Tag: Explorer

इंटरनेट सोपं करण्यासाठी… एव्हरनोट

इंटरनेट सोपं करण्यासाठी… एव्हरनोट

मनोरंजन , ऑनलाइन व्हिडीओ आणि गेम्स , डॉक्युमेंटवर काम करणे , डाटाबेस हे सर्व क्लाऊडवर करण्याचे प्रमाण वाढले आहे . सोशल नेटवर्किंगवर मित्र आणि कुटुंबांबरोबर गप्पा होत असतात . हे सर्व करताना मोबाइलवरील इंटरनेटचा ब्राऊजर महत्त्वाची भूमिका बजावत असतो . ब्राऊजर हे एक प्रकारचे फ्री मिळणारे अॅप्लिकेशन आहे . मात्र , या सॉफ्टवेअरवर काही विशेष सुविधा आपल्या अॅड करता येऊ शकतात .  वेबपेजवर एखादा लेख वाचताना अनेक स्पॉन्सर्ड लिंक ( अॅड ) असतात . त्या फोटो , पॉपअप स्वरूपात पुढे येतात. मात्र , अशा अॅड वाचण्यात अडथळा निर्माण करतात . मात्र , पुन्हा तेच आर्टिकल ऑनलाइन स्वरूपात वाचायचे असल्यास पॉपअपचा अडथळा टाळता येऊ शकतो . ' एव्हरनोट ' मुळे हे करता येणे शक्य आहे . डार्क आणि लाइट थीम यात निवडता येते . ' एव्हरनोट ' चे अकाऊंट असल्यास संबंधित लेखाचे क्लिप किंवा त्यातील काहीभाग अधोरेखित करून संदर्भासाठी वाचता येतो .  डाऊनलोड Evernote :  >>>>>  एव्हरनोट  <<<< फायरफॉक्स , क्रोम वापरणाऱ्यांना ही सुविधा वापरता येते .इंटरनेट एक्सप्लोअरर वापरत असलेल्या ' एव्हरनोट ' वेब क्लिपरचा वापर करता येऊ शकतो . मात्र , यासाठी 'एव्हरनोट ' प्रोग्रॅम कम्प्युटरवर लोड करावा लागतो . ही विशिष्ट अॅप्लिकेशन वापरल्यास वेब वापरण्याचा अनुभव सु्खद होऊ शकतो . त्यामुळे या अॅप्लिकेशनचा विचार करायला हरकत नाही . स्मार्टफोन आणि इंटरनेट प्लॅन रास्त दरात उपलब्ध असल्याने मोबाइलवर इंटरनेट सर्फ करण्याचे प्रमाण वाढले आहे . ऑनलाइन व्हिडीओ बघणे अनेकांना आवडते . ब्राऊजरमधील प्लग - इनच्यामार्फत आवडते व्हिडीओ डाऊनलोड करता येतात . इंटरनेट एक्सप्लोअरर वापरणारे यूजर आयई डाऊनलोड हेल्परचा वापर करता येऊ शकतो . इंटरनेट एक्सप्लोअररच्या नव्या ३ . ५ व्हर्जनवर व्हिडीओ फाइलच्या साइझबाबत मर्यादा आहेत .त्यामुळे आयईचे ३ . ३ च्या व्हर्जनचा विचार करता येईल . फायरफॉक्स वापरणाऱ्यांनी व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी व्हिडीओ डाऊनलोड हेल्परची मदत घ्यावी . वेबपेजचा अॅक्सेस केल्यावर या एक्स्टेंशन प्रोससमुळेव्हिडीओ हा एएलव्ही , एमपी४ आणि ३जीपी फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करता येऊ शकतो . याचे रेझोल्यूशन१०८० पिक्सेलपर्यंत असू शकतो . क्रोम वापरणारे यूजर यू - ट्यूब डाऊनलोडरचा विचार करू शकतात . आपण पाहत असलेल्या व्हिडीओच्या खालीच डाऊनलोड बटन असते . त्यामुळे फाइल डाऊनलोड करणे सोपे जाते . Tubemate : >>>> tubemate.net <<<< * marathitech does not take responsibility ...

विंडोजची ‘आठवी’ खिडकी : Windows 8 येत आहे भन्नाट सुविधांसह

विंडोजची ‘आठवी’ खिडकी : Windows 8 येत आहे भन्नाट सुविधांसह

' विंडोज फोन ८ ' हे मायक्रोसॉफ्टचं सर्वात प्रसिद्ध आणि प्रगत व्हर्जन. सध्या ' विंडोज ८ ' पीसी ओएसच्या बाबतीत जितकी उत्सुकता आहे. तितकीच उत्सुकता ' विंडोज फोन ८ ' या ...

मालवेअर रोखणारं ‘इंटरनेट एक्स्प्लोलर ९’ : मॉझिला , क्रोम , सफारी या ब्राऊजर्सना पुन्हा मागे टाकले : मालवेअर , फ्रॉड्स  कळतात तातडीने

मालवेअर रोखणारं ‘इंटरनेट एक्स्प्लोलर ९’ : मॉझिला , क्रोम , सफारी या ब्राऊजर्सना पुन्हा मागे टाकले : मालवेअर , फ्रॉड्स कळतात तातडीने

मायक्रासॉफ्टचं कोणतंही उत्पादन कम्प्युटर बाजारात चाललंनाही असं नाही . मग याला ' इंटरनेट एक्स्प्लोलर ९ ' ('आयई९ ') अपवाद कसं ठरणार . एक्स्प्लोरर लाँच झाल्यानंतर अल्पावधीतच गेल्या काही महिन्यांमध्ये मार्केटमध्येआपलं स्थान प्रस्थापित केलेल्या मॉझिला , क्रोम  , सफारी या ब्राऊजर्सना पुन्हा मागे टाकले आहे . एनएसएसनेलॅबने केलेल्या पाहणीत ही बाब प्रकर्षाने जाणवली आहे . ' इंटरनेट एक्स्प्लोलर ९ ' मध्ये वेबसाइट ओपन केली की, त्यातील मालवेअर , फ्रॉड्स तातडीने कळतात . यामुळे या ब्राऊजरला सर्वाधिक पसंती मिळत असल्याचं निरीक्षणयात नोंदविण्यात आलं आहे .  एनएसएसने गेले ७५ दिवस विविध ब्राऊजर्सवर ओपन झालेल्या वेबसाइट्स आणि त्यांनी रोखलेले मालवेअर यांचेसर्वेक्षण केले . यामध्ये ' आयई९ ' वर ओपन झालेल्या एकूण साइट्सपैकी सुमारे ९५ टक्के मालवेअर रोखण्यात त्यांना यश आले आहे . फायफॉक्स आणि सफारी हे ब्राऊजर्स मालवेअर रोखण्याच्या स्पर्धेत कुठेच नसल्याचे दिसूनआले आहे . या दोन्ही ब्राऊजर्सनी केवळ सहा टक्केच मालवेअर रोखले आहेत . क्रोमने यामध्ये समाधानकारककामगिरी केली असून या ब्राऊजरला ७४ टक्के मालवेअर रोखण्यात यश आले आहे . यासाठी एनएसएसने प्रत्येकब्राऊजर्सच्या सुमारे साडे सात लाख वेब पेजेस टेस्ट केले आहेत . ब्राऊजर सिक्युरिटी हे आपल्याला पूर्णतः सुरक्षादेत नाहीत . त्याचा वापर केवळ प्राथमिक सुरक्षा म्हणून केला जाऊ शकतो , असे एनएसएसने आपल्यानिरीक्षाणात नमूद केले आहे . ब्राऊजर्सची ही सुरक्षा क्लाऊड तंत्राज्ञानावर अवलंबून आहे . ज्या कंपनीची क्लाऊडटेक्नॉलॉजी चांगल्या दर्जाची आहे त्यांना ही मालवेअर सुरक्षा पुरविणंच शक्य होणार आहे . आपण जेव्हा एखादीवेबसाइट ओपन करतो तेव्हा ती साइट ' बॅड ' म्हणून दर्शविण्यात आली तर ती ओपन होण्याआधी युजर वॉर्निंगदेण्यात येते . तरीही युजरला ती साइट ओपन करायची असेल तर तो पर्यायही खुला राहतो . अशाच अनेकप्रकरांमधून अॅण्टीव्हारसचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षणही सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे . ' आयई९ 'आणि क्राममध्ये मालवेअर असलेले वेबपेज ओपन होते मात्र त्या पेजेसवरून डाऊनलोडिंग करता येत नाही .बहुतांश मालवेअर हे अॅडच्या माध्यमातून पसविले जातात , असे निरीक्षण एनएसएसने या सर्वेक्षणात नोंदविलेआहे . यामध्ये गुन्हेगारांना पे - पर - क्लिकनुसार पैसे मिळत असतात . क्लिक फ्रॉड रोखण्याचे काम सर्वाधिकचांगल्याप्रकारे ' आयई९ ' ने केलेले आहे . त्याचेप्रमाण ९६ . ६ टक्के इतके आहे . त्याखालोखाल क्रोम १ . ६ टक्के ,फायरफॉक्स ० . ८ टक्के आणि सफारी ० . ७ टक्के असे मालवेअर रोखण्याचे ब्राऊजर्सचे प्रमाण आहे .

ADVERTISEMENT
error: Content is protected!