MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

एमएसऑफिस आयफोनवर

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 7, 2013
in ॲप्स
ifone.jpgतंत्रज्ञानाचे जाळे जसजसे वाढत जाईल , तसे कम्प्युटर , लॅपटॉप , टॅब्लेट , स्मार्टफोन हे सगळे एकाच माळेतले वेगवेगळ्या आकारातील मणी वाटतील, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही . टीव्ही ,कम्प्युटर , इंटरनेट या तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीमधील पायऱ्याच आहेत . स्मार्टफोनवर इंटरनेट पाहता येईल, सर्च करता येईल , असे कुणालाही वाटले नव्हते ; पण तसे झाले . आता आणखी एक वरची पायरी या क्षेत्रात येऊ घातलीय . ती म्हणजे ‘ अॅपल ‘ च्या आयफोनवर मायक्रोसॉफ्ट ऑफिसची सॉफ्टवेअर वापरता येणार आहेत . वर्ड , एक्सेल , पॉवरपॉइंट आयफोनवरही वापरता येणार आहे . वेगवेगळी सॉफ्टवेअर स्मार्टफोनवर वापरता येतील , याकडेच तंत्रज्ञानाची वाटचाल सुरू आहे . 

आयफोनवरील सॉफ्टवेअरच्या वापरासाठी कंपनी कुठलेही नवे व्हर्जन तयार करणार नाही ; तसेच अॅन्ड्रॉइड व्हर्जनसाठी वेगळी ‘ अॅप ‘ बनवणार नाही . ‘ मायक्रोसॉफ्ट ‘ ची विंडोज सिस्टीम असणाऱ्या टॅब्लेट कम्प्युटरवर ही सॉफ्टवेअर्स वापरता येणार आहेत . मोबाइलसाठी बनवण्यात आलेला ‘ ऑफिसमोबाइल ‘ चा सूट अॅपलच्या ‘ अॅप ‘ स्टोअरमध्ये ‘ फ्री ‘ उपलब्ध आहे ; मात्र त्यासाठी दर वर्षाला ‘ऑफिस ३६५ ‘ विकत घ्यावे लागणार आहे . ‘ ऑफिस ३६५ ‘ असेल , तर मॅक असलेल्या कम्प्युटरवर आणि विंडोज कम्प्युटरवर ते वापरता येईल . ‘ ऑफिस ‘ चे पॅकेज असेल , तर वेगवेगळ्या कम्प्युटरवर ते चालवता येईल ; तसेच त्याचे अपडेटही मिळतील . 

कम्प्युटरवरच्या फाइल आयफोनवर ओपन करता येतील . केवळ ‘ हेवी वर्क ‘ त्यामध्ये करता येणार नाही . मोठे ग्राफिक , एखादा मोठा प्रबंध आणि त्याचे पूर्ण डिझाइन करायचे असेल , तर कम्प्युटरशिवाय पर्याय नाही ; मात्र छोट्या कामांसाठी ‘ आयफोन ‘ वापरता येईल . मेल करणे ,फाइलमध्ये छोटासा बदल करणे , काही शब्द वाढवणे , काढणे , प्रेझेंटेशन सादर करण्यासारख्या गोष्टी आयफोनवरील ‘ ऑफिस सॉफ्टवेअर ‘ मध्ये करता येतील . कम्प्युटरवरील फाइल आयफोनवर ऑटोमेटिक रिसाइज होतील . आयफोन अॅपमुळे कम्प्युटरवर तयार करण्यात आलेले चार्ट ,अॅनिमेशन आणि इतर माहितीमध्ये काहीही बदल होणार नाही . अमेरिका सोडून इतर देशांत लवकरच हे प्रॉडक्ट उपलब्ध होणार आहे . 

एकंदरीतच कम्प्युटरचा आकार स्मार्टफोनपर्यंत लहान होत चाललाय , असे म्हटले , तर ते चुकीचेठरणार नाही . कम्प्युटरवरील सगळी अॅप्लिकेशन आता हळूहळू स्मार्टफोनवरही करता येत आहेत .इंटरनेट , ऑफिस सॉफ्टवेअर , गाणी ऐकणे , व्हिडिओ यांसारख्या फॅसिलिटी स्मार्टफोनवरही आहेत .फरक आहे , तो केवळ काम करण्याच्या क्षमतेचा . हा फरकही आगामी काळात पुसट होत जाऊन ‘युनिव्हर्सल पॅकेज ‘ असलेले एकच डिव्हाइस बाजारात येईल , अशी कल्पना करायला तूर्तास तरी हरकत नाही ! 

ADVERTISEMENT
Tags: AppleAppsiOSiPhoneMicrosoftOffice
ShareTweetSend
Previous Post

मेसेंजर आपला आपला

Next Post

जीपीएससाठी नवा उपग्रह

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
Next Post

जीपीएससाठी नवा उपग्रह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech