MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

आयट्यून्स भारतात

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 7, 2012
in ॲप्स
देशातील मोबाइल आणि टॅबलेटधारकांना नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे पाहिजे असेल , तर ते अॅपलचा मार्ग चोखाळतात. भारतात एमपी३ प्लेयरच्या सुरुवातीच्या काळात तर आयपॉडची धूम होती. नंतर स्मार्टफोनच्या जगात आयफोन आणि टॅबलेटमध्ये आयपॅड. अॅपलने केलेल्या सुरुवातीनंतर मग सॅमसंग , नोकिया आणि इतर कंपन्या पुढे आल्या. 

पण अॅपलच्या उत्पादनांचा पूर्ण आनंद घेण्यासाठी आयट्यून पाहिजे आणि भारतात त्या उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे अॅपल युजर्सना ‘ थोडेसे कमी ‘ मिळत होते. पण आता ही कमतरताही दूर झाली आहे. अॅपलने भारतासाठी स्वतंत्र आयट्यून्स स्टोअर सुरू केले आहे. 
एप्रिल २००३ पासून अमेरिकेत आयट्यून्स म्युझिक स्टोअरची सुरुवात झाली. 

सध्या ९७ देशांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. त्यात गाणी , चित्रपट , टीव्हीवरील कार्यक्रम उपलब्ध आहेत. जूनमध्ये हाँगकाँग , सिंगापूर , तैवान यांसारख्या १२ आशियायी देशांमध्ये आयट्यून्स स्टोअर सुरू झाले , पण त्यात इंडोनेशिया आणि भारताचा समावेश नव्हता. अखेर मंगळवारपासून स्वतंत्र आयट्यून्स स्टोअर भारतीयांसाठी खुले झाले आहे. 
त्यात संगीत ,गाणी , चित्रपट विकत घेता येतात , तसेच भाड्यावरही घेता येतात. आतापर्यंत आयट्यून्स स्टोअरवर केवळ काही मोफत पुस्तके आणि पॉडकास्ट उपलब्ध होते. पण आता यावर आंतरराष्ट्रीय संगीतापासून बॉलिवूडपर्यंत सर्व काही मिळणार आहे. 
त्यासाठी प्रत्येक गाण्याला ७ ते १५ रुपये मोजावे लागतील. फ्लिपकार्टवर प्रत्येक गाण्यासाठी १५ रुपये मोजावे लागतात. तसेच प्रत्येक अल्बमसाठी किमान ७० रुपये खर्च करावा लागेल. सर्वसाधारण दर्जाचे चित्रपट ८० रु. भाडे देऊन उपलब्ध आहेत तर विकत घेण्यासाठी २९० रु. मोजावे लागतील. एचडी फॉरमॅटमधील चित्रपट भाड्याने हवे असतील तर १२० रुपये आणि विकत घेण्यासाठी ४९० रु. मोजावे लागतील. मात्र इतर बाजारपेठांप्रमाणे येथे टीव्हीवरील कार्यक्रम मिळणार नाहीत. 
हीच या सुविधेतील एक त्रुटी आहे. सोबतच अॅपलने आयट्यून्स मॅच ही सुविधादेखील भारतात लॉँच केली असून त्याद्वारे आयट्यून्सच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून घेतलेले संगीत आणि इतर गोष्टी आयक्लाऊडमध्ये साठवता येणार आहेत. मात्र त्यासाठी वर्षाला १ , २०० रु. शुल्क द्यावे लागेल. 
आयट्यून्सला भारतात गाना डॉट कॉम , धिंगाणा डॉट कॉम वगैरे साइटचा सामना करावा लागेल. तर चित्रपटाच्या सेवेसाठी बॉक्स टीव्हीसारख्या साइटशी स्पर्धा करावी लागणार आहे. 

ADVERTISEMENT
Tags: AppleAppsiTunesMoviesMusicSongs
ShareTweetSend
Previous Post

मोबाईल चार्ज करणारे बोन्साय झाड

Next Post

जीमेलचे ‘स्पेस मॅनेजमेंट’

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
Macbook Pro Mac Mini M2 Pro

ॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध! आता M2 Pro & Max सह!

January 24, 2023
Lensa AI

तुमच्या फोटोंद्वारे बनवा भन्नाट डिजिटल चित्रं : Lensa AI ची कमाल!

December 11, 2022
Google Play 2022 Best Apps Games

गूगल प्लेवर २०२२ मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

December 9, 2022
Next Post

जीमेलचे 'स्पेस मॅनेजमेंट'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!