MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

संगीतातील दिग्गज अँड्रॉइडवर

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 5, 2013
in ॲप्स
पं. कुमार गंधर्व यांच्यापासून ते गझलगायक जगजितसिंग यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या संगीताचा आनंद, त्यांच्याविषयी माहिती आता एका टॅबच्या टप्प्यात आली आहे. नाशिकच्या वैभव महाजन या संगीतप्रेमी इंजिनीअर तरुणाने भारतीय संगीतातील काही दिग्गज कलावंत अँड्रॉइडअॅप्लिकेशनच्या माध्यमातून स्मार्टफोनवर आणले असून, ही अॅप्लिकेशन विनामूल्य डाउनलोड करता येतात.


व्यवसायाने इंजिनीअर असलेल्या महाजनची ‘आबराका डाबरा सॉप्टवेअर सोल्युशन्स’ ही कंपनी आहे. तो स्वतः संगीताचे चाहता असून, गेली काही वर्षे तबल्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेत आहे. नोकरीच्या निमित्ताने काही वर्षं पुण्यात आणि युरोपमध्ये वास्तव्य केल्यानंतर आता तो नाशिकमध्ये राहातो.गेल्या वर्षभरात त्याने पं. कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी, कौशिकी चक्रवर्ती, पं. जितेंद्र अभिषेकी,तबलावादक आदित्य कल्याणपूर, ध्रुपद गायक पं. उल्हास कशाळकर, गझलगायक जगजितसिंग या दिग्गज कलाकारांची अँड्रॉइड अॅप्लिकेशन्स तयार केली आहेत.

या अॅप्लिकेशनविषयी माहिती देताना महाजन म्हणाले, ‘सध्या इंटरनेटमुळे कोणाचीही माहिती मिळू शकते. मात्र, ती एकगट्ठा पद्धतीने उपलब्ध होत नाही. या अॅप्लिकेशनमुळे संगीतप्रेमींना या कलाकारांविषयीची माहिती एकाच ठिकाणी मिळू शकेल. बदलत्या काळात अँड्रॉइड मार्केट ही मोठी क्रांती ठरली आहे. संगीत क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिलेल्या देशविदेशातील महत्त्वाच्या कलाकारांसाठी हे माध्यम व्यासपीठ ठरावे असा प्रयत्न आहे. सध्या वाढत असलेल्या स्मार्टफोनच्या वापरामुळे अशा अॅप्लिकेशनच्या माध्यमातून अनेक कलाकार लोकांसमोर येऊ शकतील.’

या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून त्याने या कलाकारांविषयी इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती,व्हीडिओ, गाणी, फोटो एकत्र केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही अॅप्लिकेशन विनामूल्य आहेत.

‘आता त्यांना ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज, गायक वसंतराव देशपांडे, शौनक अभिषेकी, संगीतकार शांतनू मोईत्रा, ज्येष्ठ तबलावादक योगेश सम्सी या कलाकारांचीही अॅप्लिकेशन करण्याची इच्छा आहे.’

या अॅप्लिकेशन्सना अँड्रॉइड मार्केटवर चांगला प्रतिसादही मिळू लागला असून, हजारांच्या घरात डाउनलोड झाले आहेत. तसेच वापरणाऱ्यांनी त्याबाबत चांगल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. येत्या काही कालावधीत वैभव हीच अॅप्लिकेशन अँड्रॉइडसह ब्लॅकबेरी आणि आयफोनवरही उपलब्ध करून देणार आहे.

ADVERTISEMENT
Tags: AppsIndiaMusicVaibhav Mahajan
ShareTweetSend
Previous Post

SMS करा, रेल्वे तिकीट मिळवा! Book rail tickets via a sms on mobile

Next Post

मेसेंजर आपला आपला

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Next Post

मेसेंजर आपला आपला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech