MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ऑपरेटिंग सिस्टिम्स

अँड्रॉइडला दोन नवे पर्याय? फायरफॉक्स आणि उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 27, 2013
in ऑपरेटिंग सिस्टिम्स

web corner

फीचर फोनवरून स्मार्टफोनपर्यंत झालेला प्रवास हा गॅजेट प्रेमींसाठी सुखद राहिला. स्मार्टफोनच्याही पुढे आता तो सुरू झाला आहे. स्मार्टफोन लोकप्रिय ठरण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली गेली ती ऑपरेटिंग सिस्टीमकडून. पूर्वी लोकांना मायक्रोसॉफ्टची ‘ विंडोज ‘ आणि ‘ लिनक्स ‘ या ऑपरेटिंग सिस्टीम असतात हे माहीत होते. स्मार्टफोनच्या डेव्हलपमेंटमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम महत्त्वाची आहे. अॅपल या कंपनीने ‘ आयफोन ‘ साठी आयओएस ही सिस्टीम डेव्हलप केली. यात असलेली संधी पाहून गुगल या इंटरनेटमधील सर्च इंजिन कंपनीने या क्षेत्रात उडी मारत अँड्रॉइड ही ओपन सोर्स मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीम लाँच केली. ही सिस्टीम अन्य ऑपरेटिंग सिस्टीमच्या तुलनेत तशी नवीन असली , तरी कमी कालावधीत या सिस्टीमने गती पकडली. भारतात अँड्रॉइडवरील मोबाइल फोन अधिक खपतात. बहुतेक अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट कंपन्यांनीदेखील या सिस्टीमवर रन होऊ शकेल , अशी अॅप डेव्हलमेंट केली आहे ; तर काही करीत आहेत. 


ऑपरेटिंग सिस्टिमधील संधी 
व्यवसायाच्या संधी खुणावत असल्याने फायरफॉक्स आणि उबंटू यांनीही या क्षेत्रात पुन्हा प्रवेश केला आहे. मोबाइल ऑपेरटिंगच्या बाजारपेठेत आघाडीवर अ-सलेल्या आयओएस आणि अँड्रॉइडला यामुळे स्पर्धा मिळण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनने हा कम्प्युटरसारखे काम करावे , ही संकल्पना वापरून ‘ उबंटू ‘ आपले मार्केटिंग करीत आहे. त्यामुळे कम्प्युटरसारखाच अनुभव सर्व प्लॅटफॉर्मवर एकसारख्या पद्धतीने मिळण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. ‘ मोझिला ‘ ने फायरफॉक्स ऑपरेटिंग सिस्टिमसाठी लो-एंड फोनना उद्दिष्ट ठेवले आहे. अर्थात , यात स्मार्टफोनचा विचार कंपनीने केलेला आहे. कम्प्युटरवर एखादी वेबसाइट पाहण्याचा अनुभव मिळतो , तसाच अनुभव स्मार्टफोन मिळावा यासाठी कंपनी प्रयत्न करीत आहे. 


‘ उबंटू ‘ ने अॅप्लिकेशन डेव्हलपर्सना मोबाइल प्लॅटफॉर्मसाठी अॅप डेव्हलप करण्याचे निमंत्रण दिले आहे. यासाठी वेबकिटचा वापर करण्यात येणार आहे. मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीममध्ये दीर्घकालीन उद्दिष्ट घेऊन ‘ कॅनोकल ‘ ही कंपनी उतरत आहे. त्यामुळे ‘ उबंटू ‘ या सिस्टीमसाठी हळूहळू पावले टाकीत कंपनी उद्दिष्टाच्या दिशेने वाटचार करती आहे. 


‘ मोझिला ‘ च्या म्हणण्यानुसार अँड्रॉइड हा ओपन सोर्स प्लॅटफॉर्म नाही. मात्र , असा दावा गुगल कंपनीकडून केला जातो. बहुतेक डिझाइनचे निर्णय हे गुगल कंपनीने घेतलेले असतात आणि ते डेव्हलपर्सपुढे ठेवले जातात. त्यामुळेच’ मोझिला ‘ ची फायरफॉक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम या सगळ्यांना एक पर्याय ठरेल. कंपनीने यासंबंधीचे पहिले प्रारूप नुकत्याच झालेल्या ‘ कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक शो ‘ मध्ये ‘ झेटीई ‘ या कंपनीच्या मोबाइलवर दाखविले. फायरफॉक्स ऑपरेटिंग सिस्टीम डेव्हलपमेंटच्या अखेरच्या टप्प्यात असून , पुढील काही आठवड्यांतच ती बाजारपेठेत उपलब्ध होईल. या दोन नव्या ऑपरेटिंग सिस्टिममुळे स्मार्टफोन युजरनी नवा आणि आणखी चांगला वेब अनुभव मिळण्याची अपेक्षा करायला हरकत नाही. 

ADVERTISEMENT
Tags: AndroidFirefoxLinusOperating SystemsUbuntu
ShareTweetSend
Previous Post

टीव्हीचा मेकओव्हर

Next Post

1 कोटी गॅलेक्सी मोबाइलची विक्री

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

February 20, 2025
Crowdstrike BSOD Windows

जगभरातील विंडोज वर्क पीसीज् बंद : बँका, विमानतळे, रेल्वे अशा सेवा विस्कळीत!

July 19, 2024
Next Post
1 कोटी गॅलेक्सी मोबाइलची विक्री

1 कोटी गॅलेक्सी मोबाइलची विक्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech