MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

मायक्रोमॅक्सचा २०१० पासूनचा शून्यातून सर्वाधिक विक्री करणार्‍या कंपनीपर्यंतचा प्रवास

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 5, 2014
in स्मार्टफोन्स
Micromax Logo

                     मायक्रोमॅक्सने 2010 साली मोबाइल बाजारात पाऊल ठेवलं होतं. आता ही चार वर्ष जुनी कंपनी मोबाइल शिपमेंट मधे सॅमसंगला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर विराजमान झाली आहे. जगात सुद्धा मायक्रोमॅक्स ओळख निर्माण करण्यात चांगलीच यशस्वी झाली आहे. CES 2014 मधे LapTab सारखी प्रॉडक्ट सादर करून अनेकांना त्यांची नोंद घ्यायला भाग पाडलं.

                     सॅमसंगला सध्या चायनिज कंपन्याची टक्कर कमी म्हणून की काय आता मायक्रोमॅक्स, कार्बन अशा भारतीय मोबाइल कंपन्या जबरदस्त धक्के देत आहेत. मायक्रोमॅक्स सध्या 16.6 % मार्केट शेअर सोबत मोबाइल विकणार्‍या कंपनीमध्ये प्रथम तर सॅमसंग 14.4%, नोकिया 10.9%, कार्बन 9.5% आणि लावा 5.6 % ही माहिती CounterPoint रिसर्च या संस्थेने दिली असून Q2 2014 साठीची आहे. 
  2010 साली Andro ए60 नावाचा फोन लॉंच करून मायक्रोमॅक्सने सुरवात केली होती. नंतर Bling नावाचा stylish फोन सादर केला . परंतु त्यावेळी Micromax स्वतः त्यांचे फोन बनवत नव्हते तर ते एका चायनिज कंपनीकडून इम्पोर्ट करून Rebrand पद्धतीने बिजनेस सुरू होता . ज्यामुळे कंपनीची ओळख इतर चायनिज कंपनीसारखी स्वस्त पण हलक्या प्रतीचे फोन विकणारी अशी बनली. सर्विस बाबतीतही कंपनीबद्दल बर्‍याच तक्रारी आल्या होत्या. कंपनीची ही ओळख बदलण्यास Canvas सिरीज कारणीभूत ठरली. ऑनलाइन शॉपिंग वरती प्री-ऑर्डर सारखे आकर्षक पर्याय देऊन व जबरदस्त जाहिराती त्यांनी ग्राहकांच्या मनात जागा मिळवली आणि मग काय सुरू झाला वेगवान प्रवास …..
कॅनवस एचडी, कॅनवस 4, कॅनवस नाइट असे फोन पटापट विकले जाऊ लागले आणि 2013 वर्षी मायक्रोमॅक्सने चक्क बलाढ्य नोकिया सॅमसंगला मागे टाकलं. यानंतर हॉलीवुड सुपरस्टार Hugh Jackman ला ब्रॅंड ambassador बनवलं सोबतच रशियन मार्केट मध्येही उडी घेतली.टीव्ही ad साठी Fast & Furious मूवीच्या डायरेक्टरना घेऊन प्रभावी जाहिराती बनवत घराघरात ब्रॅंडनेम पोचवण्यात सहजता मिळवली.    
मायक्रोमॅक्सच्या सीईओ दीपक मेहताच असं म्हणणं आहे की त्यांच्या यशाचं रहस्य सर्वसामान्य जनतेपर्यंत मोबाइल स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न . ज्यात भारतीयत्वाचा मुद्दा महत्वाचा ठरतो . 
                मायक्रोमॅक्स विंडोज फोन 8.1 वरती आधारित फोन सादर करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. आता कंपनी टीव्ही उत्पादन सुरू करत आहे ज्यात देखील अशीच कामगिरी करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. एक भारतीय कंपनी असे यश मिळवत असेल त्याचा आपणा सर्वांना अभिमान हवा . मराठीटेक तर्फे मायक्रोमॅक्सच्या भावी कारकिर्दीला शुभेच्छा .   
ADVERTISEMENT
Tags: Brand ValueHistoryMicromaxSalesSmartphones
ShareTweetSend
Previous Post

मायक्रोसॉफ्टने विंडोज फोन 8.1 अपडेटमध्ये जोडले अनेक फीचर्स

Next Post

अँड्राईड फोन अथवा टॅब्लेट हरवलाय/ चोरीला गेलाय ? शोधा तुम्हीच घरबसल्या सोप्या पद्धतीने..

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Pixel 6a India

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध : सोबत Pixel Buds Pro सुद्धा!

July 21, 2022
Nothing Phone 1

Nothing कंपनीचा पहिला Nothing Phone (1) सादर : नवं पारदर्शक डिझाईन!

July 12, 2022
Moto G42 भारतात सादर : AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा!

Moto G42 भारतात सादर : AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा!

July 4, 2022
Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Next Post
अँड्राईड फोन अथवा टॅब्लेट हरवलाय/ चोरीला गेलाय ? शोधा तुम्हीच घरबसल्या सोप्या पद्धतीने..

अँड्राईड फोन अथवा टॅब्लेट हरवलाय/ चोरीला गेलाय ? शोधा तुम्हीच घरबसल्या सोप्या पद्धतीने..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

August 14, 2022
WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022
Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022
Google Street View India

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

July 27, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

August 14, 2022
WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!