MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

अॅमेझॉनचा फायर फोन सादर

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 20, 2014
in स्मार्टफोन्स
अॅमेझॉन ही जगातली सर्वांत मोठी रिटेलर कंपनी. ती आता मोबाईल हँडसेटच्या मार्केटमध्ये उतरली आहे. तिचे पहिलेच प्रॉडक्ट अत्याधुनिक आणि अनेक फीचर्सचा संगम असणारे आहे…
जगातील सर्वांत मोठी ऑनलाइन रिटेलर कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अॅमेझॉन डॉट कॉमने ‘फायर फोन’ या अत्याधुनिक हँडसेटद्वारे स्मार्ट फोन मार्केटमध्ये उडी घेतली आहे. 


मोठा डिस्प्ले, २ जीबी रॅम, १३ एमपी रिअर कॅमेरा यासह काही युनिक फीचर्स या ‘फायर’ फोनमध्ये आहेत. या वैशिष्ट्यांमुळे हे मॉडेल ग्राहकांना पसंत पडेल, असा विश्वास कंपनीला वाटतो आहे.

ADVERTISEMENT

पाच फ्रन्ट कॅमेरे


कुठल्याच स्मार्ट फोनमध्ये नसलेले पाच फ्रन्ट कॅमेरे हे या फोनचे खरे वैशिष्ट्य आहे. यातील एक कॅमेरा हा फोटो काढण्यासाठी आहे तर इतर चार कॅमेरे युझरचे डोळे स्कॅन करतात. इन्फ्रारेड किरणांद्वारे हे कॅमेरे अंधारातही डोळे स्कॅन करू शकतात. स्कॅनिंगचे हे तंत्रज्ञान ‘फायर फोन ७’ च्या डायनॅमिक पर्सपेक्टिव्ह या आगळ्या फीचरसाठी वापरले जाते.


डायनॅमिक पर्सपेक्टिव्ह 3D


डायनॅमिक पर्सपेक्टिव्हमुळे डाव्या किंवा उजव्या बाजूल फोन हलविल्याने मेन्यू, कॅमेरा, मेसेजिंग, गाणी अशी ऑप्शन्स स्क्रीनवर येतात. मेडे नावाच्या आणखी एका तंत्रज्ञानाद्वारे आपण शोधत असलेली पण त्या क्षणी आवश्यक नसलेली गोष्ट या फोनच्या मेमरीत तयार असते. मात्र, आपल्याला आवश्यकता असेल त्याचवेळी ती स्क्रीनवर दिसते.


फायरफ्लाय


फायरफ्लाय हे या फोनचे आगळे वैशिष्ट्य म्हणता येईल. केवळ व्हिजिटींग कार्ड, अॅडव्हर्टाइझमेंट किंवा पोस्टरचा फोटो काढला की त्यातील नंबर्स कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आपोआप सेव्ह होतात. तसेच, या नंबरशी संबंधित अधिकची माहिती फायफ्लायद्वारे उपलब्ध होते. परंतु, फायरफ्लाय तंत्रज्ञानाची उपयुक्तता एवढ्यावर संपत नाही. फायरफ्लायमधून क्यूडीआर कोडचा फोटो काढला की ‘अॅमेझॉन डॉट कॉम’वर उपलब्ध असलेल्या वस्तूंची यादी मिळू शकते आणि ताबडतोब त्या वस्तू खरेदी करता येऊ शकतात.


फ्री मेंबरशीप


कंपनीतर्फे या फोनची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट खुली करण्यात आली आहे. यामुळे इतर अॅप मेकर्ससुद्धा त्यात नव्या तंत्रज्ञानाची भर टाकू शकतील. ‘फायर फोन ७’ खरेदी करणाऱ्यांना कंपनीचे निःशुल्क सदस्यत्व देण्यात येणार आहे. यात ग्राहक गाणी आणि व्हिडीओचे स्ट्रि‌मिंग, पुस्तके अशा विविध सुविधा निःशुल्क पुरविल्या जातात. सध्या ३२ आणि ६४ जीबी फायर फोन ७ची किंमत १९९ आणि २९९ अमेरिकी डॉलर्स आहे. अॅमेझॉनचे सदस्य होण्यासाठी एरवी ९९ अमेरिकी डॉलर्स मोजावे लागतात.


अमर्यादित क्लाऊड स्टोअरेज


फायर फोन ७ मध्ये अमर्यादित क्लाऊड स्टोअरेजची सुविधा आहे. फक्त गाणी वगळता यात कितीही फोटो आणि व्हिडीओ स्टोअर करता येतील. मात्र त्याची गुणवत्ता कशी असेल याबाबत सध्या स्पष्टीकरण करण्यात आलेले नाही.


कस्टमर केअर एका बटनावर


कस्टमर सर्व्हिससाठी या फोनमध्ये ‘मेडे’ या विशेष बटनाची सुविधा करण्यात आली आहे. हे बटन दाबल्यास थेट कस्टमर केअरला फोन लागणार आहे. यात कस्टमर केअर एक्झिक्युटीव्हस व्हिडीओ कॉलिंगद्वारेसुद्धा ग्राहकांचे प्रश्न सोडवील. ही ‘मेडे’ चमू २४ तास १५ सेंकदात तुमच्या सेवेत हजर होणार होईल.


सुपर ऑडिओ परफॉरमन्स


या फोनमध्ये इनबिल्ट डॉल्बी डिझिटल प्लस ऑडिओ तंत्रज्ञान आहे. यात आवाजाची स्पष्टता, ध्वनी या गोष्टी ऑटो अॅडजस्ट होणार आहेत. मुख्यत्त्वे सिनेमा बघताना डायलॉग्ज स्पष्ट ऐकू येतील याची सुविधा करण्यात आली आहे. अॅमॅझॉन स्वतः म्युझिक मार्केटमध्ये असल्याने या फीचरवर विशेष भर देण्यात आला आहे.

Tags: AmazonAndroidFirephoneInnovationSmartphones
ShareTweetSend
Previous Post

मृत्यूनंतरचं डिजीटल जीवन

Next Post

ओलाव्यापासून वाचवा ‘स्मार्टफोन’

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

February 7, 2023
Samsung Galaxy S23

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

February 1, 2023
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

January 16, 2023
Redmi Note 12 Series

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

January 5, 2023
Next Post

ओलाव्यापासून वाचवा ‘स्मार्टफोन’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!