लोकप्रिय होऊ शकतो ? होय... ' गंगनम ', ' कोलावेरी ' या टाइमपास व्हिडीओजनंतर ' टॉक इट आऊट ' हा असाच एक व्हिडिओ यूट्यूबवर सध्या हिट...

जीमेलचे ‘स्पेस मॅनेजमेंट’

गुगल कंपनीच्या जीमेल या फ्री मेल सर्व्हिसने जागतिक पातळीवर फ्री ई - मेलची व्याख्याच बदलून टाकली. हॉटमेल , याहू यासारख्या मोफत ई - मेल सुविधा देत असललेल्या कंपन्या गुगलच्या जी - मेल या सर्व्हिसच्या तुलनेत मागे पडल्या .                   कोणतीही ब्लिंग होणार ई - मेलच्या पेजवर नसणारी अॅड , भारंभार लिस्टिंग हे जी -मेलमध्ये नसल्याने आणि यावरून डेटा पाठविता येण्याची क्षमता यांच्यामुळे यूजर हळूहळू गुगल या कंपनीच्या  जी- मेल या सर्व्हिसकडे वळाले . जागतिक पातळीवरील लोकांचा कल ज्याप्रमाणे  जीमेलकडे झाला , तसाच काहीसा अनुभव भारतात आला आहे . जी - मेल ही फ्री ईमेल वापरणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे . यूजरना जी - मेलच्याबाबतीत काहीना काही नवीन देण्याचा प्रयत्न या गुगलकडून होतो . कंपनीने जी - मेलमध्ये नुकतेच मोठे बदल करणार असल्याची घोषणा केली .                 त्यानुसार फाइल अॅटॅचमेंटची क्षमता २५ एमबीवरून १० जीबी करण्यातयेणार आहे ....

इंटरनेट एक्स्प्लोररची दहावी आवृत्ती पास

नोव्हेंबर महिना वेब ब्राऊजर्सच्या स्पर्धेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरला आहे . या महिन्यात तीन बड्या कंपन्यांनी आपल्या ब्राऊजर्सचया नवीन आवृत्या बाजारात आल्या आहेत . यात इंटरनेट एक्स्प्लोररची १०वी आवृत्ती मॉझिला फायरफॉक्स १७ आणि गुगल क्रोम २३ यांचा समावेश आहे . यात इंटरनेट एक्स्प्लोररने बाजी मारली असून गुगल क्रोमला मात्र उतरती कळा लागली आहे .  ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात एक्स्प्लोररच्या डाऊनलोडिंगमध्ये ० . ६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर फायफॉक्सच्या डाऊनलोडिंग ० . ४५ टक्के घसरले आहे . तर क्रोमचे डाऊनलोडिंग तब्बल १ . ३१ टक्क्यांनी घसरले आहे . आश्चर्याची बाब म्हणजे सफारी या ब्राऊजरचे डाऊनलोडिंग ० . ०४ टक्के तर ओपेरा ब्राऊजरचे डाऊनलोडिंग ० . ०७ टक्क्यांनी वाढले आहे . सध्या इंटरनेट युजर्समधील निम्म्याहून अधिक युजर हे इंटरनेट एक्स्प्लोरर वापरत आहेत . नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार एक्स्प्लोरर हे ५४ . ७६ टक्के इतके वापरले जात आहे . उर्वरित टक्क्यांमध्ये इतर ब्राऊजर्सचा शेअर आहे . यात मॉझिला फायरफॉक्स आघाडीवर आहे . दोन महिन्यांपूर्वी लाँच झालेल्या विंडोज ८ या ऑपरेटिंग सिस्टिममुळे एक्स्प्लोररचा वापर वाढल्याचे निरिक्षण अभ्यासात नोंदविण्यात आले आहे . याचा फायदा एक्स्प्लोररच्या नवव्या आवृत्तीलाही झाला आहे .याचा वापर करणा - यांची संख्याही कमालीची वाढली आहे . नोव्हेंबर महिन्यात एक्स्प्लोरर नऊची युजर संख्या २० . ८० टक्के इतकी वाढली आहे . एक्स्प्लोररच्या नव्या व्हर्जन्समुळे जुन्या व्हर्जन्सचा वापर करणा - यांची संख्या घटत चालली आहे . पण नवीन व्हर्जन्समध्ये संख्यात्मक युजर्स अधिक असल्याचे निरिक्षणही यात नोंदविण्यात आले आहे .  क्राम आणि मॉझिल्याच्या ताज्या व्हर्जनपेक्षाही काही प्रमाणात मागसलेल्या असलेल्या एक्स्प्लोरर १०ची युजरसंख्या वाढणे हे सर्वांसाठीच आश्चर्यकारक होते . मात्र विंडोज ८सोबत हे एक्स्प्लोरर देण्यात आल्यामुळे याचा वापर करणा - यांची संख्या वाढल्याचे स्पष्ट होत आहे .  एक्स्प्लोररखालोखाल फायफॉक्स ब्राऊजर लोकप्रिय आहे . याचा वापर करणा - यांची संख्या नोव्हेंबर महिन्यात कमी झाली असली तरी जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत सर्वाधित युजर्सनी फायरफॉक्सची मदत घेतली आहे .फायरफॉक्स १७चा वापर वाढत असताना जुन्या व्हर्जन्सचा वापर मात्र कमी कमी होऊ लागला आहे . सध्या इंटरनेट युजर्समधील २० . ४४ युजर्स मॉझिलाचा वापर करतात तर १७ . २४ टक्के लोक हे क्रामचा वापर करतआहेत . क्रामच्या २३व्या आवृत्तीला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी त्यांना मॉझिलाचे आणि एक्स्प्लोररचे जाळे भेदणे कठीण आहे . यामुळे पुन्हा एकदा एक्स्प्लोररने आपली नवी आवृत्ती बाजारात आणून आपले अस्तित्त्व सिद्ध केले आहे . 

मोबाइलवर मिळेल हवे तेवढेच इंटरनेट

मोबाइलवरून इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे . मात्र , कनेक्ट होताना निर्माण होणाऱ्या अडचणी , वेग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिन्याच्या शेवटी येणारे अव्वाच्या सव्वा बिल , यामुळे मोबाइलवर इंटरनेट वापरताना बहुतेकांच्या पोटात गोळा येतोच . मात्र ,त्यावरही आता नामी उपाय पुढे आला असून , मोबाइलवरून इंटरनेट वापरताना पूर्ण कालावधीसाठी कनेक्शन असण्याची गरज उरणार नाही . एखादी माहिती हवी असल्यास , एका विशिष्ट नंबरवर एसएमएस पाठवा आणि हवी ती माहिती मिळवा , अशी कल्पना पुढे आली आहे . यातून विकीपिडिया, गुगल यांसारख्या वेबसाइटवरून मोबाइलवर माहिती मिळणे , शक्य होणार आहे . टेक्स्टवेब , गूगल आणि इनोजटेक्नॉलॉजीज् या कंपन्यांनी अशा प्रकारची सेवाही सुरू केली आहे .  समजा , आपल्याला टेक्स्ट वेबवरून एखादी माहिती हवी असल्यास , ९२४३३४२००० या क्रमांकावर एसएमएस पाठविणे गरजेचे आहे . दिवाळीविषयी माहिती हवी असल्यास @Wikipedia Diwali असा एसएमएस या क्रमांकावर पाठविता येईल . क्रिकेटविषयी माहिती हवी असल्यास @cricket असा एसएमएस पाठविल्यानंतर ,त्यावेळी सुरू असणा - या सर्व मॅचेसची माहिती सहज मिळू शकेल . अगदी एखाद्या शहरातील दोन ठिकाणांमध्ये जाण्यासाठी ऑटोरिक्षाने किती भाडे होईल , याचा अंदाजही या सेवेतून मिळू शकेल . तर गुगलच्या सेवेवरून तूर्तछोट्या शंकांची उत्तरे मिळत आहेत . कंपनीच्या ९७७३३००००० या क्रमांकावर शंका पाठविल्यास त्याचे उत्तर तुम्हाला येईल . यामध्ये डॉलरचा विनिमय दर , हवामान यासारख्या माहितीचा समावेश आहे . जर इनोजटेक्नॉलॉजीज्वरून माहिती हवी असेल तर अपेक्षित माहितीचा किवर्ड ५५४४४ या नंबरवर पाठवावा लागेल .  भारतामध्ये मोबाइलची संख्या वाढत आहे , या क्षेत्राच्या मार्केटनेही उड्डाणे घेतली आहेत . मात्र , इंटरनेटवापरातील अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे . बहुसंख्य हँडसेट हे फक्त कॉल आणि एसएमएस या वापरांसाठीच योग्य आहेत . स्मार्टफोनची संख्या वाढत असली , तरी इंटरनेटसाठीचे योग्य डाटाप्लॅन मिळत नाहीत . तसेच , या दोन्ही अडचणींचे समाधान झाल्यानंतरही , बँडविड्थ आणि महागडे दरयांमुळे या ग्राहकांचे समाधान झालेले नाही . या तीन मुख्य अडचणींमुळे मोबाइलचे इंटरनेट क्षेत्र या कंपन्यांना खुणावत होती आणि त्याचा फायदा उठविण्यासाठी या कंपन्या सज्ज झाल्या आहेत . 

इंटरनेटची साथ प्रगतीला

इंटरनेटमुळे मुले बिघडतात , त्यांच्यावर वाइट संस्कार होतात, लहान वयात त्यांना टेक्नॉलॉजी हाताळायला देऊ नये , असे आपल्याकडे नेहमी बोलले जाते . मात्र अमेरिकेत वॉशिंग्टन येथे करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे मुलांची प्रगती होते आणि त्यांची जबाबदारीची जाणीव वाढते , असे दिसून आले आहे . ' स्व ' ची जाणीव वृद्धिंगत होण्यासाठी टेक्नॉलॉजीचा कितपत उपयोग होतो , यावर मात्र या सर्व्हेतून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे .  ' डिजिटल मीडिया ' च्या तज्ज्ञ आणि इन्फर्मेशन स्कूलमधील सहाय्यक प्राध्यापिका केटी डेविस यांनी ३२किशोरवयीन मुलांच्या मुलाखती घेतल्या . १३ ते १८ या वयोगटातील मुलामुलींना त्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले. या सर्व्हेसाठी त्यांनी बर्मुडा बेट निवडले . तेथील मुलांच्या टेक्नॉलॉजी हाताळण्याच्या सवयी अमेरिकेतील मुलांप्रमाणेच आहेत .  मित्रांशी संवाद साधण्यासाठी या माध्यमांचा वापर कशा पद्धतीने करता , अशा प्रकारचे प्रश्न मुलांना विचारण्यात आले . त्यांना जी उत्तरे मिळाली , त्यावरून मोबाईल , इंटरनेट यांचा वापर किशोरवयीन मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि या मुलांना घडवण्यात या टेक्नॉलॉजीचाही बराच वाटा आहे , याची जाणीव त्यांना झाली .९४ टक्के मुलांकडे सेल फोन आहेत . त्यातील ५३ टक्के मुलांकडे इंटरनेट आहे . ९१ टक्के मुलांचे फेसबुक प्रोफाइल्सआहे .  ७८ टक्के जणांकडे ' एमएसएन ', ' एओएल ' किंवा स्काइप या ' ऑनलाइन इन्स्टंट मेसेजिंग ' सुविधा आहेत . ९४टक्के मुले यू - ट्यूब वापरतात आणि ९ टक्के मुले ट्विटर वापरतात . या माध्यमांद्वारे ते नेमका कोणता संवाद साधतात , याबद्दल डेविस यांनी मुलांना विचारले आणि त्यांच्या वेगवेगळ्या अशा दोनशे उत्तरांचे विश्लेषण केले .वैयक्तिक समस्या आणि एखाद्याबद्दल आपल्याला काय वाटते , याविषयी फारसे बोलले गेले नाही .  होमवर्क आणि दिवसभरात आपण काय केले , याविषयी मात्र बरेचसे बोलले गेले . अशा प्रकारचे संभाषण मुलांचे दिवसभर चालते . कॉलेज आणि जेवणाच्या वेळेला मात्र हा ऑनलाइन संवाद बंद असतो . ६८ टक्के कम्युनिकेशन फेसबुकवरून चालते . कुठला फोटो अपलोड केला आहे , यू - ट्यूबवर काय पाहण्यासारखे यांसारख्या संवादातून किशोरवयीन मुले ' कनेक्टेड ' राहतात . ६९ टक्के मुले भावनिक गप्पा मारताना दिसतात . त्यात मुलींचे प्रमाण अधिक आहे .  भावनिक गुंता सोडवण्यामागे आपला मित्र - मैत्रीण आपल्याला मदत करेल , अशी भावना त्यांच्यामध्ये असते .प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा डिजिटल कम्युनिकेशनच ही मुले अधिक पसंत करतात . टेक्नॉलॉजीपासून आपण दूर जाऊ नये ,यासाठी ते सतत स्वतःला अपडेट ठेवतात . या टेक्नॉलॉजीमुळे मुले बाह्यतः बरीच प्रगती करतील . इतरांना ओळखायला शिकतील ; पण ' स्व ' ची अनुभूती अर्थात ' स्व ' ची जाणीव यांतून नेमकी किती तयार होईल , हे मात्र आताच सांगता येणार नाही , असे डेविस यांनी सांगितले . नोव्हेंबरमधील ' अॅडॉल्सन्स ' या जर्नलमध्ये हे संशोधनप्रसिद्ध होणार आहे .  ।।।-----------       महाराष्ट्र  टाइम्स  

Page 30 of 32 1 29 30 31 32
ADVERTISEMENT
error: Content is protected!