Tag: Webs

टेकमय सुट्टी

सुट्ट्यांमध्ये सर्वांचा टाइमपास म्हणजे फेसबुकवर वेळघालवणे . याच जोडीला आपण अशा काही गोष्टी करूशकतो , ज्यामुळे आपल्याला भविष्यात आपल्या करिअरलात्याचा फायदा होऊ शकतो . यासाठी तुम्हाला कुठल्याहीवर्कशॉपला किंवा घराच्या बाहेरही पडण्याची गरज नाही .अगदी घरी बसून तुम्ही तुमच्या या सर्व गोष्टी करू शकता .याबाबत सांगतायेत अनुपम भाटवडेकर आणि पराग मयेकर ब्लॉगर . कॉम  आपल्या मनातील भावना , वाचनात येणाऱ्या चांगल्या गोष्टीकिंवा अगदी आपल्या आवडीच्या गोष्टी लिहून ठेवाव्याशावाटतात . वही पेन ऐवजी आपण कम्प्युटरचा वापरकरायला लागलो . पण या गोष्टी आणखी काही जणांशी शेअर करायच्या असतील , तर तुम्ही blogger.com यावेबसाइटवर तुमचा ब्लॉग क्रिएट करू शकता . त्या ब्लॉगची डिझाइन आणि त्यातले आर्टिकलही सेट करू शकता .ही वेबसाइट फ्री आहे आणि जर तुम्हाला तुमचा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवा असेल , तरगुगलने अॅडसेन्स असा प्रोग्राम काढला आहे . ज्यात तुम्ही प्रत्येक महिनाला काही ठराविक रक्कम गुगलला देऊन ,आपल्या ब्लॉगला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवू शकता . या वेबसाइटमध्ये गुगल टूल बार आणि सोशलसाइट्सचे इंटिग्रेशन आहे . त्यामुळे आपल्या ब्लॉगला इतर साइट्सद्वारेही बघता येतं आणि शेअर करता येतं .  वर्डप्रेस . कॉम  ही इंटरनॅशनल वेबसाइट आहे , अमेरिकेमध्ये याचा वापर जास्त होतो . या साइटवर विविध व्यवसायातील लोकआपले ब्लॉग्ज बनवत असतात . wordpress.com या साइटच्या माध्यमातून तयार केलेल्या ब्लॉगवर तुम्हीवेबसाइटमध्ये निरनिराळ्या थीम्स आणि टेमप्लेट्स दिले गेले आहेत . या वेबसाइटचे फीचर्स आहेत विड्जेट्सआणि प्लगिन्स इंटिग्रेशन , ज्याचा वापर आपल्या साइट्सच्या इंटरफेसमध्ये आणि इतर गोष्टींसाठी केला जातो .मल्टी - यूजर्स आणि मल्टी - ब्लॉगिंग करता येतं जेणेकरून आपली साइट्स आपल्या कंपनीमधली लोकं एकत्र पणचालवू शकतात . टॅगिंगमुळे साइट्स जास्तीत जास्त प्रदर्शित करू शकतो .  टुम्बलर . कॉम  तुम्हाला भारंभार लिहायला आवडत नसेल आणि ट्विटरपेक्षा जास्त स्पेस हवी असले तर तुम्ही मायक्रोब्लॉगिंगचा पर्याय स्वीकारू शकतात . यासाठी तुम्ही tumblr.com चा पर्याय निवडू शकतात . या वेबसाइटनेतुम्हाला डॅशबोर्ड , टॅगिंग , मोबाइल आणि एचटीएमएल कोडिंगचे फीचर्स उपलब्ध करून दिले आहेत . याफीचर्सचा खूप उपयोग होतो आणि खूप चांगल्या तऱ्हेने आपला ब्लॉग लोकांसमोर सादर करता येतो . यासाइटच्या मदतीला Thoughts.com and Xanga.com या वेबसाइट्सही उपलब्ध आहेत .  विक्स . कॉम  तुम्हाला तुमचा फोटोग्राफिकल पोर्टफोलिओ किंवा पर्सनल वेबसाइट बनवायची असेल तर तुम्ही wix.com चापर्याय निवडू शकता . या साइटवर तुम्हाला ' ड्रॅग एण्ड ड्रॉप ' हा वेबसाइट बिल्डिंग प्लॅटफॉर्म एचटीएमएन ५ सहमिळतो . कॅपबिलिटीज , १००पेक्षा जास्त डिझायनर मॅड टेमप्लेट्स , टॉप ग्रेड होस्टिंग , इनोवेटिव्ह अॅप्स आणिविवध फीचर्स आहेत तेही फ्री . या वेबसाइटमध्ये खूप टेमप्लेट्स आहेत ज्यात बिझनस आणि पर्सनल असे विविधटेमप्लेट्स आहेत . या वेबसाइटध्ये बॅनर अॅड्स आहेत .  वीबली . कॉम  विविध एलिमेंट्स व्हिडीओज , फोटो गॅलरीज , मॅप्स , फॉरम्स , कॉंटॅक्ट फॉर्मस आणि इतर फीचर्स weebly.comया वेबसाइटमध्ये तुम्हाला वेग्रे थीम्स आणि टेमप्लेट्सचा वापर करून पर्सनल वेबसाइट्स आणि बिझनेसवेबसाइट्सही तयार करता येऊ शकते . ही सुद्धा ड्रॅग अँड ड्रॉप बेस्ड वेबसाइट आहे . ज्यात वेबसाइट बनवणं खूपसोपं आहे . या वेबसाइटला प्रोफेशनल लूकही देता यतो . ज्यांना वेबसाइट डिझाइन करण्याची आवड आहे , अशालोकांनी या वेबसाइटची मदत घेऊन काम करण्यास हरकत नाही .  वेब्ज . कॉम  ' ड्रॅग अॅण्ड ड्रॉप ' बेस्ड असेलेली ही आणखी एक वेबसाइट . यामध्ये तुम्हाला फेसबुक आणि ट्विटर यांच्या लिंक्सही तयार करता येणार आहेत . या वेबसाइटमध्ये बॅनर अॅड्स देण्यात आल्या आहेत . त्या अॅड्स जर आपल्याला नको असतील , तर आपल्याला पैसे भरावे लागतात . याचप्रकारे काम करणारी moonfruit.com अशीही एक वेबसाइट आहे .  फेसबुक पेज  या सुट्टीत तुमच्या आवडीच्या विषयावर एखादं फेसबुक पेज तयार करून ते आपल्या फेसबुक कंटेंट शेअर करूनत्यावर अधिकाधिक लाइक्स आणि कमेंटस मिळवू शकता . यात फोटोग्राफी , टेक्नॉलॉजी , म्युझिक , व्हिडीओज ,जोक्स , फूड अॅण्ड हॉटेल्स हे विषय सध्या हिट आहेत . या पेजमुळे तुम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचून एखाद्याविषयावर अधिक संवाद घडवून आणला जाऊ शकतो . एकट्याने किंवा ग्रुपने फेसबुक पेज मॅनेज करण्याचापर्यायही उपलब्ध आहे .  युट्यूब चॅनेल  तुमच्यातील कला लोकांपर्यंत पोहचविण्याचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणून सध्या याकडे पाहिले जाते . ...

ADVERTISEMENT
error: Content is protected!