MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home HowTo

सोशल नेटवर्किंग ई-लर्गिग टूल

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 22, 2012
in HowTo, News

ADVERTISEMENT

उदाहरण पहिले : एखाद्या गणित विषयाच्या शिक्षकास गणितातील सूत्र संगणक तंत्रज्ञानाचा वापर करून रंजकपणे शिकवायचे असेल व त्याला तंत्रज्ञानाची पुरेशी माहिती नसेल तर हताश होण्याचे कारण नाही.
अशा वेळेस वेगवेगळ्या ‘सोशल नेटवर्किंग’ साईट्सवरील ‘गणित’ विषयाच्या ‘ऑनलाइन कम्युनिटी’ची त्याला मदत होऊ शकते. हा गणिताचा शिक्षक आपली तंत्रज्ञानविषयक समस्या ‘ऑनलाइन कम्युनिटी’च्या ‘चर्चा व्यासपीठ’ अथवा ‘डिस्कशन् फोरम्’वर मांडून त्या गणित विषयातील ‘ऑनलाइन कम्युनिटी’वर उपलब्ध असलेल्या गणित तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊ शकतो.
तसेच त्या ‘ऑनलाइन कम्युनिटी’च्या साईटवरील गणित तज्ज्ञांनी तयार केलेले गणित विषयावरचे विविध प्रकल्प (प्रोजेक्टस) पाहून आपल्या विषयाचे सादरीकरण (Presentation) प्रभावी बनविण्यासाठी प्रयत्न करू शकतो. या वेब संकेतस्थळाचा पत्ता : http://mathsliteracy. या वेब संकेतस्थळाचा पत्ता : (http://mathsliteracy.ning.com/)
वर नमूद केलेल्या ‘ऑनलाइन कम्युनिटी’च्या साईटवर 
सभासद होण्यासाठी प्रथम आपल्याला ‘साईन अप’ करावे   
लागेल व त्यानंतर ‘साईट अॅडमिनिस्ट्रेटर’कडे सभासदत्वाची विनंती पाठविण्यात येईल. ‘साइट अॅडमिनिस्ट्रेटर’ने सभासदत्वाची विनंती मान्य केल्यानंतर आपण या ‘ऑनलाइन कम्युनिटी’चे सभासद बनू शकतो. ही ‘कार्यपद्धती’ (Procedure) केवळ 
या ‘ऑनलाइन कम्युनिटी’च्या सुरक्षिततेसाठी अमलात आणली जाते.
अशा प्रकारची शिक्षकांना मार्गदर्शन करणारी आणखी एक ‘ऑनलाइन कम्युनिटी’ आहे. तिच्या वेब संकेतस्थळाचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे (www.teachade.com).
या वेब संकेतस्थळावर सभासद होण्यासाठी ‘रजिस्टर’ करावे लागेल व रजिस्ट्रेशन अथवा नोंदणी मोफत (फ्री) आहे.
पुष्कळशा गणित विषयावरच्या ‘ऑनलाइन कम्युनिटीवर’ गणित विषयावरच्या वेब संकेतस्थळाचे पत्ते दिलेले असतात. त्यापैकी महत्त्वाच्या गणित विषयावरच्या वेब संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
[http://mathforum.org/
[http://www.mathfoundation.com/math_tutorial.html.[http://www.amathsdictionaryforkids.com/ 
(गणित विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी रंजक शब्दकोश (डिक्शनरी).
http://www.meritnation.com/(SSC, CBSE, ICSE  विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ‘ऑनलाइन’ मार्गदर्शक)
http://shepardsoftware.com/contst.htm (गणित विषयातील ‘ऑनलाइन’ प्रश्नमंजूषा (Quiz)
http://www.ehelper.com/
http://www.dositey.com/2008/index-page-home-php
(गणित विषयासाठी शिक्षक व पालक दोघांसाठी मार्गदर्शक)
उदाहरण दुसरे : माझ्या एका मैत्रिणीने काही वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन येथून पदव्युत्तर ‘टूरिझम मॅनेजमेंट’चा अभ्यासक्रम (कोर्स) पूर्ण केला. व्यवसायानिमित्त तिला सतत परदेशात रहावे लागायचे. व्यावसायकि धावपळीत तिचा गरवारेमधील मित्र-मैत्रिणींचा संपर्क तुटला होता. ही मैत्रीची नाती तिच्या मनात घर करून होती; परंतु त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याचा काही मार्ग तिला दिसत नव्हता. अशा परिस्थितीत ‘फेसबुक’ (Facebook) या ‘सोशल नेटवर्किंग’ साईटवर गरवारे एज्युकेशनच्या वर्गीस निनान, सचिन नेने इत्यादी मंडळींनी स्थापन केलेल्या गरवारे इन्स्टिटय़ूट, मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस अशा ‘ऑनलाइन ग्रुप’ संबंधी तिला माहिती मिळाली. ती या ‘ऑनलाइन ग्रुप’ची फॅन म्हणजे सभासद झाली व या ग्रुपच्या माध्यमातून भूतकाळात हरविलेल्या आपल्या मित्र-मैत्रिणींशी आज संपर्क प्रस्थापित करू शकली आहे. गरवारे इन्स्टिटय़ूटच्या या ‘ऑनलाइन ग्रुप’ला आपण गरवारेची ‘ऑनलाइन कम्युनिटी’ म्हणून संबोधू शकतो.
अशाप्रकारच्या जगभरातील विविध शाळा, महाविद्यालये व विद्यापीठ यांच्या ‘ऑनलाइन कम्युनिटी’ आपणास फेसबुक (Facebook) किंवा ऑर्कुटवर (Orkut) वर पाहावयास मिळतील.
ऑनलाइन कम्युनिटीची स्थापना जर स्वत:ची अथवा कंपनीची स्वतंत्र ‘वेबसाईट’ असेल तर त्यावर करता येते. जर नसेल तर बहुतांशी व्यक्ती, संस्था, शाळा, महाविद्यालये व विद्यापीठ ‘सोशल नेटवर्किंग’साठी ‘सोशल नेटवर्किंग साइट’चा वापर करतात.
उदाहरणार्थ : भारतीय संगीताच्या चाहत्यांनी एकत्र येऊन ‘इंडियन म्युझिकल कम्युनिटी’ अशा ‘ऑनलाइन कम्युनिटीची स्थापना केली आहे. तिच्या वेब संकेतस्थळाचा पत्ता : (www.uhooroo.com)
‘सोशल नेटवर्किंग’चा इतिहास      
औद्योगिकीकरणाची धामधूम व मनुष्य जीवनातील धावपळ व दगदग यांमुळे हरवत चाललेली ‘नाती’ व त्यांचे ‘तुटलेपण’ यांच्यावर उपास म्हणून ‘सोशल नेटवर्किंग’ची सुरुवात सत्तरच्या दशकात अमेरिकेत झाली.
‘बीबीएस’ अथवा ‘बुलेटिन बोर्ड सिस्टीम’च्या माध्यमातून अमेरिकन जनता संगणकावर जमा केलेली एखाद्या विषयाची माहिती फाईल स्वरूपातील व मनोरंजक खेळ (गेम्स) यांचे आदान-प्रदान करू शकत असे.
त्यानंतर ऐंशीच्या दशकात अमेरिकन जनतेच्या ‘गळ्यातील ताईत’ बनलेला कम्प्युसव्र्ह इन्फोरमेशन सर्व्हिस (CIS) ही अमेरिकेतील पहिली माहितीचे दळणवळण (Information Trasfer) करणारी व्यावसायिक कंपनी होती. कम्प्युसव्र्हने मेसेजिंग व डिस्कशन् फोरम् (चर्चा व्यासपीठ) यांची ओळख आपल्या ग्राहकवर्गास करून दिली.
१९९५ साली classmates.com  नावाच्या पहिल्या ‘सोशल नेटवर्किंग’ साईटचा जन्म झाला. अमेरिकेतील विविध शाळांमधील ‘माजी’ विद्यार्थ्यांना एकत्र जोडण्याचे कार्य या ‘साईट’ने केले.
त्यानंतर १९९७ साली sixdegrees.com  व २००२ साली friendster.com  या दोन ‘सोशल नेटवर्किंग’ साईट्सनी अमेरिकेत आपले नाव कमाविले. २००३ साली उद्योजकांना एकत्र जोडून व्यावसायिक जोडणी अथवा नेटवर्क प्रस्थापित करण्याचा अभिनव प्रयोग Linkedin  ने केला. काही थोडय़ा अवधीत ”Linkedin” व उद्योग जगताचे समीकरण जमून आले. आज या सोशल नेटवर्किंग साईटवर ३० मिलीयन सभासद आहेत. आपणही आपल्या उद्योगाच्या ‘विनामूल्य’ प्रसिद्धीसाठी व त्या उद्योगाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तज्ज्ञाची मदत घेण्यासाठी या सोशल नेटवर्किंग साईटचा उपयोग सभासद (मेम्बर) बनून करू शकतात.
(www.Linkedin.com)  ‘सोशल नेटवर्किंग’मध्ये स्वत:चे अढळ स्थान निर्माण करणाऱ्या ‘फेसबुक’ (Facebook) चा जन्म २००४ साली अमेरिकेतील ‘हॉवर्ड’ विद्यापीठातील विद्यार्थ्यांना जोडणारी ‘इन-हाऊस’ (In-house) साईट म्हणून झाला. २००६ साली ही सोशल नेटवर्किंग साईट जनतेस खुली झाली  (www.facebook.com). ‘फेसबुक’ ही ‘सोशल नेटवर्किंग साईट’ ही जगभरातील सर्वात लोकप्रिय साईट मानली जाते.
२४ जानेवारी २००४ साली ऑक्रृटचा जन्म ‘ऑर्कुट ब्युय्युक्कोकतेन’च्या अथक परिश्रमाचे फलित म्हणून बघितले जाते. या साईटचा जन्म जरी अमेरिकेत झाला असला तरीही ही साईट भारत-पाकिस्तान व ब्राझिलमध्ये लोकप्रिय आहे. (www.orkut.com)
‘मायक्रोब्लोिगग’ (Microblogging) चा पाया माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात (Information And Technology) घालणारी व हॉलीवूड व बॉलीवूडच्या सिनेतारक व सिनेतारकांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली ‘ट्विटर’ (Twitter) चा उल्लेख येथे आवर्जुन करावा लागेल. २००६ साली जॅक डॉर्सिने हा प्रकल्प जनतेसाठी खुला केला. ट्विट्स म्हणजे ‘छोटेखानी’ निरोप पाठविण्याची सुविधा. मोबाईल फोनच्या रटर (शॉर्ट मेसेज सर्हिस)चा वापर करून ट्विटरच्या नेटवर्कचे सभासद असलेल्या आपल्या 
मित्र-मैत्रिणींना ट्विटस् (Twitts) पाठवू शकतो. (www.twitter.com)  
सोशल नेटवर्किंगचे घटक.
‘सोशल नेटवर्किंग’चे ‘सोशल नेटवर्क सर्हिस’ व ‘ऑनलाइन कम्युनिटी’ असे दोन महत्त्वपूर्ण घटक मानले गेले आहेत.
‘सोशल नेटवर्क सव्र्हिस’ ही ‘व्यक्ती केंद्रित’ असून ‘ऑनलाइन कम्युनिटी’ ही ‘समूह’ (ग्रूप) केंद्रित आहे.
या दोन्ही घटकांमधील साधम्र्य म्हणजे या दोन्ही घटकांमागील प्रयोजन व उपलब्ध असलेल्या सुविधा समान आहेत. माहितीचे आदान-प्रदान, फोटो अथवा व्हिडीओ स्वरूपात घटनांच्या तपशिलाची देवाणघेवाण व आपण सहभागी अथवा पाठिंबा देत असलेल्या सामाजिक कार्याचा प्रसार ही उद्दिष्टय़े आहेत.
व्यक्तीची अथवा समूहाची संक्षिप्त माहिती (प्रोफाईल) तसेच ‘इन्स्टंट मेसेजिंग’ (च्याटरूमच्या मार्फत) आपले विचार, फोटो, व्हिडीओ अथवा उपयुक्त वेब संकेतस्थळाची ‘लिंक’ पोस्ट करण्याची सुविधा, एकाच कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना अथवा समान आवड असलेल्या व्यक्तींचा समूह (ग्रुप) निर्माण करण्याची सुविधा या ‘सोशल नेटवर्किंग’ वेब संकेतस्थळावर उपलब्ध असते.
उदाहरणार्थ : एखादी प्रिया नावाची मुलगी आपल्या व्यक्तिगत जीवनातील महत्त्वपूर्ण घटना फोटोच्या अथवा व्हिडीओच्या स्वरूपात साईटवर टाकू शकते. त्या घटनेविषयीचा तिचा अनुभव किंवा विचार शाब्दिक (Text) संदेश स्वरूपात ‘स्क्रॅप’ म्हणून प्रसिद्ध करू शकते.
अशा रीतीने ‘सोशल नेटवर्क सव्र्हिस’ व ‘ऑनलाइन कम्युनिटी’, ‘सोशल नेटवर्किंग’ नावाच्या नाण्याच्या दोन समान बाजू आहेत. ‘सोशल नेटवर्किंग’च्या ऑनलाइन साइटसनी वर्ल्ड वाईड वेबचा आधार घेऊन व इंटरनेट तंत्रज्ञानाच्या मदतीने जगाला मैत्रीच्या नात्याने बांधण्याचा अद्भुत प्रयत्न केला आहे.
सोशल नेटवर्किंग ई-लर्गिग टूल (साधन)  
‘सोशल नेटवर्किंग’चा उपयोग शिक्षक वर्गाला स्वत:च्या विषयातील ‘ज्ञान’ अपडेट करण्यासाठी करता येईल.
शाळा ‘सोशल नेटवर्किंग साइट’चा वापर करून आपली साइट अथवा संकेत वेबस्थळ निर्माण करू शकते. त्या साइटवर आपल्या शाळेची संक्षिप्त माहिती (प्रोफाईल) प्रसिद्ध करून शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांचा गट (ग्रुप) (इयत्तेनुसार), पालक व शिक्षक यांचा गट व शाळा व शिक्षक यांचा गट असे वेगवेगळे ‘गट’ (ग्रुप) बनवून सकारात्मक ‘ऑनलाइन’ कृती कार्यक्रम बनविले तर विद्यार्थी आवडीने अभ्यासात रस घेतील व पालक व शाळा यांच्यामध्ये सुसंवाद प्रस्थापित होईल.
उदा. पाचवीतल्या विद्यार्थ्यांसाठी पाठावर आधारित प्रश्नमंजूषा, खेळ तयार करून पाचवीच्या ‘ग्रुप’ साइटवर टाकले तर विद्यार्थी आवडीने ते सोडविण्याचा प्रयत्न करतील. त्या विषयीचे त्यांचे ‘ज्ञान’ अपटेड (अद्ययावत) होईल व त्यांच्या मनात विषयाबद्दलची आवड निर्माण होऊ शकते.
‘ऑनलाइन प्रश्नमंजूषा’ तयार करण्यासाठी खालील वेब संकेतस्थळांचा वापर होऊ शकतो.
www.proprofs.com/guiz-school/
www.classmarker.com/
Google docs
http://en.quiz.biz/
त्याच विषयाच्या कुठल्याही पाठावार interactive  अथवा ‘इंटरअॅक्टिव्ह’ प्रेझेंटेशन अथवा सादरीकरण बनवून ते ‘पाचवी ग्रुप’च्या साइटवर प्रसिद्ध केले तर विद्यार्थी सक्रियपणे (अॅक्टिव्ह) शिकण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.
‘इंटरअॅक्टिव्ह’ प्रेझेंटेशन्स बनविण्यासाठी पॉवरपॉइंटचा वापर सर्वसामान्यपणे केला जातो.
तसेच काही ‘ऑनलाइन’ सोफ्टवेअर्स (संगणक कार्यप्रणाली)चा वापर करू शकतो. ती पुढीलप्रमाणे आहेत.
MASH 7.5
CD Start-It Litel.0.2
पुढील वेब संकेतस्थळावरून वर उल्लेखिलेली ‘सोफ्टवेअर’ तुम्ही ‘डाऊनलोड’ करू शकता. www. top4down. com/free-intcractive-powerpoint-presentations/ तसेच मुंबईतील एखादा विभाग अथवा वॉर्डामधील शाळांनी एकत्र येऊन सोशल नेटवर्किंग साइटचा वापर करून ‘जोडणी’ अथवा ‘नेटवर्क’ बनविले तर शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांना माहिती, अनुभव व कौशल्ये यांचे आदान- प्रदान करण्यास त्याची नक्की मदत होईल.
उदाहरण म्हणून मी मुंबईतील मराठी सेकंडरी स्कूलचा ‘साइट ब्लॉग’ निंग नावाच्या सोशल नेटवर्किंग साइटवर निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईतील ज्या शाळांना या साईटचे सभासद होण्याची इच्छा असेल ते मला ई-मेल करू शकतात. सभासद शाळा या ‘साइटवर’ आपल्या शाळांतील उपक्रम, शिक्षक व विद्यार्थ्यांचे प्रकल्प यांविषयी प्रसिद्धी विनामूल्य देऊ शकतात तसेच एखादा सृजनशील (क्रिएटिव्ह) शिक्षक आपले शैक्षणिक विचार या साइटच्या ‘ब्लॉग’वर मांडू शकतो.
http://mumbai-marathi-secondary- School.ning.com. अशा रीतीने सोशल नेटवर्किंगमुळे विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता (creativity), नेतृत्व कला (Leadership) व सहकारी तत्त्वावर शिकण्यासाठी उत्तेजन इत्यादी विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी आवश्यक गुणांचा विकास साधला जातो.
सोशल नेटवर्किंग साइटस्ची सूची.  
www.facebook.com
www.multiply.com
www.orkut.com
www.Myspace.com
www.bebo.com
www.flickr.com (फोटो व व्हिडोओ शेअर करण्यासाठी)
www.ibibo.com
www.linkedin.com (बिझनेस नेटवर्क)
www.twitter.com
सोशल नेटवर्किंग साइटवर रजिस्टर करण्याआधी:  
१) स्वत:चा ई-मेल अकाऊन्ट अथवा खाते असणे आवश्यक आहे. ई-मेल खाते उघडण्यासाठी पुढीलपैकी एका संकेत वेबस्थळावर ‘साइन अप’ करू शकता.
www.yahoomail.com
www.hotmail.com
www.gmail.com
www.rediffmail.com
२) आपला ई-मेल अकाऊंट उघडल्यावर आपण आपले आप्त, मित्र-मैत्रिणी यांचे ई-मेल पत्ते जमा करून ठेवावेत अथवा आपल्या ई-मेलच्या ”cntact” list मध्ये सेव (Save) करावेत.
३) वर उल्लेखिलेल्या सोशल नेटवर्किंग साइटच्या सूचीतील एखादी ‘साइट’ निवडून ‘साइन-अप’ अथवा रजिस्टर करावे.
रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर आपल्या ई-मेल अकाऊंटमधील ‘कॉन्टॅक्ट लिस्ट’ (Contact list) मधील पत्त्यांपैकी आपल्या इच्छेनुसार आप्तांना किंवा मित्र-मैत्रिणींना तुमच्या साइटचे सभासद होण्यासाठी आमंत्रण पाठवावे.
४) त्यांनी आमंत्रण स्वीकारल्यावर तुम्ही त्यांच्या साइटवरही भेट देऊ शकता. तुम्ही काही वैयक्तिक घटनांचे फोटो अथवा व्हिडीओ क्लीपस् आपल्या पर्सनल सोशल नेटवर्क साइटवर ‘अपलोड’ करू शकता.
५) कधीही कुणाला ‘ऑनलाइन’ आपल्या ई-मेलचा ‘पासवर्ड’ सांगू नये अथवा पाठवू नये.
६) जर तुम्ही सायबर कॅफेमधून ‘इंटरनेट’चा वापर करत असाल तर ‘ई-मेल’ अकाऊंट ‘साइन ईन’ करताना ”Remember Me on this computer” याच्या समोरील 4 अशे चिन्ह असेल, तर ‘बॉक्स’ वर क्लिक करून 4 चिन्ह काढून टाकावे व ‘बॉक्स’ रिकामे राहण्याची खबरदारी घ्यावी. जर तुम्ही असे केले नाही तर सायबर कॅफेमधून एखादी दुसरी व्यक्ती तुमच्या ई-मेलचा ‘पासवर्ड’ हॅक करून तुमच्या ई-मेल अकाऊंटचा गैरवापर करू शकतात.


Tags: EducationeLearningSocial Media
ShareTweetSend
Previous Post

हे आकर्षक मोबाईल बनू शकतात आयफोन-5 साठी अडथळा

Next Post

BIG LAUNCH: नोकिया, अ‍ॅपल, एलजीनंतर स्‍मार्टफोनच्‍या युद्धात आता HTC चीही उडी

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Ronaldo YouTube Channel

फुटबॉलपटू रोनाल्डोचं यूट्यूब चॅनल : २४ तासात तब्बल २ कोटी सबस्क्रायबर्स!

August 22, 2024
MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

June 2, 2024
Community Notes India

X (ट्विटर) वरील Community Notes आता भारतात उपलब्ध!

April 4, 2024
ट्विटरचा आजपासून निळ्या चिमणीऐवजी नवा 𝕏 लोगो!

ट्विटरचा आजपासून निळ्या चिमणीऐवजी नवा 𝕏 लोगो!

July 24, 2023
Next Post

BIG LAUNCH: नोकिया, अ‍ॅपल, एलजीनंतर स्‍मार्टफोनच्‍या युद्धात आता HTC चीही उडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ChatGPT India Plans Whats Included

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

August 19, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Windows 10 Marathi Typing

विंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड!

June 18, 2019
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ChatGPT India Plans Whats Included

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

August 19, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech