MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टेलिकॉम

रिलायन्स जिओ टेलीकॉम सेवा सादर

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 1, 2016
in टेलिकॉम
ADVERTISEMENT

रिलायन्स जिओ ही मुकेश अंबानी यांनी बहुप्रतीक्षित टेलीकॉम कंपनीची सेवा 5 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. आज झालेल्या Reliance AGM वार्षिक कार्यक्रमात मुकेश अंबानींनी स्वतः ही घोषणा केली. यावेळी त्यांनी अत्यंत स्वस्त असे प्लॅन्स ग्राहकांसमोर ठेवले असून सध्याच्या इतर कंपन्याच्या मानाने ह्या प्लॅन्सची किंमत अगदीच नगण्य आहे! जिओने किंमतीच्या बाबतीत अक्षरशः इतिहास रचला आहे म्हणावयास हरकत नाही!

जिओच्या घोषणेतील ठळक मुद्दे :

  • सर्व जिओ ग्राहकांना वॉइस कॉल्स पूर्णतः मोफत म्हणजेच कोणाशीही केव्हाही फोनवर बोला एकही रुपया न भरता ! 
  • रोमिंग साठीसुद्धा कोणताही अतिरिक्त चार्ज नाही, देशभर रोमिंग मोफत!
  • ५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर कॉल्स, इंटरनेट, SMS सर्वकाही मोफत !
  • ब्लॅकआऊट डे (सण/शासकीय सुट्ट्या) दिवशी सुद्धा मोफत SMS ची सोय (इतर कंपन्या या दिवशी प्लॅन कोणताही असला तरी पैसे घेतातच!)
  • सणादिवशी पूर्णतः मोफत एसएमएस 
  • एक GB इंटरनेट डाटा साठी केवळ ५० रुपये मोजा! तेसुद्धा ४G स्पीडमध्ये !
  • विद्यार्थ्यांना तर ह्या प्लॅन्सवर आणखी २५% सूट      
खालील तक्त्यात जिओचे प्लॅन्स दर्शवले आहेत – 
Reliance Jio Internet Voice SMS Official  Plans 
वरच्या फोटोमध्ये पाहू शकता की जिओच्या प्लॅन्सला नकार देणे ग्राहकांना किती अवघड जाईल! 
अवघ्या ४९९ मध्ये ४GB डाटा सोबत रात्रीच्या वेळी पूर्णतः मोफत 4G इंटरनेट, हॉटस्पॉटवर 8GB डाटा, पूर्णतः मोफत कॉल्स  आणि SMS !   सोबत सर्वच प्लॅन्समध्ये १२६० रुपयांचे जिओ अॅप्सची वर्गणी (ज्यामध्ये टीव्ही, व्हिडिओ गाणी इत्यादि पाहायला मिळतील!) तसेच जवळपास प्रत्येक प्लॅननुसार रात्री 4G डाटा पूर्णतः मोफत मिळेल!

अंबानींनी मार्च २०१७ पर्यन्त ९० % भारतीय जिओ नेटवर्कवर असतील असा दावा केला आहे. भारत सध्या मोबाइल ब्रॉडब्रॅंडमध्ये १५५ व्या स्थानावर असून टॉप १० मध्ये नेण्याचं उद्दीष्ट बोलून दाखवलं आहे! देशात “डाटा गिरी” सुरू करण्याचा मानस त्यांनी जाहीर केलाय!
देशातली बहुतांश शाळा, कॉलेज वायफायद्वारे जोडली जातील, काही शहरात 1Gbps स्पीड असलेल फायबर नेटवर्क बसवणार, बिल realtime(सद्यस्थितीनुसार) दिसेल

रिलायन्स जिओच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ : Reliance AGM

रिलायन्स जिओच्या ह्या धडाक्यामुळे ग्राहकांसाठी नक्कीच चांगले दिवस आले असले तरी टेलीकॉम कंपन्याच धाबं दणाणल आहे. एयरटेल आणि आयडियाचे शेअर तब्बल ७ टक्क्यांनी पडले आहेत! याचा अर्थ आयडिया ने अंबानींच्या ४५ मिनिटाच्या भाषणादरम्यान २८०० करोडचा तर एयरटेलने ९८०० करोडचा मार्केट कॅप गमावला आहे! सध्या भारतात एयरटेलकडे सर्वाधिक ग्राहक आहेत त्यामुळे साहजिकच सर्वाधिक नुकसान यांचच होईल !याची परिणीती एकतर ह्या कंपन्या स्वतः प्लॅन्स कमी करण्यामध्ये होईल किंवा ह्या कंपन्या जिओविरुद्ध कोर्टात जाण्याचीसुद्धा शक्यता आहे!

मराठीटेकचं अँड्रॉइड अॅप आता गूगल प्ले स्टोअरवर डाऊनलोड  MarathiTech on Google Play    

Tags: 4GInternetJioRelianceTelecom
ShareTweetSend
Previous Post

मराठीटेक अँड्रॉइड अॅप्लिकेशन आता गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध

Next Post

आयफोन ७, ७ प्लस आणि अॅपल वॉच २ सादर

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

August 28, 2023
Jio Bharat 4G Phone

जियोचा नवा Bharat 4G फोन अवघ्या ९९९ रुपयात!

July 3, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
Next Post
आयफोन ७, ७ प्लस आणि अॅपल वॉच २ सादर

आयफोन ७, ७ प्लस आणि अॅपल वॉच २ सादर

Comments 1

  1. गोवर्धन कांडेकर says:
    7 years ago

    धम्माल होणार… वाट लागणार आता आयडीया अन airtel ची. झकास रिलायन्स

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google's 25th Birthday

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

September 27, 2023
WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023
ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

September 13, 2023
Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

August 28, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google's 25th Birthday

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

September 27, 2023
WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!