MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ऑपरेटिंग सिस्टिम्स Windows

आठवी खिडकी उघडली! विंडोज ८ बाजारात

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 1, 2012
in Windows, ऑपरेटिंग सिस्टिम्स
Windows-8.jpgकम्प्युटर , स्टायलसवर आधारित स्मार्टफोन , टचस्क्रीन फोन, टॅब्लेट पीसी , लॅपटॉप आदी सर्व आधुनिक युगातील संदेशवहन आणि माहितीसाठा करणाऱ्या गॅजेट्सना पूरक ठरणारी बहुचर्चित ‘ विंडोज ८ ‘ ही नवी ऑपेरेटिंग सिस्टिम गुरुवारी मायक्रोसॉफ्ट कंपनीने बाजारात आणली . 
विंडोज यूजरना ‘ विंडोज ८ ‘ साठी अपग्रेड करणे शक्य होणार असून, तशी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे . 


या नव्या सिस्टिममुळे संधीची नवी खिडकी उघडण्याबरोबरच तंत्रज्ञान क्षेत्रात कंपनी पुन्हा एकदा झेपावेल , अशी अपेक्षा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ ) स्टीव्ह बालमेर यांनी व्यक्त केली . विंडोज अपग्रेडची सुविधा ३९ . ९९डॉलरपासून उपलब्ध असेल , असे कंपनीच्या विंडोज विभागाचे अध्यक्ष स्टीव्हन स्निफेस्की यांनी जाहीर केले . 

ADVERTISEMENT

दीर्घकाळ चालणारी बॅटरी , वेगवान बूटिंग , लहान मेमरी याबरोबर ‘ विंडोज ७ ‘ च्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरना ‘ विंडोज ८ ‘ पूरक असणार आहे . माउस , की – बोर्ड आणि टचबरोबर काम करता येऊ शकेल , असेयाचे डिझाइन आहे आणि हेच या ऑपरेटिंग सिस्टिमचे वैशिष्ट्य आहे . ‘ विंडोज ८ ‘ आणि ‘ सरफेस टॅब्लेट ‘ ची विक्री शुकव्रारपासून सुरू होणार आहे . 


सध्याच्या स्टार्ट मेनू आणि आयकन्सच्या पलीकडचा विचार करून ‘ विंडोज ८ ‘ चा डिस्प्ले तयार करण्यात आला आहे . अॅप्लिकेशनच्या अपडेट्सची माहिती यावरून मिळू शकणार आहे . टचस्क्रीनचा लक्षात घेऊन यावरील टाइल मोठ्या करण्यात आल्या आहेत . त्यामुळे ‘ टच ‘ करणे सोपे जाणार आहे . स्पीकरचा आवाज नियंत्रित करण्यासाठी ऑयकॉन आपोआप झाकला जातो .यापूर्वी लाँच झालेल्या काहीऑपरेटिंग सिस्टिमची चर्चा आणि त्यांना मिळालेला प्रतिसादही चांगला होता .  विंडोज ८ या ऑपरेटिंग सिस्टिमचाही गाजावाजा होण्यासाठी कंपनीने प्री – लाँचसाठी प्रयत्न केले आहेत . मात्र ,कंपनीकडून पूर्वी लाँच झालेल्या ऑपरेटिंग सिस्टिमला मिळालेला प्रतिसाद विंडोज ८ ला मिळणार का यावर तज्ज्ञांकडून शंका व्यक्त केली जात आहे . 


विंडोज ८ मध्ये प्रत्येकासाठी नवे काही ना काही तरी असेल ,असा अंदाज आहे . टॅब्लेट पीसीप्रेमींसाठी टचस्क्रीन सुविधा ,नवा इंटरफेस आणि डेस्कटॉपबरोबरच येत असलेल्या पारंपरिक सॉफ्टवेअरना पूरक असे हे नवे सॉफ्टवेअर असणार आहे . मात्र , असे असले तरी ही ऑपरेटिंग सिस्टिम का घ्यावी, असा प्रश्न अनेक कंपन्यांना आहे . कंपनीने काही वर्षांपूर्वी विंडोज ७ बाजारात आणले . मात्र , अजूनही अनेक यूजर हे विंडोज एक्सपीवरून विंडोज ७ ला अपग्रेड होऊ शकलेले नाहीत . विंडोज ८ चा प्लॅटफॉर्म हा बिझनेस प्लॅटफॉर्मपेक्षा कन्झ्युमर प्लॅटफॉर्म असल्याचे वाटते आहे . त्यामुळे कंपन्यांना याकडून फारशा अपेक्षा नाहीत .परिणामी , कंपन्यांकडून विंडोज ८ ला मागणी असण्याची शक्यता कमी आहे . कम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टिमचा मोठा ग्राहक हा बिझनेस कॅटेगरीतला आहे . पर्सनल कॅटेरीचे प्रमाण तुलनेत कमी आहे . भारतासारख्या ठिकाणी पर्सनल कम्प्युटरवर लायसन्स प्रॉडक्ट वापरण्याबाबत फारशी जागरूकता नाही . एखादी कंपनी किंवा प्रॉडक्टला चांगला वा वाईट प्रतिसाद या गोष्टी घडत असतात . व्यवसाय कशा पद्धती बदलत आहे याचे उदाहरण म्हणून विंडोज ८ कडे पाहायला हवे . मात्र , कंपनी ग्राहक आणि वैयक्तिक ग्राहक यांच्यातील अंतर कमी होत असल्याचे हे संकेत आहेत , असाही कयास काही तज्ज्ञांनी बांधला आहे . टॅब्लेट पीसी आणि पीसी यांबाबत कोणतीही तडजोड करण्यास व्यावसायिक ग्राहक तयार नाहीत . त्यामुळे विंडोज ८ ला थोडाफार प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे .टच एक्सपिरिअन्समध्ये आपण मास्टर आहोत , याची चुणूक मायक्रोसॉफ्टकडून नव्या ऑपेरिंग सिस्टिमच्यामाध्यमातून दाखविली जाण्याची शक्यता आहे . कंपनी करत असलेले मार्केटिंग हे तरुण ग्राहकांना समोर ठेवून करण्यात आले आहे . 


विंडोज ८ चे ट्रायल व्हर्जन वर्षभरापूर्वी बाजारात उपलब्ध करून देण्यात आले . मात्र , कंपन्यांकडून याला थंड प्रतिसाद मिळालेला आहे . फोक्सवॅगन कंपनीने गेल्या वर्षी साठ हजार कम्प्युटरवर विंडोज ७ ही ऑपरेटिंग सिस्टिम बसविली . वर्षानंतर कंपनी नव्या ऑपरेटिंग सिस्टिमला अपग्रेड होण्याची शक्यता कमी आहे . त्यामुळे व्यावसायिक ग्राहकांकडून विंडोज ८ ला थंड प्रतिसाद मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीतआहेत . 

Tags: MicrosoftOfficeSurfaceWindows 8
ShareTweetSend
Previous Post

डेस्कटॉपही झालाय स्मार्ट

Next Post

कल्पनाशक्तीला वाव देणारा सॅमसंग गॅलक्सी नोट-२

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

मायक्रोसॉफ्ट बिंग सर्च आता ChatGPT सोबत : एज ब्राऊजरमध्येही AI !

मायक्रोसॉफ्ट बिंग सर्च आता ChatGPT सोबत : एज ब्राऊजरमध्येही AI !

February 8, 2023
MicrosoftRewardsIndia

मायक्रोसॉफ्ट रिवार्ड्स भारतात उपलब्ध : एज ब्राऊजर वापरा व बक्षिसे मिळवा!

August 22, 2022
Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
Microsoft Xbox Activision Blizzard

मायक्रोसॉफ्टने Activision Blizzard गेमिंग कंपनी ५ लाख कोटींना विकत घेतली!

January 18, 2022
Next Post

कल्पनाशक्तीला वाव देणारा सॅमसंग गॅलक्सी नोट-२

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

May 29, 2023
PlayStation Showcase

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

May 26, 2023
Moto Edge 40

मोटोरोलाचा Edge 40 भारतात सादर : 144Hz pOLED डिस्प्ले!

May 25, 2023
WhatsApp Edit Message

व्हॉट्सॲपवर आता पाठवलेला मेसेज एडिट करता येणार!

May 25, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
WhatsApp Chat Lock

आता व्हॉट्सॲपवर ठराविक चॅट लॉक करता येणार!

May 16, 2023
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

May 29, 2023
PlayStation Showcase

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

May 26, 2023

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

मोटोरोलाचा Edge 40 भारतात सादर : 144Hz pOLED डिस्प्ले!

व्हॉट्सॲपवर आता पाठवलेला मेसेज एडिट करता येणार!

लावा या भारतीय कंपनीचा AGNI 2 5G स्मार्टफोन सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!