MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

फ्री कॉलिंगला वाढती पसंती

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 26, 2013
in ॲप्स
free-callingस्वस्त कॉलिंगचा मोसम सरल्यानंतर आता टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा , त्यानंतर झालेला स्पेक्ट्रमचा लिलाव , ३ जी यासारख्या बाबींमुळे मोबाइलचे कॉलरेट पुन्हा वाढू लागले आहेत. त्यामुळे स्वस्तात (काहींना तर फुकटात!) कॉल करण्याची सवय लागलेल्यांना आपले बजेट जुळवणे कठीण होते आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी आता इंटरनेट बेस्ड फ्री कॉलिंगची सुविधा देऊ केली आहे. 

त्यामुळे विबर , स्काइप ,निंबुझ , फ्रिंग , टँगो आणि काकाओ टॉक यांसारख्या मोबाइल अॅप्लिकेशन्सने मोबाइल डेटा व वायफायच्या आधारे देऊ केलेल्या फ्री कॉलिंगच्या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ब्लॅकबेरीनेही नुकतीच त्यांची मेसेंजर सर्विस अपग्रेड केली असून त्यात बीबीएम व्हॉइस हे फीचर अॅड केले आहे. त्याआधारे वाय-फायचा वापर करून जगातील कोणत्याही व्यक्तीला मोफत कॉल करता येतो. लवकरच ही सुविधा भारतात उपलब्ध होणार आहे. 


निंबुझने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार , गेल्या डिसेंबरपर्यंत भारतात निंबुझ ते निंबुझ असे तब्बल एक अब्ज ६८ कोटी मिनिटांचे कॉल केले. २०११ मधील ५१ कोटी मिनिटांच्या तुलनेत हा आकडा तिप्पट झाला आहे. फ्री कॉलिंगची सुविधा देणाऱ्या अॅप्सना मिळणारा प्रतिसाद वाढत असला , तरी त्यामुळे व्यवसायावर काही परिणाम झाला किंवा नाही याबाबत टेलिकॉम कंपन्या बोलण्यास तयार नाहीत. मात्र दूरसंचार क्षेत्रातील जाणकार हे मान्य करतात. स्काइप किंवा विबरसारख्या अॅपमुळे इंटरनॅशनल कॉल करणाऱ्यांचा खूप फायदा होतो. तसेच विविध राज्यात प्रवास करणाऱ्यांनाही रोमिंग चार्जेस द्यावे लागत नाहीत. त्यामुळे या सुविधांना मिळणारा प्रतिसाद वाढतो आहे , असे जाणकार सांगतात. प्रामुख्याने अँड्रॉइड डिव्हाइसच्या वाढत्या वापरामुळे अॅप टू अॅप फ्री कॉलिंग वाढले आहे. प्रामुख्याने कॉलेजला जाणारे विद्यार्थी व तरुण व्यावसायिकांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. त्यातच नॅशनल टेलिकॉम पॉलिसीमध्ये इंटरनेटवर आधारित व्हॉइस कॉल्सची परवानगी देण्यात आल्याने फ्री कॉलिंगच्या सुविधेला मिळणारा प्रतिसाद वाढतोच आहे. 


अगदी दूरसंचार मंत्री कपिल सिबल यांनीही मोबाइल कंपन्यांना त्यांचे बिझनेस मॉडेल बदलून व्हॉइस कॉलिंगची सुविधा मोफत देत डेटा वापरासाठी शुल्क आकारण्याची शिफारस केली आहे. आजकाल विविध कार्यालये ,बीपीओ आणि मॉल्समध्ये वायफाय सुविधा घेण्याचे प्रमाण वाढते आहे. निश्चित आकडेवारी उपलब्ध नसली , तरी देशात जवळपास २० हजार वायफाय हॉटस्पॉट असल्याचा अंदाज आहे. 

ADVERTISEMENT
Tags: AppsCallsFreeFringNimbuzzSkypeTangoViber
ShareTweetSend
Previous Post

व्हिडिओ गेमिंगमध्ये सगळ्यांचा बाप सोनीचा PlayStation 4 लॉन्च

Next Post

सावधान… फेसबुकवर स्पॅमचा सुळसुळाट

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Affinity by Canva FREE

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

November 7, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Next Post

सावधान... फेसबुकवर स्पॅमचा सुळसुळाट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech