Tag: Trust

काही वर्षांत गुगलची सद्दी संपेल ??

गेल्या काही दिवसांत गुगलच्या शेअरमध्ये १० टक्क्यांहूनअधिक घसरण झाली आहे . त्यामुळे कंपनीच्या मालमत्तेत २४ अब्ज डॉलरने घट झाली आहे . ही घट अशीच सुरू राहिली , तर येत्या काही वर्षांत गुगलची सद्दी संपेल , अशी शक्यता विश्लेषक व्यक्त करू लागले आहेत .  गेल्या तिमाहीमध्ये गुगलच्या महसूलात केवळ १७ टक्क्यांची वाढ दिसून आली . २००९ नंतर पहिल्यांदाच कंपनीच्या महसूलात २० टक्क्यांपेक्षा कमी वाढ दिसून आली आहे .एकेकाळी सर्च इंजिन क्षेत्रात याहूची आघाडी होती . पण हळुहळू या स्पर्धेतून याहू बाद झाले . येत्या ५ - ८ वर्षांत गुगलवरही तीच वेळ येऊ शकते , असे आयर्न कॅपिटल या हेज फंडाचे संस्थापक एरिक जॅक्सन यांनी म्हटले आहे . युजरने जाहिरातींवर क्लिक केल्यास गुगलला महसूल मिळतो . गेल्या तीन महिन्यांत त्यात १५ टक्के घट झाली आहे . त्यामुळे भविष्यात गुगलचा नफा आणखी कमी होईल , अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे . अधिकाधिक ग्राहक मोबाइल अॅप्लिकेशन्सना प्राधान्य देत असल्याने जाहिरातदारही इंटरनेटवर आधारित जाहिरातींसाठी पैसे मोजण्यास तयार नाहीत .  त्यातच जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये बायडूला प्राधान्य दिले जाते . मायक्रोसॉफ्टनेही काही महिन्यांपूर्वीच बिंगची नवीन आवृत्ती सादर केली होती . त्याचवेळी गुगलची रशियातील स्पर्धक यान्डेक्सने विकसनशील मार्केटमध्ये गुगलला आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे . स्वतःकडील तज्ज्ञांचा वापर करून गुगलला आव्हान देण्याचे कंपनीने ठरविले आहे . त्यासाठी कंपनीने तुर्कस्तानपासून सुरुवात केली आहे . गेल्याच महिन्यात कंपनीने गुगलच्या क्रोमला आव्हान देण्यासाठी नवा ब्राऊझर लॉँच केला . त्यामुळे ऑपेरा तयार करणाऱ्या नॉर्वेजियन कंपनीने यान्डेक्ससोबत ब्राऊझर तंत्रज्ञान शेअर करण्यासाठी करार केला आहे . या ब्राऊझरवर कामकरण्यासाठी यान्डेक्स विविध अॅप्लिकेशन्स तयार करत असून सर्चच्या माध्यमातून अधिकाधिक महसूल गोळा करण्याचा त्यांचा मानस आहे .  एकेकाळी सोशल नेटवर्किंगच्या क्षेत्रात ऑर्कुटचेच साम्राज्य होते . पण फेसबुकच्या उदयाबरोबरच ऑर्कूटचे साम्राज्य कमी झाले . आता ते जवळपास दिसेनासे झाले आहे . फेसबुकलाही आता ट्विटर , लिंक्डइनचा धोका जाणवतोआहे . फेसबुकच्या शेअरमध्ये होत असलेली घसरण थांबलेली नाही . त्यामुळे इतके दिवस टिकून असलेली गुगलचीसद्दी जाऊन गुगलला पर्याय निर्माण होईल आणि गुगल इतिहासजमा होईल , अशी विश्लेषक वर्तवत असलेली शक्यता पूर्णपणे खोटी ठरवता येणार नाही . शेवटी हे तंत्रज्ञानाचे जग आहे . त्यात दररोज नवीन काही येणारच ... 

ADVERTISEMENT
error: Content is protected!