MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टॅब्लेट्स

विद्यार्थ्यांसाठी.. आय बॉल एज्यू स्लाइड!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 24, 2013
in टॅब्लेट्स
शाळा- महाविद्यालयांमध्ये टॅब्लेट

शाळा- महाविद्यालयांमध्ये टॅब्लेट वाटपाच्या घोषणा काही राजकीय पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यांमध्ये केल्या. काहींनी प्रत्यक्ष वाटपास सुरुवातही केली. वाटपाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर मात्र त्यावर टीकेची झोड उठली आणि आकाशच्या कॉन्फिगरेशनबद्दल आणि पर्यायाने त्याच्या कामाच्या वेगाबद्दल शंका उपस्थित करण्यात आल्या.
दरम्यान, आकाश- दोन्ही भारतीय बाजारपेठेत दाखल झाला. त्याचे मात्र चांगले स्वागत झाले.इ-लर्निग एव्हाना इतरही अनेक कंपन्यांना यामध्ये संधी दिसू लागल्या होत्या. भारतीय शाळांमध्ये टॅब्लेटचे वाटप झाले. तर त्यात आपलाही वाटा असावा, असे वाटणे साहजिक होते आणि व्यवसायाच्या दृष्टीनेही ही चांगली संधी होती. मग आणखी एक नवीन लाट आली, ती म्हणजे टॅब्लेटसोबत शैक्षणिक अध्ययनासाठीच्या बाबी देण्याची. हा इ-लर्निग या वर्गात मोडणारा प्रकार होता. म्हणजे तुमच्या मुलाने टॅब्लेटच्या माध्यमातून अभ्यास करायचा. हा प्रकार येणाऱ्या काही वर्षांत तुफान लोकप्रिय होईल, अशी या क्षेत्रातील तज्ज्ञांना अपेक्षा आहे. कारण दृक्श्राव्य माध्यमातून केलेल्या बाबी, गृहपाठादी मुलांना चांगल्या लक्षात राहतात, असे संशोधनाअंती लक्षात आले आहे. आता मायक्रोमॅक्स, लावा आदी कंपन्यांनी यात उडी घेतली आहे. गेली अनेक वर्षे संगणकाशी संबंधित सहउपकरणे तयार करणाऱ्या आयबॉल या प्रसिद्ध कंपनीनेही गेल्या दोन वर्षांत मोबाइल आणि टॅब्लेट या क्षेत्रात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यांनी एज्यू स्लाइडच्या माध्यमातून शैक्षणिक टॅब्लेट्सच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. आय-१०१७ असा त्याचा मॉडेल क्रमांक आहे.१०.१ इंची स्क्रीन डिस्प्लेखास विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात ठेवून याची निर्मिती करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. याचा स्क्रीन मोठय़ा आकाराचा १०.१ इंचाच आहे. तर त्याचे रिझोल्युशन १२८० गुणिले ८०० या क्षमतेचे आहे.डय़ुएल कोअरयासाठी कोर्टेक्स ए९ हा डय़ुएल कोअर प्रोसेसर वापरण्यात आला असून त्याचा वेग १.५ गिगाहर्ट्झ एवढा आहे. शिवाय त्यासाठी जी ४०० माली हा ग्राफिक प्रोसेसर वापरण्यात आला आहे. जेली बीनया टॅब्लेटसाठी अँड्रॉइड ४.१ जेली बीन ही अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टीम वापरण्यात आली आहे. या टॅब्लेटची रॅम क्षमता एक जीबीची असून इंटर्नल मेमरी ८ जीबीची आहे. तर त्याला एक मायक्रो एसडी कार्डाचा स्लॉट देण्यात आला असून त्या माध्यमातून तब्बल ३२ जीबीपर्यंत मेमरी वाढविता येईल.विविध डॉक्सटॅब्लेटचा दर्शनी भाग समोर धरल्यानंतर उजव्या बाजूस वरपासून खालपर्यंत अनुक्रमे ऑडिओ जॅक, ओटीजी, मायक्रो एसडी कार्ड, होस्ट, एचडीएमआय, चार्जिग अशी विविध डॉक्स देण्यात आली आहेत. त्याशिवाय खालच्या बाजूस पॉवर ऑन-ऑफ व आवाज कमी-अधिक करण्याची बटणे देण्यात आली आहेत. कॅमेराया टॅब्लेटच्या मागच्या बाजूस बरोबर मधोमध दोन मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे, तर समोरच्या बाजूस असलेला कॅमेरा व्हीजीए आहे.प्री- लोडेडमहत्त्वाचे म्हणजे या टॅब्लेटची निर्मिती ही विद्यार्थ्यांना नजरेसमोर ठेवून करण्यात आली आहे. त्यामुळे यात काही बाबी प्री-लोडेड स्वरूपात देण्यात आल्या आहेत. इ-टेकच्या माध्यमातून हा कंटेंट उपलब्ध करून देण्यात आला आहे. सीबीएसई आणि एसएससी (महाराष्ट्र बोर्ड) या दोन्हींचा पहिली ते दहावीपर्यंतचा सर्व अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र या टॅबसोबत कोणत्याही एका वर्षांचाच अभ्यासक्रम तुम्हाला मोफत मिळणार आहे. मराठी माध्यमातील अभ्यासक्रमाचीही सोय यात देण्यात आली आहे. मात्र तो पाचवी ते दहावी या इयत्तांपुरताच उपलब्ध आहे.सुस्पष्टता टॅब्लेट वापरताना असे लक्षात येते की, याचे रिझोल्युशन चांगले असून त्यामुळे त्याच्या स्क्रीनवरील प्रतिमेची सुस्पष्टता अधिक आहे. यासाठी कंपनीने आयपीएस डिस्प्ले तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामुळे चित्रणाची सुस्पष्टता वाढत असली तरी त्यासाठी नेहमीपेक्षा अधिक ऊर्जा लागते आणि त्याचा परिणाम बॅटरीवर होतो. बॅटरी अधिक वापरली जाते.निष्कर्षवेगाच्या बाबतीत हा टॅब्लेट कुठेही कमी पडत नाही. इंटरनेट सर्फिग आदी सर्व बाबीही उत्तम वेगात करता येतात. त्याचे हार्डवेअर अतिशय उत्तम स्वरूपाचे आहे. फक्त एकच त्रुटी प्रामुख्याने जाणवते ती म्हणजे याचा कॅमेरा तुम्हाला चांगले चित्रण देत नाही. पण मुळातच शैक्षणिक बाबींसाठीचा वापर हाच या टॅब्लेटचा प्रमुख उद्देश असेल, तर मग कॅमेरा हा भाग दुय्यम ठरतो. पण अलीकडे जेव्हा टॅब्लेट वापरला जातो तेव्हा त्यात चांगला कॅमेरा आहे किंवा नाही हेही ग्राहकांकडून पाहिले जाते. यातील कॅमेऱ्याचा भाग वगळता वापरासाठी हा चांगला टॅब्लेट आहे.भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. १४,९९९/-बेस्ट बाय : रु. १२,९९९/-
प्रोसेसर     कोर्टेक्स ए ९ डय़ुएल कोअर, १.५ गिगाहर्टझ् प्रोसेसर (सीपीयू)
        क्वाड कोअर माली ४०० ग्राफिक प्रोसेसर (जीपीयू)
मेमरी     एक जीबी डीडीआर3 रॅम ८ जीबी बिल्ट इन मेमरी
अतिरिक्त स्टोरेज    मायक्रो एसडी स्लॉट ज्या द्वारे ३२ जीबीपर्यंत क्षमता वाढविता येते. 
डिस्प्ले    २५.६५ सें.मी. (१०.१ इंच) आयपीएस एचडी स्क्रीन (१२८० ७ ८००)कपॅसिटीव्ह मल्टिटच
ऑपरेटिंग सिस्टिम    अँड्रॉइड जेली बीन ४.१
 व्हिडिओ    एचडी व्हिडिओ  ब्लेबॅक व इतर लोकप्रिय फॉरमॅटस् सह
    पाठीमागचा कॅमेरा    २.० मेगापिक्सेल
    समोरचा कॅमेरा    व्हीजीए
    कनेक्टिव्हिटी    वाय- फाय ८०२.११ बी/ जी/ एन
    मायक्रो यूएसबी ओटीजी आणि होस्ट पोर्ट / एचडीएमआय पोर्ट / थ्रीजी डेटा कार्ड यूएसबी Dongle सह
    बॅटरी    ८००० एमएएच लिथिअम आयन बॅटरी

एज्यू स्लाइडची वैशिष्टय़े
Loksatta
ADVERTISEMENT
Tags: EducationEduSlideeLearningiBallTablets
ShareTweetSend
Previous Post

बोसचे क्वाइट कम्फर्ट २० आणि साऊंडलिंक मिनीस्पीकर्स !

Next Post

मराठीटेक यूट्यूबवर : पहा Introductory Video

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Xiaomi Pad 5

Xiaomi Pad 5 टॅब्लेट भारतात सादर : 2.5K डिस्प्लेसह आयपॅडसारखं डिझाईन!

April 29, 2022
सॅमसंगचा Galaxy Tab S8 भारतात सादर : Tab S8, S8+ आणि S8 Ultra

सॅमसंगचा Galaxy Tab S8 भारतात सादर : Tab S8, S8+ आणि S8 Ultra

February 22, 2022
Microsoft Surface

मायक्रोसॉफ्ट इव्हेंट : Surface Laptop Studio, Surface Duo 2 फोन सादर!

September 23, 2021
Apple Event iPhone 13

ॲपल इव्हेंट : नवा आयफोन १३, नवे आयपॅड, नवं ॲपल वॉच जाहीर!

September 15, 2021
Next Post
मराठीटेक यूट्यूबवर : पहा Introductory Video

मराठीटेक यूट्यूबवर : पहा Introductory Video

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022
Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
Xbox Games Showcase

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

June 13, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

ॲपल WWDC 2022 : iOS 16, iPadOS 16, macOS Ventura अपडेट्स सादर

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!