MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

बीबीएम- ब्लॅकबेरी मेसेजिंग अॅपल आणि अँड्रॉइडवरही!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
May 22, 2013
in ॲप्स
                    आतापर्यंत ब्लॅकबेरीची ऑपरेटिंग सिस्टिम , बीबीएम यांसारख्या सुविधांचा अनुभव फक्त ब्लॅकबेरीधारकांनाच घेता येत होता . त्या जोरावर ब्लॅकबेरीने कित्येक वर्षे वर्चस्व गाजवले . पण आता अॅपल आणि अँड्रॉइड वापरणाऱ्यांनाही बीबीएमचा मोफत लाभ घेता येणार आहे . त्यामुळे व्हॉट्सअॅप किंवा आयमेसेज सारख्या सेवांचा वापर कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे . असे असले तरी या क्रॉस फंक्शनालिटीमुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवे पर्व सुरू होणार आहे , हे मात्र निश्चित . 


                        सध्या जगभरातील सहा कोटी नागरिक बीबीएमने जोडले गेले आहेत . दररोज सुमारे १० अब्ज मेसेज या माध्यमातून पाठविले जातात . या १० अब्ज मेसेजपैकी जवळपास निम्मे मेसेज पाठविल्यानंतर २० सेकंदांच्या आत वाचले जातात . ब्लॅकबेरीच्या मेसेंजरची हीच गतिमानता त्यांची यूएसपी ठरली आहे . आता अॅपल आयओएस आणि अँड्रॉइड युजर्सनाही काही दिवसांतच याचा मोफत लाभ घेता येणार आहे . 
त्यामुळे बीबीएम चॅटच्या माध्यमातून मेसेजची तत्काळ देवाणघेवाण करणे , एकाचवेळी अनेक व्यक्तींशी चॅट करणे , व्हॉइस नोट शेअरिंग यासारख्या गोष्टी सहज शक्य होणार आहेत. त्याचबरोबर ब्लॅकबेरी ग्रुप स्थापन करून बीबीएम युजर्स कॅलेंडर , फोटो , फाइल्स आणि इतर गोष्टी एकाच वेळी ३० व्यक्तींशी शेअर करू शकतील . सध्या आयओएस ६ आणि अँड्रॉइड ४ . ० (आइसक्रीम सँडविच ) किंवा त्यापेक्षा प्रगत ऑपरेटिंग सिस्टीम वापरणाऱ्यांना बीबीएमचा लाभ घेतायेणार आहे . 
                         व्हॉट्सअॅप , निंबुझ , आयमेसेज यासारख्या मेसेजिंग सुविधा गेल्या काही वर्षांत जवळपास सर्वस्मार्टफोनवर उपलब्ध होत्या . मात्र बीबीएम केवळ ब्लॅकबेरी युजर्ससाठीच उपलब्ध असल्याने त्यावरकाही मर्यादा येत होत्या . त्यामुळे अनेक दिवसांपासून ब्लॅकबेरी अॅपल आणि अँड्रॉइड युजर्सना बीबीएमसारखी काहीतरी सुविधा उपलब्ध करून देईल , अशी चर्चा होती . 
आता बीबीएमच्या माध्यमातून अँड्रॉइड आणि अॅपल युजर्ससाठी ती प्रत्यक्षात आली आहे . पण तरी विंडोज आणि सिंबियनधारकांचे काय , हे मात्र ब्लॅकबेरीने अजून जाहीर केलेले नाही . त्यामुळे या युजर्सचे काय ,या प्रश्नाचे उत्तर मात्र अनिश्चित आहे . तरी खूप मोठ्या संख्येने असलेल्या अॅपल 
आणि अँड्रॉइडयुजर्सची मात्र सोय झाली आहे . बीबीएमनंतर वर्षाअखेर त्यांच्यासाठी व्हॉइस , व्हीडिओ चॅट आणि बीबीएम चॅनलची सुविधा देण्याचीही योजना ब्लॅकबेरीने बनवली आहे . आता फक्त गुगल आणि अॅपलने कुठल्याही आडकाठीशिवाय त्यांच्या अॅपस्टोअरवर हे अॅप उपलब्ध करून द्यावे , म्हणजे बीबीएमच्या चाहत्यांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील .

ADVERTISEMENT
Tags: AndroidAppleAppsBlackberryiOSMessengerWhatsApp
ShareTweetSend
Previous Post

इंटरनेटची पाचवी पिढी – 5G Network invented by Samsung Korea

Next Post

गुगलचा नेक्सस फोर आला भारतात

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
WWDC 2025 Marathi

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

June 10, 2025
Next Post

गुगलचा नेक्सस फोर आला भारतात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech