MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ऑपरेटिंग सिस्टिम्स Android

अपडेटेड जेली बिन अँड्रॉइड जेलीबीनचे ४.३ नवे व्हर्जन

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 12, 2013
in Android, ऑपरेटिंग सिस्टिम्स
mobile.jpgमर्यादित इंटरनेट अॅक्सेस 


इंटरनेटचा अॅक्सेस हा मुलांसाठी मर्यादित कसा करायचा ,असा प्रश्न अनेक पालकांना पडतो. गुगलने अँड्रॉइच्या नव्या व्हर्जनमध्ये त्याचा विचार केला आहे. त्यामुळे आपल्या पाल्यासाठी एखादी प्रोफाइल तयार केल्यावर त्याला कसा इंटरनेट अॅक्सेस ठेवायचा हे निश्चित करता येते ; तसेच क्रोम ब्राऊजर डिसेबल करता येतो. मात्र , पोर्न ब्लॉक करण्याचा फिल्टर यात नाही. अँड्रॉइड ४.३ ब्लू टूथ स्मार्ट आणिएव्हीआरसीपी मानांकन पूरक आहे. 



व्हायरस स्कॅनिंग 


अँड्रॉइडवर काही लाख अॅप्लिकेशन उपलब्ध आहेत. मात्र ,अॅप डाऊनलोड करताना व्हायरस येण्याची शक्यता अधिक असते. अँड्रॉइडच्या नव्या व्हर्जनमध्ये अॅप डाऊनलोड केल्यास गुगलकडे उपलब्ध डाटाबेसमधून व्हायरस स्कॅनिंग केले जाते. त्यामुळे डाऊनलोड केलेल्या अॅपमध्ये व्हायरस आहे का , याची कल्पना येते. 


व्हिडीओचा दर्जा उंचावणार 


यात डीआरएम फीचरचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे उच्च दर्जाच्या व्हिडीओचे स्ट्रीमिंग चांगले होऊशकते. यू ट्यूबवरील व्हिडीओसह अन्य प्रकारचे व्हिडिओ टॅब्लेट , फोनच्या स्क्रीनवर एचडीटीव्हीसारखे दिसण्यास मदत होते. 


थ्रीडी गेमसाठीही 


डायल पॅडवर फोन नंबर आणि नावाची शिफारस होणार आहे. यात नवीन काय , असा प्रश्न अँड्रॉइड वापरणाऱ्यांना नक्की पडेल. मात्र , काही कंपन्यांनी हे फीचर यापूर्वीच अँड्रॉइड हँडसेटवर उपलब्ध करून दिलेले आहे. मोबाइल किंवा टॅब्लेटवर गेम खेळणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. यूजरना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी आणि गेम विकसित करणाऱ्यांना मदत करण्यासाठी नव्या सिस्टिममध्ये ओपन जीएल ईएस ३.० चा समावेश करण्यात आला आहे. यामुळे गेम डेव्हलपरना थ्रीडी गेम अॅप अधिक चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देता येऊ शकणार आहेत. पॉप-अपसारखे नोटिफिकेशन फोनच्या स्क्रीनवर येणार आहेत. फोटो डेड्रीम हे नवे फीचर समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे चांगल्या फोटो अल्बमध्ये थेट जाता येणार आहे. 


गुगल कंपनीने अँड्रॉइड जेलीबीनचे ४.३ हे नवे व्हर्जन विकसित करताना अनेक गोष्टी लक्षात घेतल्याचे फीचरवरून स्पष्ट होत आहे. यामुळे अँड्रॉइड डिव्हाइस वापरणाऱ्यांना नक्कीच अधिक चांगला अनुभव मिळेल , अशी अपेक्षा आहे.

ADVERTISEMENT
Tags: AndroidGoogleJelly BeanUpdates
ShareTweetSend
Previous Post

‘बग फ्री’ फेसबुकसाठी सर्वाधिक सजेशन्स भारतातून

Next Post

गुगलने लॉंच केला जबरदस्‍त फिचर्सने सज्‍ज ‘मोटो एक्‍स’ स्‍मार्टफोन

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
Next Post
गुगलने लॉंच केला जबरदस्‍त फिचर्सने सज्‍ज ‘मोटो एक्‍स’ स्‍मार्टफोन

गुगलने लॉंच केला जबरदस्‍त फिचर्सने सज्‍ज 'मोटो एक्‍स' स्‍मार्टफोन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech