Tag: Care

गॅजेट अपडेट केव्हा कराल?

मोबाइल , टॅबलेट , लॅपटॉप खराब झाला , चोरीला गेला ,हरवला तर नवीन घेणे आपसूकच येते . पण काहींना नवेकोरे गॅजेटही अपडेट करण्याची घाई झालेली असते . केवळ काही मोजक्या फिचर्सकडे आकर्षित होऊन हा निर्णय घेतला जातो . हे अपडेशन करताना बरेच पैसेही खर्च केले जातात . पण खरंच त्यांची गरज आहे का ? हा विचार केला जात नाही . अशांसाठी तुमचे गॅजेट अपडेट केव्हा करायचे याच्या टिप्स ...  सर्वसाधारणपणे कुठल्याही उपकरणात ३ - ४ वर्षाच्या कालावधीनंतर मोठ्या प्रमाणात बदल होतात . सामान्य नागरिकांनी तेव्हाच त्यात बदल करावा , असा सल्ला गार्टनरचे विश्लेषक मायकेल गार्टेनबर्ग यांनी दिला आहे .सुरुवातीच्या काळात लॅपटॉपही लोकांना हँडी वाटत होते . आता अल्ट्रा बुक आल्यावर त्याची गरज वाटू लागली .किंवा २जी आणि ३जी मोबाइलमधील फरकही स्विकारण्यासारखा आहे . पण थोडेफार बदल केलेलं मॉडेल , कमी- जास्त फिचर्स , कलर्स यासारख्या गोष्टींसाठी बदल करणे तितकेसे परवडणारे नाही . नवीन गॅजेट घेताना एक सूत्र कायम लक्षात ठेवायला हवे की , तुम्ही त्यासाठी मोजलेला पैसा पूर्ण वसूल झाला आहे याची खात्री तुम्हाला पटायला हवी .  स्मार्टफोन : प्रवासात मेल चेक करण्यासाठी तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर तीनेक वर्ष तुम्ही तो अपडेट केला नाही तरी चालेल . पण सदासर्वदा तुम्ही स्मार्टफोनसोबत राहत असाल तर मग तुम्ही २० महिन्यात फोन अपडेट करण्याची गरज आहे . काही मोबाइल कंपन्यांच्या सिमकार्डसोबतच हँडसेटही विकतात . काही महिन्यांनी पुन्हा त्यांच्याकडे नवीन मॉडेल आलेले असते . पण अशावेळी जुन्या मॉडेलची गरज खरंच संपली का , नव्या हँडसेटसाठी किंमत मोजावी एवढे अपडेट्स त्यात आहेत का हे प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे .  टॅबलेट : टॅबलेट्सचा प्रमुख सर्फिंग , वापर गेम खेळणे , इ - बुक वाचन किंवा चित्रपट पाहण्यासाठी केला जातो .त्यामुळे तो वारंवार अपग्रेड करू नये असा सल्ला तज्ञ देतात . मॅकरुमर्स साइटचे संस्थापक अरनॉल्ड किम म्हणतात, आयपॅडच्या प्रत्येक नव्या मॉडेलमध्ये फारसे काही मोठे बदल नसतात . त्यामुळे तुमचा जुना आयपॅडच चांगलाआहे . आणि कितीही म्हटलं तरी मोबाइल , टॅबलेट आणि लॅपटॉप परस्परांचं काम पूर्ण क्षमतेने करू शकत नाही .त्यामुळे प्रत्येकाची गरज ही भासतेच .  लॅपटॉप : तुमचा दिवसातील पूर्ण वेळ लॅपटॉपसमोर जात असेल तर दर ३ वर्षांनी तुम्ही नवा लॅपटॉप घेण्यास हरकत नाही . पण दिवसातील काही तास किंवा फक्त फेसबुक , ट्विटर , चॅटिंगसाठी तुम्हाला लॅपटॉपची गरज असेल तर सध्या वापरत असलेला लॅपटॉप काय वाईट आहे ? किंवा सरळ कम्प्युटर वापरा . कम्युटरचा एखादा पार्ट खराब झाला तर बदलता येतो . स्पीड कमी झाला असेल तर रॅम वाढवून घ्या . संपूर्ण लॅपटॉपच बदलण्यापेक्षा ते कधीही परवडते .  .......................................  -------महाराष्ट्र टाइम्स  

ADVERTISEMENT
error: Content is protected!