MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ऑपरेटिंग सिस्टिम्स Windows

Windows XP आजपासून कालबाह्य, असा सुरक्षित ठेवा कॉम्प्यूटर

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 10, 2014
in Windows, ऑपरेटिंग सिस्टिम्स
ADVERTISEMENT

संगणक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘मायक्रोसॉफ्ट’ आपली सगळ्यात लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टम ‘WINDOWS XP’चा टेक्निकल सपोर्ट आजपासून (मंगळवार) बंद करणार आहे. त्यामुळे जगभरात सर्वाधिक काळ अस्तित्त्वात असणारी ‘WINDOWS XP’ उद्या अर्थात बुधवारपासून कालबाह्य होणार आहे.

‘WINDOWS XP’चा जगभरात सर्वाधिक वापर केला जातो. मात्र, ग्राहकांना आजपासून सिक्युरिटी अपडेट, ऑनलाईन टेक्निकल कंटेंट अपडेट मिळू शकणार नाही. त्यामुळे याचा सगळ्यात मोठा फटका देशातील बॅंकिंग क्षेत्राला बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देशभरातील बहुतेक बॅंकाचे एटीएम अजूनही ‘WINDOWS XP’ या ऑपरेटिंग सिस्टमवर सुरु आहेत. त्यामुळे याचा फटका बँकांना सर्वाधिक बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, फक्त जुन्या एटीएमवर याचा परिणाम होईल, नव्या एटीएमला त्याचा फटका बसणार नाही, असे इंडियन बँक्स असोसिएशनतर्फे सांगण्यात आले आहे.

भारतात कंपन्यांमधील सुमारे 40 लाख कॉम्प्युटरमध्ये ‘WINDOWS XP’ ऑपरेटिंग सिस्टम आहे. मात्र, त्यामधील 84 टक्के कंपन्या नवी ऑपरेटिंग सिस्टम वापरत आहेत. हा टेक्निकल सपोर्ट बंद केल्याने ‘WINDOWS XP’ वापरली तर यामुळे सायबर क्राईमची भीती वाढेल, तसेच नवे हार्डवेअर सिस्टमला सपोर्ट करणार नसल्याचेही ‘मायक्रोसॉफ्ट’चे संचालक टिम रेन्स यांनी स्पष्ट केले आहे.

‘मायक्रोसॉफ्ट’ने ऑक्टोबर 2001मध्ये ‘WINDOWS XP’ही ऑपरेटिंग सिस्टम लॉन्च केली होती. सध्या ती ‘’WINDOWS XP SERVICE PACK 3’ या नावाने ओळखली जाते.

2001 मध्ये मायक्रोसॉफ्टने लॉन्च केलेली ‘WINDOWS XP’ ही ऑपरेटींग सिस्टम बंद करणार आहे. या सिस्टमचा वापर आजही देशातील बॅंका आणि कंपन्यांमध्ये केला जात आहे. ‘WINDOWS XP’ मध्ये अपडेट बंद झाल्यानंतर बॅंकांच्या एटीएममध्ये व्हायरस अटॅक होण्याची शक्यता आहे. हॅकर्स या सिस्टमवर संपूर्ण न‍ियंत्रण मिळवू शकतात.

‘विंडोज 7’, ‘विडोंज 8’ आणि ‘विंडोज विस्टा’च्या सेक्युरिटी अपडेटचा वापर करून ‘WINDOWS XP’वर अटॅक होण्याची 100 टक्के शक्यता जास्त असल्याचे मायक्रोसॉफ्टचे संचालक टिमोशी रेन्स यांनी सॅन फ्रॅसिस्कोमध्ये कॉम्प्युटर सेक्यु‍रिटीबाबत एका परिषदेत सांगितले होते.

WINDOWS XP सपोर्ट बंद झाल्यामुळे भारतातील बहुतेक बॅंकांच्या व्यवहारावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली अराहे. बिझनेस स्टॅडर्डद्वारा जाहीर करण्‍यात आलेल्या एका अहवालानुसार, भारतातील जवळपास 40 ते 70 टक्के बॅंकाचे एटीएम हे XP च्या प्लॅटफॉर्मवर काम करते. WINDOWS XP सपोर्ट बंद झाल्यानंतर मायक्रोसॉफ्टतर्फे टेक्नीकल सपोर्ट बंद होइल. त्यामुळे एटीएम हॅक होणे, वारंवार हॅंग होणे तसेच बंद पडणे या सारख्या समस्या वाढतील.

आपली ऑपरेटिंग सॉफ्टवेअरला ‘विंडोज एक्सपी’वरून ‘विंडोज 7’मध्ये अपग्रेड करण्यासाठी इंस्टॉलेशनदरम्यान, Custom पर्यायावर क्लिक करा. कस्टम इंस्टॉलेशन हे साधारण इंस्टॉलेशनच्या तुलनेत कठिन असते. त्यामुळे या प्रक्रियेला अनेक तास लागू शकतात.

Tags: MicrosoftOperating SystemsSupportWindowsXP
ShareTweetSend
Previous Post

कोणत्या फोटोला सर्वाधिक ‘लाईक’?

Next Post

सायबरविश्वात आलाय ‘हार्टब्लीड’ व्हायरस

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

मायक्रोसॉफ्ट बिंग सर्च आता ChatGPT सोबत : एज ब्राऊजरमध्येही AI !

मायक्रोसॉफ्ट बिंग सर्च आता ChatGPT सोबत : एज ब्राऊजरमध्येही AI !

February 8, 2023
Windows 11 2022 अपडेट आजपासून उपलब्ध : 22H2 मध्ये नव्या सोयी!

Windows 11 2022 अपडेट आजपासून उपलब्ध : 22H2 मध्ये नव्या सोयी!

September 21, 2022
MicrosoftRewardsIndia

मायक्रोसॉफ्ट रिवार्ड्स भारतात उपलब्ध : एज ब्राऊजर वापरा व बक्षिसे मिळवा!

August 22, 2022
Chrome OS Flex

गूगलची ChromeOS Flex जुन्या लॅपटॉप्स, पीसीसाठीही उपलब्ध!

July 15, 2022
Next Post

सायबरविश्वात आलाय ‘हार्टब्लीड’ व्हायरस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
GTA VI First Trailer

GTA VI या बहुप्रतिक्षित गेमचा ट्रेलर सादर!

December 5, 2023
ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी (अपडेट : आता पुन्हा सीईओ)

ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी (अपडेट : आता पुन्हा सीईओ)

November 18, 2023
व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

November 17, 2023
अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

November 6, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

November 6, 2023
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

GTA VI First Trailer

GTA VI या बहुप्रतिक्षित गेमचा ट्रेलर सादर!

December 5, 2023
ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी (अपडेट : आता पुन्हा सीईओ)

ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी (अपडेट : आता पुन्हा सीईओ)

November 18, 2023

GTA VI या बहुप्रतिक्षित गेमचा ट्रेलर सादर!

ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी (अपडेट : आता पुन्हा सीईओ)

व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

यूट्यूबने ॲडब्लॉकर्सना ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!