Tag: Apps

संगीतातील दिग्गज अँड्रॉइडवर

पं. कुमार गंधर्व यांच्यापासून ते गझलगायक जगजितसिंग यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या संगीताचा आनंद, त्यांच्याविषयी माहिती आता एका टॅबच्या टप्प्यात आली आहे. नाशिकच्या वैभव महाजन या संगीतप्रेमी इंजिनीअर तरुणाने भारतीय संगीतातील काही दिग्गज कलावंत अँड्रॉइडअॅप्लिकेशनच्या माध्यमातून स्मार्टफोनवर आणले असून, ही अॅप्लिकेशन विनामूल्य डाउनलोड करता येतात. व्यवसायाने इंजिनीअर असलेल्या महाजनची 'आबराका डाबरा सॉप्टवेअर सोल्युशन्स' ही कंपनी आहे. तो स्वतः संगीताचे चाहता असून, गेली काही वर्षे तबल्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेत आहे. नोकरीच्या निमित्ताने काही वर्षं पुण्यात आणि युरोपमध्ये वास्तव्य केल्यानंतर आता तो नाशिकमध्ये राहातो.गेल्या वर्षभरात त्याने पं. कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी, कौशिकी चक्रवर्ती, पं. जितेंद्र अभिषेकी,तबलावादक आदित्य कल्याणपूर, ध्रुपद गायक पं. उल्हास कशाळकर, गझलगायक जगजितसिंग या दिग्गज कलाकारांची अँड्रॉइड अॅप्लिकेशन्स तयार केली आहेत.या अॅप्लिकेशनविषयी माहिती देताना महाजन म्हणाले, 'सध्या इंटरनेटमुळे कोणाचीही माहिती मिळू शकते. मात्र, ती एकगट्ठा पद्धतीने उपलब्ध होत नाही. या अॅप्लिकेशनमुळे संगीतप्रेमींना या कलाकारांविषयीची माहिती एकाच ठिकाणी मिळू शकेल. बदलत्या काळात अँड्रॉइड मार्केट ही मोठी क्रांती ठरली आहे. संगीत क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिलेल्या देशविदेशातील महत्त्वाच्या कलाकारांसाठी हे माध्यम व्यासपीठ ठरावे असा प्रयत्न आहे. सध्या वाढत असलेल्या स्मार्टफोनच्या वापरामुळे अशा अॅप्लिकेशनच्या माध्यमातून अनेक कलाकार लोकांसमोर येऊ शकतील.'या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून त्याने या कलाकारांविषयी इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती,व्हीडिओ, गाणी, फोटो एकत्र केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही अॅप्लिकेशन विनामूल्य आहेत.'आता त्यांना ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज, गायक वसंतराव देशपांडे, शौनक अभिषेकी, संगीतकार शांतनू मोईत्रा, ज्येष्ठ तबलावादक योगेश सम्सी या कलाकारांचीही अॅप्लिकेशन करण्याची इच्छा आहे.'या अॅप्लिकेशन्सना अँड्रॉइड मार्केटवर चांगला प्रतिसादही मिळू लागला असून, हजारांच्या घरात डाउनलोड झाले आहेत. तसेच वापरणाऱ्यांनी त्याबाबत चांगल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. येत्या काही कालावधीत वैभव हीच अॅप्लिकेशन अँड्रॉइडसह ब्लॅकबेरी आणि आयफोनवरही उपलब्ध करून देणार आहे.

स्मार्ट गुगली मॅप्स प्ले स्टोर हँगआउट्स गुगल+ गेमिंग

इंटरनेट जगतात सर्वत्र आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुगल नुकतेच आपले भविष्यातील प्लॅन्स जाहीर केले आहेत. त्यांच्या सध्याच्याच सुविधांमध्ये ...

सोबत अॅप्सची

आपण कुठेही बाहेर पडलो की , सोबत आपला स्मार्टफोन हा असतोच. या फोनमध्ये ढिगाने अॅप्स असतात. पण आपण कुठे अडचणीत सापडलो , तर हीसर्व अॅप्स ...

बीबीएम- ब्लॅकबेरी मेसेजिंग अॅपल आणि अँड्रॉइडवरही!

                    आतापर्यंत ब्लॅकबेरीची ऑपरेटिंग सिस्टिम , बीबीएम यांसारख्या सुविधांचा अनुभव फक्त ब्लॅकबेरीधारकांनाच घेता येत होता . त्या जोरावर ब्लॅकबेरीने कित्येक वर्षे वर्चस्व गाजवले . पण आता अॅपल आणि अँड्रॉइड वापरणाऱ्यांनाही बीबीएमचा मोफत लाभ घेता येणार आहे . त्यामुळे व्हॉट्सअॅप किंवा आयमेसेज सारख्या सेवांचा वापर कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे . असे असले तरी या क्रॉस फंक्शनालिटीमुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवे पर्व सुरू होणार आहे , हे मात्र निश्चित .                      ...

Page 38 of 44 1 37 38 39 44
ADVERTISEMENT
error: Content is protected!