MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Social Media

कोणत्या फोटोला सर्वाधिक ‘लाईक’?

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 9, 2014
in Social Media
flkफेसबुकवर आपली आणि इतरांकडून आलेली पोस्ट, फोटो शेअर करणे हा सर्वच नेटयुझर्सचा आवडता छंद असतो. या माहितीमध्ये विविध प्रकारचे फोटोज आणि मजकुराचाही समावेश असतो. मात्र, कोणत्या फोटोला किती लाईक मिळतील, कोणता फोटो किती वेळा शेअर होईल, हे आतापर्यंत निश्चित सांगता येत नव्हते. मात्र, आता त्याचीही माहिती आगाऊ मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या फोटोला कितीजण शेअर करतील, याचा अंदाज तुम्हाला आधीच करता येणार आहे.

फेसबुकवर दररोज लाखो फोटो अपलोड होतात आणि ते तितक्याच वेगाने शेअरही केले जातात. अशा एकापेक्षा अधिक वेळा शेअर केल्या जाणाऱ्या फोटो आणि व्हिडीओसाठी स्टॅन्डफर्डच्या संशोधकांनी ‘कॅसकेड’ अशी संज्ञा वापरली आहे. फेसबुकला डाटा उपलब्ध करून देणाऱ्या संशोधकांना ‘कॅसकेड’बाबत मजेशीर माहिती आढळली. या संशोधकांनी स्टॅन्डफर्ड युनिर्व्हसिटीसोबत केलेल्या संशोधनात त्यांना असे आढळले की युझर्सकडून २० पैकी एकच फोटो फेसबुकवर अपलोड केला जातो आणि चार हजारपैकी एक फोटो तब्बल ५०० वेळा शेअर केला जातो. तसेच दहापैकी आठ फोटो (कॅसकेड) दोन किंवा त्यापेक्षा अधिकवेळा शेअर केले जातात. त्यामुळे ते दुप्पट गतीने शेअर होत जातात, असे या संशोधकांनी कोरियात झालेल्या इंटरनॅशनल वर्ल्ड वाईड कॉन्फरन्समध्ये पेपर प्रेझेंटेशनमध्ये मांडले आहे. यासाठी त्यांनी तब्बल दीड लाख फोटो बघितले. यातील प्रत्येक फोटो किमान पाच वेळा शेअर झाल्याचे संशोधनकर्त्यांना आढळून आले.

एखादी अनोखी माहिती फेसबुकवर टाकल्यास ती शेअर करण्याचे प्रमाण सुमारे ५० टक्के असल्याचे स्टॅन्डफर्डच्या संशोधकांना दिसले. ‘स्टॅन्डफर्ड’च्या या अनोख्या टूलमुळे फेसबुकवर शेअर केले जाणारे फोटो आणि व्हिडिओची अचूक माहिती मिळेल. विविध निकषांच्या आधारावर त्यांनी केलेल्या या अभ्यासात सुमारे ८० टक्के अंदाज अचूक हेरण्यात त्यांनी यश आले. जेवढे फोटो शेअर करण्याचे प्रमाण अधिक तेवढे त्याच्या अंदाजातील अचूकपणा अधिक येत असल्याचे आढळले. शंभरपेक्षा अधिकवेळा एखादा फोटो शेअर झाला असेल तर त्यांचे ८८ टक्के अंदाज बरोबर असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

ADVERTISEMENT
Tags: FacebookPhotosSocial Media
ShareTweetSend
Previous Post

‘ज‍िओनी’ने भारतात लॉन्च केला जगातील सगळ्यात स्लिम स्मार्टफोन

Next Post

Windows XP आजपासून कालबाह्य, असा सुरक्षित ठेवा कॉम्प्यूटर

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Ronaldo YouTube Channel

फुटबॉलपटू रोनाल्डोचं यूट्यूब चॅनल : २४ तासात तब्बल २ कोटी सबस्क्रायबर्स!

August 22, 2024
MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

June 2, 2024
इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

April 19, 2024
Community Notes India

X (ट्विटर) वरील Community Notes आता भारतात उपलब्ध!

April 4, 2024
Next Post
Windows XP आजपासून कालबाह्य, असा सुरक्षित ठेवा कॉम्प्यूटर

Windows XP आजपासून कालबाह्य, असा सुरक्षित ठेवा कॉम्प्यूटर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech