सॅमसंगने भारतात नुकताच आपला गॅलक्सी नोट 2 सादर केला आहे. त्यानंतर ही कोरियन कंपनी आता आपला नवा गॅलक्सी कॅमेराही लाँच करणार आहे. त्यासाठी मुहूर्त निवडला आहे दीपावलीचा, ज्या काळात सर्व भारतीय मनसोक्त खरेदी करतात.
हा कॅमेरा यंदाच्या बर्लिन गॅझेट महोत्सवात लाँच करण्यात आला होता. गॅलक्सी नोट 2 प्रमाणेच गॅलक्सी कॅमेराही अँड्रॉइड जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. या कॅमेर्यात 16 मेगापिक्सेल झूम असून, त्याचे लेन्स 23-480 मिमीचे आहेत. कॅमेर्याचे अपार्चर एफ/2.8 असून, त्याचे लेन्स 21 एक्स झूम परिणाम साधतात. सॅमसंगच्या या नव्या कॅमेर्यात 1.4 गीगाहर्ट्झ क्वाड कोअर एक्झिनॉस प्रोसेसर बसवण्यात आलेला आहे. त्याचा डिस्प्ले 4.8 इंचांचा असून, तो 1080 7 720 पिक्सेल रेझोल्युशन देतो. कॅमेर्यात 3 जी कनेक्टिव्हिटी फीचरही आहे.
गॅलक्सी कॅमेर्याची इंटरनल स्टोरेज क्षमता 8 जीबी असून, ती 32 जीबीपर्यंत वाढवता येते. 3 जीशिवाय वायफाय, ब्लूटूथ 4.0 हे कनेक्टिव्हिटी पर्यायही उपलब्ध आहेत. सॅमसंगच्या या कॅमेर्यात तुम्हाला फोटो एडिटिंगची सुविधाही मिळते. या कॅमेर्याची किंमत अजून जाहीर करण्यात आलेली नाही.
क्लिक अॅन्ड शेअर हे आजच्या पिढीचे ब्रीदवाक्य झाले आहे. आनंदाचे-दु:खाचे सर्व क्षण त्यांना कॅमेऱ्यात बंदिस्त करायला आवडतात. हेच ध्यानात घेऊन अनेक मोठय़ा कंपन्यांनी डिजिटल कॅमेरे अगदी स्वस्तात बाजारात आणले. पण कॅमेऱ्यातून फोटो काढल्यानंतर ते सोशल नेटवर्किंग साइटवर अपलोड करण्यासाठी कॅमेरा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरला जोडणे आलेच. मग मोबाइल कंपन्यांनी शक्कल लढवली. त्यांनी स्मार्टफोन तयार केला, ज्यामध्ये चांगला कॅमेराही असेल आणि लागलीच सोशल नेटवर्किंग साइट्सशीही कनेक्ट होता येईल. त्यामुळे आता मोबाइलचा फोन करण्यासाठी कमी आणि फोटो किंवा व्हिडीओ काढून ते इंटरनेटवर शेअर करण्यासाठी अधिक वापर केला जातो.
आता अशा प्रकारचे स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये अग्रस्थानी असलेली कंपनी म्हणजे सॅमसंग. ग्राहकांची योग्य नस ओळखून सॅमसंगने गेल्या काही वर्षांमध्ये अनेक देशांत स्मार्टफोन आणि डिजिटल कॅमेऱ्यांची बाजारपेठ काबीज केली आहे. विशेष म्हणजे क्वालिटीचा विचार करताना त्यांनी नेहमीच ग्राहकांच्या खिशाचाही विचार केला आहे.
वर नमूद केलेली परिस्थिती ध्यानात घेऊन सॅमसंगने या वेळी फार मोठे धाडसी पाऊल उचलले आहे. गॅझेटविश्वात खळबळ उडवून देणारे एक अफलातून उत्पादन ही कंपनी येत्या दिवाळीपूर्वी बाजारात दाखल करत आहे. मागच्याच आठवडय़ात हैदराबाद येथे त्याची एक झलक प्रसारमाध्यमांना दाखवण्यात आली. त्याचं नाव आहे सॅमसंग गॅलक्सी कॅमेरा. हा कॅमेरा फोटोग्राफीची व्याख्याच बदलून टाकेल असा कंपनीचा दावा आहे. अॅन्ड्रॉइड जेली बीन ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारा हा डिजिटल कॅमेरा व्यावसायिक वापरासाठीसुद्धा वापरता येईल. थ्रीजी, वाय-फाय, ब्लूटुथ, शूटिंग मोड, सोशल नेटवर्किंग, इंटरनेट, टचस्क्रीन, १६ मेगापिक्सल आणि २१ एक्स ऑप्टिकल झूम ही याची काही ठळक वैशिष्टय़े.
पण ही झाली फक्त झलक. याशिवाय तोंडात बोटं घालायला लावणाऱ्या अनेक भन्नाट गोष्टी यामध्ये ठासून भरलेल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत त्या भन्नाट गोष्टी.
स्मार्ट-प्रो मोड – छायाचित्रे काढण्याचा सोप्पा पर्याय
जर तुम्हाला मोठय़ा व्यावसायिक कॅमेऱ्यांचा हेवा वाटत असेल तर आता ते थांबवा आणि उत्कृष्ट छायाचित्रे घेण्यासाठी सज्ज व्हा. यातील स्मार्ट-प्रो मोडमुळे रात्रीच्या अंधारामध्येही दिव्यांचे नानाविध रंग तुम्हाला टिपता येणार आहेत. किंवा एखादा जलद बाइकस्वार त्याच्या वेगाबरोबर जागीच थांबवता येणार आहे. हे सर्व शक्य आहे फक्त एका बटणावर.
स्लो मोशन व्हिडीओ
चित्रित केलेला व्हिडीओ स्लो मोशनमध्ये पाहण्यापेक्षा, आता तो स्लो मोशनमध्येच चित्रित करणे शक्य आहे. तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण दर सेकंदाला १२० फ्रेम्स यानुसार ७२०x४८० या रेसोल्युशनमध्ये चित्रितच करता येणार आहेत. एवढेच नव्हे तर क्रिस्टल क्लिअर व्हिडीओच्या जादुई पद्धतीने पुन्हा स्लो मोशनमध्ये पाहता येतील.
१२१.२ एमएम (४.७७) एचडी सुपर क्लिअर टच डिस्प्ले
कॅमेऱ्याच्या आजवरील सर्वात मोठय़ा स्क्रीनवर तुमचे फोटो आणि व्हिडीओ पाहण्याचा आनंद घ्या. आता तुमचे फोटो आणि व्हिडीओ पाहण्यासाठी किंवा एडिट करण्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटर अथवा लॅपटॉपची आवश्यकता नाही. बहुरंगी आणि प्रत्येक इंचाला अल्ट्रा शार्प ३०८ पिक्सल असा १२१.२एमएम (४.७७) एचडी सुपर क्लिअर टच डिस्प्ले ही याची सगळ्यात मोठी खासियत म्हणता येईल. एवढंच नव्हे बॅटरीची तमा न बाळगता (मुख्यत: अंधारात) नव्या व्हाइट मॅजिक तंत्रज्ञानामुळे तुम्ही याचा ब्राइटनेस दुप्पट करू शकता. चित्रपटगृहात पडद्याचे अनुमान हे १६:९ असते. याच आधारावर गॅलक्सीच्या स्क्रीनची आखणी करण्यात आली आहे, हे विशेष.
नैसर्गिक आणि साधी बाह्यरचना
याच्या अतिशय साध्या बाह्यरचनेमुळे फोटोग्राफी अथवा छायाचित्रण करताना विशेष कष्ट घ्यावे लागत नाहीत. मागच्या बाजूस स्क्रीनवर एकही बटन नाही आणि वरच्या बाजूस आवश्यक तेवढीच तसेच योग्य ठिकाणी बटणांची केलेली रचना यामुळे फोटोग्राफी अधिक मजेशीर आणि आनंददायी होते.
व्हॉइस कंट्रोल – न लाजता तुमच्या कॅमेऱ्याशी संवाद साधा
हा कॅमेरा फक्त छायाचित्रे घेत नाही तर त्याशिवायही अनेक गोष्टी करतो. तो तुमचे ऐकतोसुद्धा. यातील व्हाइस कमांड मोडमुळे तुम्ही जे बोलाल त्याप्रमाणे तो काम करेल. त्यामुळे अजिबात न लाजता त्याला झूम इन किंवा झूम आऊटच्या कमांड द्या, टायमर सेट करा आणि तुम्ही जेव्हा तयार असाल तेव्हा त्याला फोटो काढायला सांगा. एवढंच नव्हे तर, फोटो गॅलरीमधील छायाचित्रे पाहताना त्याला ती उलट-सुलट फिरवायला, डिलीट करायला किंवा सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर करायलाही सांगू शकता.
फोटो विझार्ड
गॅलक्सीमध्ये तब्बल ६५ पॉवरफुल एडिटिंग फिचर्स उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या फोटोला व्यावसायिक रूप देऊ शकता. यातील अल्ट्राफास्ट क्वाड कोर प्रोसेसर आणि सुपर एचडी स्क्रीनमुळे तुम्ही फोटोवर अतिशय बारीक काम करू शकता.
मूव्ही विझार्ड
गॅलक्सीमुळे तुमचं मूव्ही बनवण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय तुम्ही यातील विविध फीचर्सच्या आधारे सहजपणे लहान-मोठय़ा मूव्ही तयार करू शकणार आहात.
स्मार्ट कॉन्टॅन्ट मॅनेजर
तुम्ही काढलेले फोटो कसे आणि कुठे सेव्ह करायचे हे तुम्हाला कळत नसेल किंवा कधीकधी ते करण्याचा कंटाळा येत असेल तर घाबराचं कारण कारण नाही, तुमच्यासाठी हे काम गॅलक्सी करेल. तो अतिशय स्मार्टपणे फोल्डर तयार करेल, तुमच्या मित्र-मैत्रिणींना फोटोमध्ये टॅग करेल एवढंच नव्हे तर कोणते फोटो खराब आहेत, डिलीट करायला हवेत तेसुद्धा सांगेल. तसेच विविध मोड्सद्वारे तुम्हाला तुमची फोटो गॅलरी पाहतचा येणं शक्य होणार आहे.
शूट करा आणि रिअल टाइमवर शेअर करा
आता कॅमेऱ्यामध्ये फोटो काढा, मग कॉम्प्युटरवर टाका आणि अप करा ही झंझट दूर होणार आहे. फोटो काढल्यावर वाय-फायद्वारे तुम्ही ते ताबडतोब शेअर करू शकता. एवढंच नव्हे तर रेंजमध्ये असणाऱ्या तब्बल आठ डिव्हाइससोबत तुम्हाला ते शेअर करता येणार आहेत.
ऑटो क्लाऊड बॅक-अप
महत्त्वाचे फोटो डिलीट झाले, खराब झाले, हरवले ह्या गोष्टी आता कालबाह्य होणार आहेत. गॅलक्सीमध्ये तुम्ही काढलेले फोटो ताबडतोब आपोआप क्लाऊडमध्ये सेव्ह करता येणार आहेत.
अमर्याद कनेक्टिव्हिटी – सगळीकडे कनेक्टेड राहा
बाहेरगावी जाताना तुमचा लॅपटॉप आता तुम्ही घरीच ठेवू शकता. कारण कॅमेऱ्यातूनच तुम्ही तुमचे फोटो अपलोड करून तुमच्या आवडत्या सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर करू शकता. यातील थ्रीजी आणि वाय-फाय कनेक्टिव्हिटीमुळे हे आता जगाच्या कुठल्याही कोनाकोपऱ्यातून सहजशक्य होणार आहे.












