MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

बोसचे क्वाइट कम्फर्ट २० आणि साऊंडलिंक मिनीस्पीकर्स !

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 23, 2013
in News
सुश्राव्य आवाज असे म्हटले की, जगभरात सर्वत्र बोस हेच नाव आदराने घेतले जाते. किंबहुना बोसचे स्पीकर्स किंवा इअरफोन्स वापरणे हे स्टेटस सिम्बॉलही मानले जाते. पूर्वी केवळ मोठय़ा आकाराचे स्पीकर्स तयार करणाऱ्या या कंपनीने मोबाईलचे क्षेत्र वाढल्यानंतर या बाजारपेठेतही प्रवेश केला असून तिथेही आपला दबदबा कायम ठेवला आहे.

बोसने अलीकडेच मोबाईल बाजारपेठेमध्ये दोन नवीन उत्पादने आणली आहेत. त्यात क्वाइटकम्फर्ट २० या हेडफोन्सचा आणि साऊंडलिंक या ब्लूटूथवर चालणाऱ्या मिनी स्पीकर्सचा समावेश आहे.क्वाइटकम्फर्ट २० (क्यूसी २०)छानपैकी गाणी आपण मोबाईलवर ऐकत असतो आणि त्याचवेळेस बाजूने एखादी ट्रेन धडधडत निघून जाते. तो ट्रेन निघून जाण्याचा काळ असा असतो की, आपल्याला हेडफोनमधील स्वर किंवा धून काहीच ऐकू येत नाही. असे होऊ नये आणि आजूबाजूला कितीही गोंगाट असला तरी आपण ऐकत असलेल्या बाबीची सुश्राव्यता जराही कमी होऊ नये यासाठी बोसने आता नॉइज कॅन्सेलेशन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यामुळे आजूबाजूचे येणारे आवाज हे तुमच्यापर्यंत पोहोचतच नाहीत पोहोचते ते केवळ सुश्राव्य संगीतच. या संदर्भात माहिती देताना बोस इंडियाचे संचालक रतीश पांडे म्हणाले की, क्यूसी२० हे हेडफोन्स केव्हाही कुठेही सहज नेता येतील आणि वापरायला आवडतील, असेच आहेत. यामध्ये प्रत्येक इअर बडमध्ये दोन अतिलहान आकाराचे मायक्रोफोन्स वापरण्यात आले आहेत. त्यातील एक मायक्रोफोन बाहेरून येणारे आवाज समजून घेतो आणि ते रोखण्याचे काम करतो तर दुसरा आतमध्ये सुरू असलेल्या आवाजाची पातळी त्यानुसार राखून त्याची सुश्राव्यता कमी होऊ देत नाही.  हेडफोनच्या कॉर्डमध्येच एक कंट्रोल मोडय़ुल बसविण्यात आलेले असून तिथे बसविण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक चिपच्या माध्यमातून हे सारे नियंत्रित केले जाते. हे तंत्रज्ञान खास बोसनेच विकसित केलेले आहे. हे सारे काम या चिपमार्फत अवघ्या काही मिलिसेकंदांमध्ये होत असते. याचबरोबर पलीकडच्या बाजूस सुश्राव्यता वाढविणाऱ्या तंत्राचाही वापर केला जातो. यासाठी बोस ट्रायपोर्ट या बोसनेच विकसित केलेल्या आणखी एका खास तंत्राचा वापर करण्यात आला आहे. या क्यूसी२०मध्ये आणखी एक नवे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. अवेअर मोड असे त्याचे नाव आहे. हा मोड ऑन केल्यानंतर तुम्हाला क्यूसीमधून येणाऱ्या संगीताबरोबरच आजूबाजूला काय सुरू आहे, त्याचीही कल्पना येते. म्हणजे बाजूने एखादी गाडी हॉर्न वाजवत असेल किंवा मित्र गप्पा मारत असतील, तर तेही ऐकू येते. ट्रेन पकडताना होणारी उद्घोषणा ऐकण्यासाठी इअरप्लग काढून ठेवण्याची गरज नाही. अ‍ॅपलच्या उत्पादनांसाठी बोसने खास वेगळे क्यूसीआय विकसित केले आहेत.साऊंडलिंकसध्या आणखी एक महत्त्वाचा ट्रेंड पुढे आला आहे तो आहे टॅब्लेट किंवा स्मार्टफोनला मिनी स्पीकर जोडून त्यावर गाण्यांचा आनंद लुटण्याचा. मित्र- मैत्रीणी एकत्र आल्यानंतर मोबाईलमधील किंवा टॅब्लेटमधील स्पीकर्स पुरेसे पडत नाहीत. खूप आवाज वाढवला की, तो फाटतो त्यामुळे त्याच्या सुश्राव्यतेवर परिणाम होतो म्हणून हे मिनीस्पीकर्स वापरले जातात. आता बोसनेही असेच ब्लूटूथ तंत्रज्ञानावर चालणारे आणि सुश्राव्यता वाढविणारे साऊंडिलक हे मिनीस्पीकर बाजारात आणले आहेत. हे स्पीकर्स वजनाने अतिशय हलके म्हणजेच अवघे ६८० ग्रॅम्सचे आहेत. त्यामुळे ते कुठेही नेणे- आणणे सोपे आहे. त्याच्या बाह्य़रचनेसाठी अ‍ॅल्युमिनिअमचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ते स्क्रॅ चप्रूफ आहेत. शिवाय ते विविध आकर्षक रंगसंगतीमध्येही उपलब्ध आहेत. अखेरच्या सहा पेअर केलेल्या उपकरणांची यादी त्याच्या मेमरीमध्ये राहाते त्यामुळे दरखेपेस पेअर करताना अडचणींना सामना करावा लागत नाही.भारतीय बाजारपेठेतील किंमत : क्यूसी २०- रु. २२,३८८/-साऊंडिलक : रु. १६,२००/-


काही दिवसांपूर्वीच अमर बोस यांचे निधन झाले असून ते BOSE  sounds चे संस्थापक होते. 
Loksatta

ADVERTISEMENT
Tags: BoseMusicSpeakers
ShareTweetSend
Previous Post

कॅनन पॉवरशॉट एन

Next Post

विद्यार्थ्यांसाठी.. आय बॉल एज्यू स्लाइड!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

स्पॉटिफायच्या Spotify Wrapped यादीत पहा यावर्षीची सर्वात लोकप्रिय गाणी!

स्पॉटिफायच्या Spotify Wrapped यादीत पहा यावर्षीची सर्वात लोकप्रिय गाणी!

December 2, 2022
इंस्टाग्रामवर आता फोटो पोस्टलासुद्धा गाणी/संगीत जोडता येईल!

इंस्टाग्रामवर आता फोटो पोस्टलासुद्धा गाणी/संगीत जोडता येईल!

November 26, 2022
iPhone 12

ॲपल iPhone 12 : चार आयफोन्स सादर : आता बॉक्समध्ये चार्जर दिला जाणार नाही!

October 14, 2020
सोनीचा वॉकमन आता नव्या रूपात अँड्रॉइडसह उपलब्ध!

सोनीचा वॉकमन आता नव्या रूपात अँड्रॉइडसह उपलब्ध!

January 23, 2020
Next Post
विद्यार्थ्यांसाठी.. आय बॉल एज्यू स्लाइड!

विद्यार्थ्यांसाठी.. आय बॉल एज्यू स्लाइड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!