MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

नोकियाचा आशा ५०१ बजेटफोन

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 21, 2013
in स्मार्टफोन्स
ADVERTISEMENT
सध्याची दुनिया ही स्मार्टफोनची आणि त्याचीच चलती असलेली असली तरीही आजही अनेकजण असे आहेत की, ज्यांना स्मार्टफोन परवडत नाही. मात्र असे असले तरी त्यांना दिसायला स्मार्टफोन आणि त्यातही खिशाला परवडणारा बजेटफोन असा योग जुळलेला हवा असतो. अशांसाठी आता नोकियाने एक नवीन बजेटफोन बाजारात आणला आहे, तो आहे नोकिया आशा ५०१. 

गेल्या काही महिन्यांत सॅमसंगने भारतीय बाजारपेठेत एक जोरदार आघाडी उघडली आहे. शिवाय त्यांनी बजेटफोन असतील अशा किमतीतही अनेक फोन बाजारपेठेत आणले आहेत. मात्र असे असले तरी मोबाइल बाजारपेठ भारतात सुरू झाली त्या वेळेस इथे सर्वात आधी प्रवेश करणाऱ्या नोकियाने अद्यापही अनेकांच्या मनात घर केले आहे. खास करून मोबाइलचा वापर केवळ फोन म्हणून करणाऱ्या अनेकांना आजही नोकियाचा यूजर इंटरफेसच जवळचा वाटतो. त्यांना वाटते की, नोकियाचा फोन आपल्याला वापरता येऊ शकतो आणि इतर फोन मात्र आपल्याला जमणार नाहीत. अशांसाठी नोकियाचे बजेटफोन हा चांगला पर्याय आहे. आशा मालिका ही अशांसाठीच आहे. 

याच आशा मालिकेमध्ये नोकियाने आणलेला ५०१ आशा हा मोबाइल मात्र बजेटफोनबरोबरच तरुणाईचे लक्ष वेधून घेण्यातही यशस्वी ठरला आहे. खास करून शाळेतून महाविद्यालयात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना तो अधिक जवळचा वाटेल. आई- वडिलांकडून मिळणाऱ्या पॉकेटमनीमध्ये हा परवडणारा असू शकतो. शिवाय त्याची किंमत ही स्मार्टफोनच्या तुलनेत कमी असली तरी तो दिसायला मात्र स्मार्टफोनसारखा राखण्यात नोकियाला यश आले आहे. रंगीबेरंगी आणि टिकाऊ असे कव्हर व समोरच्या बाजूस असलेली चरे न पडू देणारी स्क्रीनची काच ही या फोनची दोन महत्त्वाची वैशिष्टय़े आहेत. स्मार्टफोन हा नेहमीच वजनाला हलका असतो, त्याचप्रमाणे हा नोकिया आशा ५०१ देखील वजनाला हलका म्हणजेच अवघा ९८ ग्रॅम्स एवढय़ाच वजनाचा आहे. तरुणाई आणि सामान्यजन अशा दोन्हींच्या असलेल्या गरजा लक्षात घेऊन या फोनमध्ये दोन प्रकारचे स्क्रीन्स देण्यात आले आहेत होम आणि फास्टलेन. होम स्क्रीन या मोडमध्ये तीन इंचाच्या कपॅसिटिव्ह स्क्रीनचा पूर्ण वापर करता येतो. त्यात नेहमीप्रमाणेच स्क्रीन दिसतो. तर फास्टलेनचा स्क्रीन हा स्मार्टफोनप्रमाणे दिसणारा आहे. त्यावर तुम्हाला स्मार्टफोनच्याच स्क्रीनप्रमाणे सातत्याने अपडेटस् दिसत राहतात. तरुणाईला हा स्क्रीन अधिक आवडणारा असाच आहे. हे मॉडेल लाल, पिवळा, काळा व पांढरा अशा चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. भारतीय बाजारपेठेतील किंमत – ५,१९९/-

नोकिया आशा ५०१ ची वैशिष्टय़े
वजन   —         केवळ ९८ ग्रॅम्स
स्क्रीनचा आकार —   ३ इंच
स्क्रीनचे वैशिष्टय़ —  ब्राइटनेस कंट्रोल, आरजीबी स्ट्रीप, 
नोकिया ग्लान्स स्क्रीन, स्क्रीन डबल टॅप
मुख्य कॅमेरा   —    ३.२ मेगापिक्सेल
कॅमेरा रिझोल्युशन — २०४८ ७ १५३६ पिक्सेल्स
बॅटरी क्षमता    —   टूजी स्टॅण्डबाय टाइम- ११५२ तास
टूजी टॉकटाइम      १७ तास
फक्त संगीत        ५६ तास ऐकण्यासाठीची क्षमता
– विनायक परब..
Loksatta
Tags: AshaNokiaPhonesSmartphones
ShareTweetSend
Previous Post

अँड्रॉइड युझर्ससाठी…काही टिप्स…

Next Post

कॅनन पॉवरशॉट एन

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

March 1, 2023
वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

February 7, 2023
Samsung Galaxy S23

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

February 1, 2023
Redmi Note 12 Series

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

January 5, 2023
Next Post
कॅनन पॉवरशॉट एन

कॅनन पॉवरशॉट एन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!