Tag: Apps

उत्तर एका क्लिकवर :(आस्क अ क्वेश्चन अॅप ) उत्तर देतील ते थेट आयआयटीमधील तज्ज्ञ प्रोफेसर्स

अभ्यास करताना एखाद्या प्रॉब्लेमपाशी येऊन तुमची गाडीअडलीय ... डोंट वरी . इथेही तुमच्या मदतीला अॅप धावूनआलंय . तुमच्या कम्प्युटर किंवा स्मार्टफोनच्या माध्यमातूनतज्ज्ञ प्राध्यापकांकडून एका क्लिकवर तुम्ही तुमच्या प्रश्नाचंउत्तर मिळवू शकता . हे शक्य झालंय मुंबई आयआयटीच्या 'आस्क अ क्वेश्चन ' या उपक्रमातून .  तुम्ही इंजिनीअरिंगचा अभ्यास करत आहात आणि तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर काही केल्या मिळत नाहीय . पण ,घाबरु नका . फक्त तुमचा स्मार्टफोन सुरू करा . ' आस्क अक्वेश्चन ' नावाचं अॅप सुरू करा आणि तुमचा प्रश्न पोस्ट करा . इतकचं नाही तर तुम्ही तुमचा प्रश्न ' ट्विट ' ही करूशकता . याला उत्तर देतील ते थेट आयआयटीमधील तज्ज्ञ प्रोफेसर्स . यात काहीही आश्चर्य वाटून घ्यायचं कारणनाही , हे खरं आहे . हे प्राध्यापक ई - मेलद्वारे तुमच्या प्रश्नाचं उत्तर कळवतील किंवा थेट तुमच्याशी संवादहीसाधतील .  यामुळे आता इंजिनीअरिंगच्या जाडजूड पुस्तकात डोकं खुपसल्यानंतर पडणा - या हजारो प्रश्नांची मुद्देसुद आणितांत्रिकदृष्ट्या योग्य अशी बिनचूक उत्तरं तुम्हाला सहज मिळू शकणार आहे . कोणत्याही प्रकारचा प्रश्न पडल्यासत्यात खूप वेळ न घालवता किंवा मित्र - मैत्रिणींना विचारण्यात वेळ न घालवता प्रश्न इथं पोस्ट करा . म्हणजेतुम्हाला उत्तर हमखास मिळणार हे ‌ निश्चित . आयआयटीसारख्या संस्थेत सर्वांनाच प्रवेश मिळत नाही .प्रत्येकाला चांगल्या प्राध्यापकांचं मार्गदर्शन मिळेल याची खात्री नाही . तसंच अभ्यास करता - करताविद्यार्थ्यांच्या मनात अनेक शंका येऊ शकतात . याच गोष्टी लक्षात घेऊन मुंबई आयआयटीने ११ नोव्हेंबर २०१०रोजी ' राष्ट्रीय शिक्षण दिना ' च्यानिमित्ताने ' आस्क अ क्वेश्चन ' नावाचा हा उपक्रम सुरू केला . या उपक्रमांतर्गतइंजिनीअरिंगचा अभ्यास करणारा कोणताही विद्यार्थी आपला प्रश्न आयआयटीच्या प्राध्यापकांना विचारू शकणारआहे . आठवड्याभरात येणा - या प्रश्नांपैकी काही प्रश्नांना प्राध्यापक ई - मेलद्वारे उत्तरं देतात तर काही प्रश्न जेसार्वत्रिक असू शकतात अशा प्रश्नांची उत्तर दर गुरूवारी संध्याकाळी ४ ते ५ यावेळात होणा - या लाइव्हकार्यक्रमात दिली जातात .  वेबकास्टिंगद्वारे पाहता येणा - या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना थेट सहभागीही होता येतं . या कार्यक्रमाचानुकताच १००वा भाग पूर्ण झाला . यानिमित्ताने ' आस्क अ क्वेश्चन ' चे अँड्रॉइड अॅप्लिकेशन आणि ' अॅप्लिकेशनप्रोग्रामिंग इंटरफेस '( एपीआय ) लाँच करण्यात आले आहे . याचं अँड्रॉइड अॅप हे आता गुगल प्ले स्टोअरमध्येमोफत उपलब्ध झालं आहे . तर याचा ' एपीआय ' म्हणजे आपण एकदा का हे प्रोग्रामिंग आपल्या कम्प्युटरवरलोड केलं की , त्याचा एक छोटा टूलबार आपल्याला दिसतो . आपल्याला प्रश्न पडला की , त्या टूलबारवर क्लिककरायचं आणि आपला प्रश्न पोस्ट करायचा . म्हणजे अगदी ट्विट केल्यासारखा आपला प्रश्न काही शब्दांत मांडूनतो थेट ' आस्क अ क्वेश्चन ' च्या बँकमध्ये जाऊन पडतो . आतापर्यंत ७५ शैक्षणिक संस्थांमधील ३६ हजारविद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे . या उपक्रमाच्या १००व्या कार्यक्रमानिमित्त १४०० प्रश्नांची एक बँकहीप्रसिद्ध करण्यात आली आहे . तसंच १२ मार्च ते २६ मार्च या कालावधीत एक ' क्वेश्चनोथॉन ' घेण्यात आली होती, ज्यात सुमारे तीन हजार प्रश्न जमा झाले आहेत . ही सुविधा सध्या इलेक्ट्रिकल , इलेक्ट्रॉनिक्स , इलेक्ट्रॉनिक्सअॅण्ड कम्युनिकेशन , इंस्ट्रूमेंटेशन , इंडस्ट्रिअल इलेक्ट्रॉनिक्स , पॉवर सिस्टिम , इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी , मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स या शाखांसाठी सुरू आहे . उपक्रमाची माहिती आणि अधिक तपशीलासाठी http://www.ask.co-learn.in/ वर लॉगइन करा .  असा विचारा प्रश्न  तुमचा प्रश्न तुम्ही ई - मेल करू शकता . यासाठी प्रश्न  3t.aaq @iitb.ac.in वर ई - मेल करा .  तुमच्याकडे स्मार्टफोन नसेल तर तुम्ही तुमचा प्रश्न एसएमएसही करू शकता . यासाठी तुमचा एसएमएस९७६९७९४५२५ वर पाठवा .  ' आस्क अ क्वेश्चन ' नावाचं एक फोरम आहे . यात तुम्ही तुमचा प्रश्न पोस्ट करू शकता . यासाठी  http://www.ask.co-learn.in/forum/ वर लॉगइन करा .  अँड्रॉइड अॅपच्या माध्यमातून आणि एपीआयच्या माध्यमातून तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता . नीरज पंडित 

होळी ‘अॅप’

प्रत्येक सणाच्यानिमित्ताने नव्याने काही तरी येत असतचं. इतकी वर्षे नव्या वस्तू बाजारात येत होत्या , आता अॅप्सही बाजारात येऊ लागले आहेत. नोकियाने ...

भारतीयांच्या कल्पक अ‍ॅप्सने सजले नोकियाचे अ‍ॅप स्टोअर

भारतीयांच्या कल्पक अ‍ॅप्सने सजले नोकियाचे अ‍ॅप स्टोअर

नोकिया स्टोअरमध्ये असलेल्या विविध अ‍ॅपमध्ये जागतिक पातळीवर भारतीय अ‍ॅप विकासकांनी आघाडी घेतली आहे. या स्टोअरमध्ये असलेल्या जवळपास 1 लाख 20 ...

बिल कमी करणारे ‘स्मार्ट’ अॅप्स’ स्कायपे निंबूझ वुई चॅट

बिल कमी करणारे ' स्मार्ट ' अॅप्स '  एसएमएस , फोन कॉल्स , व्हिडीओ कॉल्स या सर्वांमुळे आपले मोबाइलचे बिलाचे आकडे इतक्या झपाट्याने वाढतात की , ते आपल्या लक्षातही येत नाहीत . पण आपला फोन स्मार्ट असेल तर आपण आपले बिल नक्कीच कमी करू शकतो . अँड्रॉइड किंवा आयओएसवर चालणाऱ्या अॅप्सची त्यासाठी मदत होईल . आपले बिल वाचविणारे काही अॅप्स ...  फ्री कॉलिंगला वाढती पसंती स्कायपे  तसं हे फेमस अॅप आहे . बहुतांश स्मार्टफोन यूजर्स हे अॅप वापरतच असतील . हे अॅप मोबाइल आणि डेस्कटॉप अशा दोन्हीकडे वापरता येऊ शकते . स्कायपेवरून आपण फ्री व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग करू शकते . यावरून आपल्याला फोन्स किंवा व्हिडीओ कॉल्स करायचे असतील तर आपल्या मित्रांचे किंवा कुटुंबीयांचे अकाऊंट त्यात अॅड करून घ्यावे लागते . यानंतर आपण त्या व्यक्तींना एक रुपयाही खर्च न करता फोन करू शकतो किंवा व्हिडीओ कॉलिंग करू शकतो . याचा वापर आपण इन्स्टंट मेसेंजिंगसाठीही करू शकतो. याद्वारे आपण फोटोही शेअर करू शकतो . Download Skype निंबूझ  इन्स्टंट मेसेंजिंग इंटीगेटर म्हणून सुरू झालेल्या निंबूझ या अॅपचा वापर आता खूप मोठ्या प्रमाणावर होऊ लागलाआहे . हे अॅप आता कम्प्युटर , स्मार्टफोन आणि फीचर फोन यामध्ये वापरू शकतो . निंबूझ ते निंबूझ यूजरसोबतआपण व्हॉइस कॉल्स आणि व्हीडिओ कॉल्स करू शकतो . कम्प्युटर , अँड्रॉइड , आयओएस आणि सिंबियन याऑपरेटिंग सिस्टिमवरून आपण वॉइस कॉल्स करू शकतो तर आयओएस आणि कम्प्युटरवरून व्हिडीओ कॉल्सकरू शकतो . याशिवाय या अॅपवरून आपण चॅटिंगही करू शकतो . Download Nimbuzz ओवू  तुम्हाला तुमच्या ग्रुप्सशी काही गोष्टी शेअर करायच्या आहेत ‌‌ किंवा त्यांच्याशीच चॅटिंग करायचं आहे तर तुम्हीओवू हे अॅप वापरू शकता . या अॅपच्या माध्यमातून आपण ग्रुप व्हिडीओ चॅट करू शकतो . यामध्ये आपणएकावेळी १२ जणांशी बोलू शकतो . हे अॅप आपल्याला स्मार्टफोन आणि कम्प्युटर्सवर उपलब्ध आहे . याचबरोबरआपण या माध्यमातून फेसबुक फ्रेंडस ‌ आणि ट्विटरच्या फॉलवर्सशी व्हिडीओ आणि व्हॉइस कॉल्स करू शकतो . हेअॅप आपल्याला चॅटिंगसाठी खूप फायदेशीर ठरू शकणार आहे .  वुई चॅट  वुई चॅट हे अॅप्लिकेशन आपल्याला व्हिडीओ कॉलिंगची सुविधा देते . यामध्ये आपल्याला व्हॉइस चॅटची सुविधाआहे . पण यातून आपण व्हॉइस कॉलिंग करू शकणार नाही . व्हॉइस चॅटच्या माध्यमातून आपण व्हॉइस मेसेजेसपाठवू शकतो . याशिवाय यामध्ये आपल्याला ग्रुप टेक्स्ट चॅट्स , मल्टिमीडिया शेअरिंग आणि ब्राऊजर्सच्यामाध्यमातून चॅट करू शकतो . यात ' लूक अराऊंड ' नावाचं एक फीचर आहे , ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्याआसपास असलेल्या वूई चॅट यूजर शोधून त्याच्याशीही आपण चॅटिंग करू शकतो  Download WeChat.  फ्रिंग  स्कायपेशी साधर्म्य साधारणारे हे अॅप सध्या बाजारात चांगलेच चालत आहे . अँड्रॉइड , आयओएस आणि सिंबियनऑपरेटिंग सिस्टिमवर वापरता येणार आहे . यामध्ये आपण व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल्स करू शकणार आहोत .हे कॉल्स करण्यासाठी समोरच्या व्यक्तीकडेही फ्रिंग असणे आवश्यक आहे . यात तुम्ही चॅट करू शकतातयाचबरोबर तुम्ही मल्टीमीडिया कंटेन्टही आपण शेअर करता येऊ शकणार आहे . याशिवाय यात तुम्हाला ग्रुपव्हिडीओ प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत .. Download ...

Page 40 of 44 1 39 40 41 44
ADVERTISEMENT
error: Content is protected!