MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टॅब्लेट्स

राज्य टॅबलेटचं : २०१३मधील टॉप टेन टॅबलेट्स

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 16, 2013
in टॅब्लेट्स
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात येत्या वर्षात टॅबलेटचे राज्य असेल , हे सांगायला आता कोणा तज्ज्ञाचीही गरज पडणार नाही. व्यावसायिक उपयोगाबरोबरच खासगी उपयोगासाठीही सर्वत्र टॅबलेटचा वापर सुरू होणार हे आजूबाजूच्या परिस्थितीवरून दिसू लागले आहे . पण सर्वच टॅबलेट कंपन्यांना या ट्रेंडचा लाभ उठवता येणार नाही . सध्या तरी अॅपल , सॅमसंग , गुगल यांसारख्याच कंपन्या या मार्केटवर वर्चस्व गाजवणार हे स्पष्ट आहे . त्यामुळे ओळख करून घेऊया २०१३मधील टॉप टेन टॅबलेट्सची … 



गुगल नेक्सस १० 


चालू वर्षात नेक्सस १० हा आयपॅडला टक्कर देणारा सर्वात आघाडीचा टॅब असणार आहे . चांगल्या तऱ्हेने डिझाइन केलेला हा गुगलचा एक उत्कृष्ट टॅब आहे . याची १० इंची स्क्रीन अनेक युजर्ससाठी खूपच फायद्याची ठरणार आहे . अँड्रॉइडच्या अत्यंत अद्ययावत व्हर्जनसह येणारा हा टॅब जुन्या किंवा कमी सुरक्षित ऑपरेटिंग सिस्टीमचा तिटकारा असणाऱ्यांसाठी आकर्षण ठरणार आहे . 


सॅमसंग गॅलेक्सी टॅब २ 


सॅमसंग गॅलेक्सी टॅब २मध्ये अनेक पर्याय उपलब्ध असल्याने ग्राहकांमध्ये नेमका कोणता घ्यावा , याविषयी गोंधळ निर्माण होऊ शकतो . तरीही हा एक उत्तम टॅब आहे . ७ इंची किंवा १० . १ इंची स्क्रीनमधून निवडण्याचा पर्याययामध्ये उपलब्ध आहे . दोन्हींमध्ये केवळ वायफाय असणारा किंवा ४ जीवर चालणारा पर्याय उपलब्ध आहे .त्यामुळे हा एक अतिशय चांगला टॅब असून त्याच्या बलस्थानांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही . 


अॅमेझॉन किंडल फायर एचडी ८ . ९ 


७ इंची आणि ९ – १० इंची टॅबलेटच्या दरम्यानचा हा एक चांगला टॅब आहे . याची किंमत जरा जास्त असली ,तरी त्यातील फीचर्सही तितकेच आकर्षक आणि उपयुक्त आहेत . अँड्रॉइडवर चालणारा अतिशय उत्तमरित्या डिझाइन केलेला किंडल तसाच दर्जेदारही आहे . सोबतच त्याचे अॅप स्टोअर थेट गुगलच्या प्ले स्टोअरला टक्कर देते. त्यामुळे या वर्षात किंडलला यश मिळणारच . 


गुगल नेक्सस ७ 


नुकताच प्ले स्टोअरवरून भारतात दाखल झालेला गुगलचा नेक्सस ७ हा ७ इंची श्रेणीतील सर्वोत्कृष्ट टॅब आहे .जेलीबिनवर चालणार हा टॅब अतिशय सुरेख डिझाइनमध्ये उपलब्ध आहे . नेक्सस हा या श्रेणीतील एक अतिशय परवडणारा टॅब आहे . 


बार्नेस अँड नोब नूक एचडी प्लस 


भारतीयांना तुलनेने कमी माहिती असलेला हा टॅब त्याच्या श्रेणीतील किमतींना अगदी योग्य न्याय देणार आहे .२६ जीबी मेमरीसह मिळणाऱ्या या टॅबमध्ये १९२० बाय १२८० इतके फुल एचडी रिझोल्यूशन मिळते .वाचनाची आवड असणारे तर बार्नेस अँड नोबलच्या इ – बुक लायब्ररीला धन्यवादच देतील . किंडलला हा एक उत्तम पर्याय आहे . 


आयपॅड मिनी 


काहीजण आयपॅड मिनीला टॅबलेटच्या क्षेत्रातील चमत्कार मानतात . ७ . ९ इंची स्क्रीन असलेला मिनी मूळ आयपॅडपेक्षा खूप लहान आहे . पण तरीही त्यात आयओएसचा पूर्ण अनुभव मिळतो , जो अॅपलच्या अनेक चाहत्यांचा वीक पॉइंट आहे . सोबतच हा भल्यामोठ्या स्क्रीनच्या टॅबलेटपेक्षा पुष्कळसा मोबाइलच वाटतो . 


सॅमसंग गॅलेक्सी नोट १० . १ 


गॅलेक्सी नोट १० . १ हा व्यावसायिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही प्रकारच्या युजर्सचा आवडता टॅबलेट ठरला आहे. १० . १ इंची भलीमोठी स्क्रीन , दमदार प्रोसेसर आणि यातील इतर काही फीचर्स ग्राहकांना खूप आवडतात .यात असलेल्या अनेक गोष्टी इतर कुठल्याही टॅबलेटमध्ये मिळत नसल्याने गॅलेक्सीला यंदाही चांगला प्रतिसादमिळेल . 


मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो 


लोकांच्या नजरा वळलेल्या अनेक टॅबलेट्सपैकी हा एक . विंडोज ८ चालेल का ? युजर फ्रेंडली आहे का ? असे एक ना अनेक सवाल उठविले जातात . त्यामुळे लोकांच्या वळलेल्या नजरांचा अजून तरी कंपनीला फायदा झालेलानाही . पण हा एक अतिशय उत्तमरित्या तयार करण्यात आलेला टॅब असून येत्या वर्षात मायक्रोसॉफ्टचे चाहते त्याकडे अवश्य वळतील . 


आयपॅड 


आयपॅड या नावातच सर्व काही आले . टॅबलेटच्या जगाला दिशा देण्याचे कामच अॅपलने केले . त्यामुळे टॉप१०मध्ये आयपॅड असणे स्वाभाविकच आहे . हा आतापर्यंतचा सर्वाधिक खपलेला टॅबलेट आहे . आता ,आयपॅडला सध्या उपलब्ध असलेला बेस्ट टॅबलेट म्हणायचे किंवा नाही , हा वादाचा विषय असू शकतो , पण तरीही तो टॉपमध्ये राहणारच . 


असूस ट्रान्सफॉर्मर पॅड इन्फिनिटी 


काहीतरी नवीन आणि चांगलं देणाऱ्यांमधला हा एक टॅब . टॅबलेट आणि नोटबुक अशा दोन्ही प्रकारे याचा उपयोग करता येतो . त्यामुळे व्यावसायिक उपयोगासाठी नोटबुक , टॅबलेटचा वापर करणाऱ्यांची याला चांगली पसंती मिळेल . सध्याही याच दुहेरी फायद्यासाठी अनेक जण याला पसंती देत आहेत . 

ADVERTISEMENT
Tags: AmazonAndroidAppleAsusGoogleMicrosoftSamsungTablets
ShareTweetSend
Previous Post

… हा असा स्‍मार्टफोन जो बनेल तुमच्या टिव्हीचा रिमोट कंट्रोल!

Next Post

स्मार्ट चॉइस : बजेट स्मार्टफोन : नोकिया लुमिआ ५२०

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

February 22, 2025
Next Post
स्मार्ट चॉइस : बजेट स्मार्टफोन : नोकिया लुमिआ ५२०

स्मार्ट चॉइस : बजेट स्मार्टफोन : नोकिया लुमिआ ५२०

Comments 1

  1. Anonymous says:
    12 years ago

    Thanks for tablet list useful

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Windows 10 Marathi Typing

विंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड!

June 18, 2019
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech