MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home HowTo

अँड्राईड फोन अथवा टॅब्लेट हरवलाय/ चोरीला गेलाय ? शोधा तुम्हीच घरबसल्या सोप्या पद्धतीने..

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 13, 2014
in HowTo, Security, ॲप्स
ADVERTISEMENT
आज आपण एका जबरदस्त app ची ओळख करून घेणार आहोत जे तुम्हाला तुमचा फोन / टॅब्लेट चोरीला गेल्यास अथवा हरवल्यास शोधण्यात मदत करेल …..  



अॅन्ड्रॉइड  डिवाइस मॅनेजर फीचर्स ::

● तुमच्या गूगल अकाऊंटने जोडलेले सर्व Android डिवाइस (मोबाइल, टॅब्लेट)शोधू शकता   

● तुमच्या फोनचा Screen Unlock Pattern बदलू शकता तेही फोन प्रत्यक्ष हातात नसताना 
● तुमच्या फोनवरील डाटा चोराच्या हाती लागू नये म्हणून सर्व डाटा पुसून टाकू शकता(Erase)   
● तुमच्या फोनला ठराविक ठिकाणी शोधल्यानंतर नेमका कोणाकडे आहे हे समजण्यासाठी तुमच्या फोन Ring Full वॉल्यूम मध्ये वाजवू शकता तेही फोन हातात नसताना 
● असाही एक पर्याय आहे ज्यात चोराला तुम्हाला फोन करण्यावाचून उपायच सापडणार नाही Call Me नावाच्या पर्यायाचा वापर करताच चोराला फोन वापरता येणार नाही व शेवटी त्याला आपणास कॉल करावाच लागणार

अॅन्ड्रॉइड  डिवाइस मॅनेजर सुरू करण्यासाठी  ::


Android Device Manager वापरण्याआधी तुम्हाला ते तुमच्या फोनवर सुरू  (enable) करावे लागेल आणि त्याला तुमच्या गूगल अकाऊंटला जोडावे लागेल. मात्र ह्या App साठी फोनमध्ये इंटरनेट सुरू असायला हवे.   
आणि हे app स्वतः गूगलने डेवलप केलेलं असल्यामुळे ह्याच्या इतका अचूक रिजल्ट दुसर्‍या कोणत्याही app मध्ये मिळणार नाही व दुसर्‍या कोणत्याही एकस्ट्रा app ची गरजही पडणार नाही 

Android Device Managerतुमच्या फोन अथवा कोणत्याही अॅन्ड्रॉइड डिवाइसवरती सुरू करण्यासाठी खालील सुचनांनुसार सेटिंग्स करा. 
  1. तुमच्या डिवाइस च्या App Menu मधून गूगल सेटिंग्स उघडा   .
  2. त्यात Android Device Manager निवडा
  3. तुम्हाला खालील पर्याय दिसतील ज्यातील ज्याची तुम्हाला गरज आहे ते पर्याय तुम्ही निवडू शकता :

Remotely locate this device ::  तुम्ही Android Device manager तुमच्या डिवाइसची लोकेशन पहाण्यासाठी वापरू शकता. त्यासाठी ह्या ऑप्शन समोर असलेल्या बॉक्सवर टिक करा 

For devices running 4.1 and higher: Location access सुद्धा सुरू असलेला हवा. तो सुरू करण्यासाठी, 
Google Settings > Location आणि  “Location” समोरील बटन सुरू करा. 

Allow remote lock and factory reset :: तुम्ही Android Device Manager तुमच्या डिवाइसला रीमोटली लॉक करण्यासाठी वापरू शकता जेजेकरून तुमचं फोन हरवल्यास त्यातील महत्वाचा डाटा कोणाच्या हाती लागू नये. ह्या पर्यायाने तुम्ही डिवाइस लॉक करू शकता, त्यातील डाटा पुसून टाकू शकता, Screen Unlock Pattern सुद्धा बदलू शकता. त्यासाठी Allow Remote Lock and factory reset ऑप्शन वर टिक करा आणि त्याला ऑन करा. 
 ज्यावेळी  “Activate device administrator” स्क्रीन डिस्प्ले होईल,तेव्हा स्क्रीनवरील सूचना वाचून Android  device administrator अॅक्टिवेट करा.

तुमचा फोन ट्रॅक करण्यासाठी, लॉक करण्यासाठी, डाटा इरेज करण्यासाठी, पासवर्ड बदलण्यासाठी किंवा त्या फोनल तुम्हाला कॉल कर म्हणून सांगण्यासाठी खालील २ पर्याय आहेत ज्यासाठी तुम्हाला तुमच्या गूगल अकाऊंटची गरज पडेल.   

  1. Android Device Manager on Web : वेबसाइट वरून कम्प्युटर वापरुन 
  2. Android Device Manager on Android App on Play Store : हे app वापरुन तुम्ही मित्राच्या फोनवरून तुमचा फोन ट्रॅक करू शकता मात्र तुमच्या गूगल अकाऊंटवरूनच . 

वेबसाइटच्या माध्यमातून ट्रॅक करण्यासाठी ह्या वेबसाइट वर जा 

  • लिंक – www.google.com/android/devicemanager
तिथे गूगल अकाऊंटने लॉगिन करून तुम्ही अगदी सहज तुमचा हरवलेला फोन लोकेट करू शकाल 
आणि दुसरी पद्धत जिच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या मित्राच्या फोनवर app इंस्टॉल करा 
  • लिंक – Android Device Manager – Play Store Download 
ह्या App च्या सोबत तुमच्या गूगल अकाऊंटने लॉगिन करून त्या सर्व गोष्टी करता येतील ज्या तुम्ही Android Device Manager च्या वेबसाइटवरून करू शकता. 
सारांश तुमचं android डिवाइस हरवण्याच किंवा हरवल्यानंतरच टेंशन नक्कीच कमी झालं असणार. 
हा लेख मित्रांसोबतसुद्धा शेअर करा आणि त्यांनाही हे App नक्की घ्यायला सांगा जेणेकरून सर्वांनाच मदत होईल त्यांचा हरवलेला फोन शोधण्यात…..   
जर ह्या App ने सुद्धा तुमच्या फोनला शोधण्यात अपयश येत असेल तर तुमच्या फोनचा IMEI क्रमांक जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवा तेच तुमची मदत करू शकतील. 
IMEI क्रमांक कसा पहावा यासाठी हा लेख वाचा > लिंक – How-to-find-out-the-IMEI-number-of-mobile-phone    
Tags: AndroidAppsHow ToSecurityTips
ShareTweetSend
Previous Post

मायक्रोमॅक्सचा २०१० पासूनचा शून्यातून सर्वाधिक विक्री करणार्‍या कंपनीपर्यंतचा प्रवास

Next Post

Xiaomi चा नवीन फोन RedMi 1S झालाय लॉंच : किंमत अवघी रु.5999

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
गूगल प्लेवर २०२४ मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

ॲपल ॲप स्टोअरवरील २०२४ चे सर्वोत्तम ॲप्स व गेम्स अवार्ड्स जाहीर!

December 12, 2024
Next Post
Xiaomi चा नवीन फोन RedMi 1S  झालाय लॉंच : किंमत अवघी रु.5999

Xiaomi चा नवीन फोन RedMi 1S झालाय लॉंच : किंमत अवघी रु.5999

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ChatGPT India Plans Whats Included

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

August 19, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Windows 10 Marathi Typing

विंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड!

June 18, 2019
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ChatGPT India Plans Whats Included

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

August 19, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech