Tag: Apps

फ्री कॉलिंगला वाढती पसंती

स्वस्त कॉलिंगचा मोसम सरल्यानंतर आता टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा , त्यानंतर झालेला स्पेक्ट्रमचा लिलाव , ३ जी यासारख्या बाबींमुळे मोबाइलचे कॉलरेट पुन्हा वाढू लागले आहेत. ...

मोबाइल खिलाडी मोबाइल गेम्स

कम्प्युटर गेम्सनी गेमिंग मार्केटमध्ये झालेल्या भरगच्च उलाढालीनंतर आता टॅबलेट्स आणि स्मार्ट फोनमध्ये गेमिंगची लाट सुरू झाली. सरत्या वर्षांत या गेम्सनी ...

सुरक्षा ‘अॅप’ल्याच हाती…महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत विशेष काळजी

तरुणींवर होणाऱ्या अत्याचारांच्या विविध घटनांच्या बातम्या सातत्याने येत आहेत. यामुळे महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत विशेष काळजी घेतली जाऊ लागली आहे. समाजातील ...

व्हॉट अॅन अॅप!

इन्स्टन्ट मेसेज सेवेने गेल्या दोन वर्षांमध्ये सर्वांच्या मोबाइलमध्ये स्थान मिळवलं आहे . यामुळे मूळच्या एसएमएस सेवेला मोठा धक्का बसला आहे . सुरुवातीला ही इन्स्टन्ट मेसेजिंग सेवा काही मर्यादित फोन्सवर उपलब्ध होती . मात्र , कालांतराने मोबाइलचे अवतार बदलत गेले आणि नवनवीन ऑपरेटिंग सिस्टीम बाजारात आल्या . यामुळे विविध अॅप्स बाजारात आले . यात व्हॉटस्अॅप हे सर्वांच्या पसंतीचे ठरले आहे .  भारतातील ५२ टक्के स्मार्टफोन युजर्स व्हॉटस्अॅपचा वापर करतात तर उर्वरित लोक फेसबुक मेसेंजर सेवेचा वापर करत आहेत . फेसबुकने आपलं अँण्ड्रॉईड मेसेंजर बाजारात आणलं आहे . पण त्यात सध्या फेसबुकच्या फ्रेंड लिस्टमधील लोकांशीच आपण बोलू शकतो . हा मेसेंजर बाजारात आल्यावर तो व्हॉटस्अॅपला टक्कर देईल , अशी भाकीते रंगवली गेली होती . पण प्रत्यक्षात तसं झालेलं नाही . थिंक डीजिट या साप्ताहिकाने केलेल्या सर्वेक्षणातही बाब समोर आली आहे . यामध्ये सध्याचे भारतातील स्मार्टफोन युजर्स कोणते मेसेंजर वापरतात आणि त्यांचे त्यावरचे म्हणणे काय आहे याचा पूर्ण विचार करण्यात आला आहे .  या सर्वेक्षणानुसार भारतातील स्मार्टफोन युजर्सपैकी २५ टक्के युजर्स कोणत्याही प्रकारची मेसेजिंग सेवा वापरातनाहीत . ५२ टक्के लोक व्हॉटस्अॅप वापरतात तर , १४ टक्के लोक फेसबुक मेसेंजर वापरतात . ९ टक्के लोक फेसबुक मेसेंजर अँड्रॉईड व्यतिरिक्त इतर ऑपरेटिंग सिस्टीममध्ये वापरता येईल याची वाट पाहत आहेत . फेसबुक मेसेंजरमधील मर्यादा आणि इतर बाबी लक्षात घेता त्याचा वापर करणे फारसे कोणाला पसंत नसल्याचे या सर्वेक्षणातसमोर आले आहे . फेसबुकने मेसेंजर सेवा बाजारात आणून सध्याच्या प्रस्थापितांना दणाणून मात्र सोडलं आहे .पुढच्या काळात जर ही सेवा अधिक चांगल्या प्रकारे सुरू करण्यात आली आणि त्यातील सर्व मर्यादा काढून टाकण्यात आल्या तर सध्याच्या सेवांना मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत . व्हॉटस्अॅपमध्ये आपल्या फोनबुकमधील लोकांशी संपर्क साधता येतो . मात्र , फेसबुक मेसेंजरमध्ये भविष्यात आपल्याला फेसबुकफ्रेंड्सबरोबरच फोनबुकमधील लोकांशीही संपर्क साधता येणार आहे . याचदरम्यान फेसबुक व्हॉटस्अॅपला विकत घेणार अशा अफवाही सुरू झाल्या आहेत . 

Page 41 of 44 1 40 41 42 44
ADVERTISEMENT
error: Content is protected!