MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

इंटरनेट एक्स्प्लोररची दहावी आवृत्ती पास

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 5, 2012
in इंटरनेट, सॉफ्टवेअर्स
ADVERTISEMENT


नोव्हेंबर महिना वेब ब्राऊजर्सच्या स्पर्धेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरला आहे . या महिन्यात तीन बड्या कंपन्यांनी आपल्या ब्राऊजर्सचया नवीन आवृत्या बाजारात आल्या आहेत . यात इंटरनेट एक्स्प्लोररची १०वी आवृत्ती मॉझिला फायरफॉक्स १७ आणि गुगल क्रोम २३ यांचा समावेश आहे . यात इंटरनेट एक्स्प्लोररने बाजी मारली असून गुगल क्रोमला मात्र उतरती कळा लागली आहे . 


ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात एक्स्प्लोररच्या डाऊनलोडिंगमध्ये ० . ६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर फायफॉक्सच्या डाऊनलोडिंग ० . ४५ टक्के घसरले आहे . तर क्रोमचे डाऊनलोडिंग तब्बल १ . ३१ टक्क्यांनी घसरले आहे . आश्चर्याची बाब म्हणजे सफारी या ब्राऊजरचे डाऊनलोडिंग ० . ०४ टक्के तर ओपेरा ब्राऊजरचे डाऊनलोडिंग ० . ०७ टक्क्यांनी वाढले आहे . सध्या इंटरनेट युजर्समधील निम्म्याहून अधिक युजर हे इंटरनेट एक्स्प्लोरर वापरत आहेत . नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार एक्स्प्लोरर हे ५४ . ७६ टक्के इतके वापरले जात आहे . उर्वरित टक्क्यांमध्ये इतर ब्राऊजर्सचा शेअर आहे . यात मॉझिला फायरफॉक्स आघाडीवर आहे . दोन महिन्यांपूर्वी लाँच झालेल्या विंडोज ८ या ऑपरेटिंग सिस्टिममुळे एक्स्प्लोररचा वापर वाढल्याचे निरिक्षण अभ्यासात नोंदविण्यात आले आहे . याचा फायदा एक्स्प्लोररच्या नवव्या आवृत्तीलाही झाला आहे .याचा वापर करणा – यांची संख्याही कमालीची वाढली आहे . नोव्हेंबर महिन्यात एक्स्प्लोरर नऊची युजर संख्या २० . ८० टक्के इतकी वाढली आहे . एक्स्प्लोररच्या नव्या व्हर्जन्समुळे जुन्या व्हर्जन्सचा वापर करणा – यांची संख्या घटत चालली आहे . पण नवीन व्हर्जन्समध्ये संख्यात्मक युजर्स अधिक असल्याचे निरिक्षणही यात नोंदविण्यात आले आहे . 


क्राम आणि मॉझिल्याच्या ताज्या व्हर्जनपेक्षाही काही प्रमाणात मागसलेल्या असलेल्या एक्स्प्लोरर १०ची युजरसंख्या वाढणे हे सर्वांसाठीच आश्चर्यकारक होते . मात्र विंडोज ८सोबत हे एक्स्प्लोरर देण्यात आल्यामुळे याचा वापर करणा – यांची संख्या वाढल्याचे स्पष्ट होत आहे . 


एक्स्प्लोररखालोखाल फायफॉक्स ब्राऊजर लोकप्रिय आहे . याचा वापर करणा – यांची संख्या नोव्हेंबर महिन्यात कमी झाली असली तरी जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत सर्वाधित युजर्सनी फायरफॉक्सची मदत घेतली आहे .फायरफॉक्स १७चा वापर वाढत असताना जुन्या व्हर्जन्सचा वापर मात्र कमी कमी होऊ लागला आहे . सध्या इंटरनेट युजर्समधील २० . ४४ युजर्स मॉझिलाचा वापर करतात तर १७ . २४ टक्के लोक हे क्रामचा वापर करतआहेत . क्रामच्या २३व्या आवृत्तीला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी त्यांना मॉझिलाचे आणि एक्स्प्लोररचे जाळे भेदणे कठीण आहे . यामुळे पुन्हा एकदा एक्स्प्लोररने आपली नवी आवृत्ती बाजारात आणून आपले अस्तित्त्व सिद्ध केले आहे . 
Tags: BrowserInternetSoftwares
ShareTweetSend
Previous Post

चिनी ड्रॅग्रनला भारत देणार ‘सुपर’ झटका

Next Post

मोबाईल चार्ज करणारे बोन्साय झाड

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
Google Chrome Ver 100

गूगल क्रोमची १०० वी आवृत्ती नव्या लोगोसह उपलब्ध!

March 30, 2022
Baby Shark YouTube

बेबी शार्क यूट्यूब व्हिडिओचे तब्बल १,००० कोटी व्ह्यूज पूर्ण!

January 17, 2022
Adobe Photoshop Web

अडोबी फॉटोशॉप आता वेबसाइटद्वारे ब्राऊजरमध्येच वापरा!

October 27, 2021
Next Post
मोबाईल चार्ज करणारे बोन्साय झाड

मोबाईल चार्ज करणारे बोन्साय झाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022
Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
Xbox Games Showcase

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

June 13, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

ॲपल WWDC 2022 : iOS 16, iPadOS 16, macOS Ventura अपडेट्स सादर

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!