MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home इंटरनेट

इंटरनेटची साथ प्रगतीला

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 30, 2012
in इंटरनेट
ADVERTISEMENT
इंटरनेटमुळे मुले बिघडतात , त्यांच्यावर वाइट संस्कार होतात, लहान वयात त्यांना टेक्नॉलॉजी हाताळायला देऊ नये , असे आपल्याकडे नेहमी बोलले जाते . मात्र अमेरिकेत वॉशिंग्टन येथे करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे मुलांची प्रगती होते आणि त्यांची जबाबदारीची जाणीव वाढते , असे दिसून आले आहे . ‘ स्व ‘ ची जाणीव वृद्धिंगत होण्यासाठी टेक्नॉलॉजीचा कितपत उपयोग होतो , यावर मात्र या सर्व्हेतून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे . 


‘ डिजिटल मीडिया ‘ च्या तज्ज्ञ आणि इन्फर्मेशन स्कूलमधील सहाय्यक प्राध्यापिका केटी डेविस यांनी ३२किशोरवयीन मुलांच्या मुलाखती घेतल्या . १३ ते १८ या वयोगटातील मुलामुलींना त्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले. या सर्व्हेसाठी त्यांनी बर्मुडा बेट निवडले . तेथील मुलांच्या टेक्नॉलॉजी हाताळण्याच्या सवयी अमेरिकेतील मुलांप्रमाणेच आहेत . 


मित्रांशी संवाद साधण्यासाठी या माध्यमांचा वापर कशा पद्धतीने करता , अशा प्रकारचे प्रश्न मुलांना विचारण्यात आले . त्यांना जी उत्तरे मिळाली , त्यावरून मोबाईल , इंटरनेट यांचा वापर किशोरवयीन मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि या मुलांना घडवण्यात या टेक्नॉलॉजीचाही बराच वाटा आहे , याची जाणीव त्यांना झाली .९४ टक्के मुलांकडे सेल फोन आहेत . त्यातील ५३ टक्के मुलांकडे इंटरनेट आहे . ९१ टक्के मुलांचे फेसबुक प्रोफाइल्सआहे . 


७८ टक्के जणांकडे ‘ एमएसएन ‘, ‘ एओएल ‘ किंवा स्काइप या ‘ ऑनलाइन इन्स्टंट मेसेजिंग ‘ सुविधा आहेत . ९४टक्के मुले यू – ट्यूब वापरतात आणि ९ टक्के मुले ट्विटर वापरतात . या माध्यमांद्वारे ते नेमका कोणता संवाद साधतात , याबद्दल डेविस यांनी मुलांना विचारले आणि त्यांच्या वेगवेगळ्या अशा दोनशे उत्तरांचे विश्लेषण केले .वैयक्तिक समस्या आणि एखाद्याबद्दल आपल्याला काय वाटते , याविषयी फारसे बोलले गेले नाही . 


होमवर्क आणि दिवसभरात आपण काय केले , याविषयी मात्र बरेचसे बोलले गेले . अशा प्रकारचे संभाषण मुलांचे दिवसभर चालते . कॉलेज आणि जेवणाच्या वेळेला मात्र हा ऑनलाइन संवाद बंद असतो . ६८ टक्के कम्युनिकेशन फेसबुकवरून चालते . कुठला फोटो अपलोड केला आहे , यू – ट्यूबवर काय पाहण्यासारखे यांसारख्या संवादातून किशोरवयीन मुले ‘ कनेक्टेड ‘ राहतात . ६९ टक्के मुले भावनिक गप्पा मारताना दिसतात . त्यात मुलींचे प्रमाण अधिक आहे . 


भावनिक गुंता सोडवण्यामागे आपला मित्र – मैत्रीण आपल्याला मदत करेल , अशी भावना त्यांच्यामध्ये असते .प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा डिजिटल कम्युनिकेशनच ही मुले अधिक पसंत करतात . टेक्नॉलॉजीपासून आपण दूर जाऊ नये ,यासाठी ते सतत स्वतःला अपडेट ठेवतात . या टेक्नॉलॉजीमुळे मुले बाह्यतः बरीच प्रगती करतील . इतरांना ओळखायला शिकतील ; पण ‘ स्व ‘ ची अनुभूती अर्थात ‘ स्व ‘ ची जाणीव यांतून नेमकी किती तयार होईल , हे मात्र आताच सांगता येणार नाही , असे डेविस यांनी सांगितले . नोव्हेंबरमधील ‘ अॅडॉल्सन्स ‘ या जर्नलमध्ये हे संशोधनप्रसिद्ध होणार आहे . 

।।।———–       महाराष्ट्र  टाइम्स  
Tags: EducationeLearningInternet
ShareTweetSend
Previous Post

वेबसाइट खेळ होणार मल्टिडायमेन्शनल

Next Post

आठवी खिडकी उघडली!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
Google Chrome Ver 100

गूगल क्रोमची १०० वी आवृत्ती नव्या लोगोसह उपलब्ध!

March 30, 2022
Baby Shark YouTube

बेबी शार्क यूट्यूब व्हिडिओचे तब्बल १,००० कोटी व्ह्यूज पूर्ण!

January 17, 2022
Google Search For Education

गूगल सर्चचा वापर करून शैक्षणिक विषय समजून घेणं आणखी सोपं!

March 29, 2021
Next Post
आठवी खिडकी उघडली!

आठवी खिडकी उघडली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022
Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
Xbox Games Showcase

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

June 13, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

ॲपल WWDC 2022 : iOS 16, iPadOS 16, macOS Ventura अपडेट्स सादर

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!