MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Events

गूगलचा पिक्सल 2 स्मार्टफोन सादर – मेड बाय गूगल कार्यक्रम

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 4, 2017
in Events, टॅब्लेट्स, लॅपटॉप्स, स्मार्टफोन्स

गूगल आज त्यांच्या पिक्सल फोन मालिकेत दोन नवे फोन्स सादर केले असून Pixel 2 व Pixel 2 XL हे गूगलचे स्मार्टफोन आता बाजारात दाखल झाले आहेत. गूगलच्या आज पार पडलेल्या मेड बाय गूगल कार्यक्रमात आज फोनसोबत इतरही अनेक प्रॉडक्ट सादर केली असून गूगलमध्ये मशीन लर्निंग व कृत्रिम बुद्धिमत्ता यांना देण्यात येणारी प्राथमिकता प्रामुख्याने दाखवण्यात आली. आजच्या लेखामध्ये पाहूया या सर्व प्रोडक्टसबद्दल थोडक्यात माहिती…

Made By Google 2017

जसे की आपण वरील इमेजमध्ये पाहू शकता गूगल उपकरणे सादर केली आहेत जसे कि पिक्सल २ फोन, पिक्सलबुक, पिक्सल पेन, गूगल होम मिनी व गूगल होम मॅक्स, गूगल क्लिप्स कॅमेरा, डेड्रीम व्हयू व्हीआर हेडसेट, पिक्सल बड्स…

ADVERTISEMENT
Pixel 2 XL आणि Pixel 2

गूगल पिक्सल २ (Google Pixel 2) : नेक्सस मालिका बंद करून गूगलने नव्याने आणलेली पिक्सल मालिका म्हणावी तितकी यशस्वी झालेली नाही. आता या मालिकेत दोन नव्या फोन्सची भर पडली आहे. यामध्ये काही भन्नाट सुविधा देऊन गूगलने ग्राहकांना आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये जगातला सर्वोत्तम स्मार्टफोन कॅमेरा असल्याचं सांगितलं आहे. DxO Mark मध्ये सर्वाधिक ९८ गुण मिळाले आहेत (याच DxO मार्कमध्ये आयफोन ८ व गॅलॅक्सी एस ८ ला ९५ गुण आहेत!) दोन कॅमेरा देण्याचा नवा ट्रेंड सुरु झालेला असताना गूगलने मात्र एकच कॅमेरा व त्याला मशीन लर्निंगची जोड दिली आहे! तसेच यामध्ये फोन लॉक असताना कुठेही एखादे गाणे सुरु असल्यास त्याच नाव फोनवर झळकतं म्हणजे आपण नंतर ते गाणे पाहू/ऐकू शकतो! यामध्ये अमर्याद क्लाऊड स्टोरेज देण्यात आलं आहे! सोबत गूगल लेन्स, गूगल असिस्टंट, उत्तम स्पिकर्स यांची जोड आहेच! Meet Google Pixel 2 https://youtu.be/zpLVsR8cSFo

ओएस : अँड्रॉइड ओरिओ ८.०
डिस्प्ले : (Pixel 2) : 5.0″ FHD (1920 x 1080) AMOLED at 441ppi 16:9
डिस्प्ले : (Pixel 2 XL) : 6.0″ QHD+ (2880 x 1440) pOLED at 538ppi 18:9

कॅमेरा : 12.2MP, f/1.8 aperture, 4K @ 30fps, 720p @240fps
फ्रंट कॅमेरा : 8MP, f/2.4 aperture, 1080p @ 30fps
प्रॉसेसर : Qualcomm Snapdragon 835, Adreno 540 Octa-Core
रॅम : 4GB LPDDR4x RAM
स्टोरेज : 64GB / 128GB

बॅटरी : Pixel 2 2700 mAh आणि Pixel 2 XL 3520 mAh 

इतर : Aluminum unibody, IP67 water व dust resistant, USB-C, Bluetooth 5.0
किंमत : $649 (Pixel 2) आणि $849 (Pixel 2 XL)
गूगल पिक्सल भारतात २६ ऑक्टोबरपासून प्री ऑर्डरसाठी उपलब्ध : भारतीय किंमती खालीलप्रमाणे
Google Pixel 2 : 64GB ₹ ६१००० आणि 128GB ₹ ७००००  (१ नोव्हेंबरपासून दुकानात उपलब्ध)
Google Pixel 2 XL : 64GB ₹ ७३००० आणि 128GB ₹ ८२००० (१५ नोव्हेंबरपासून दुकानात उपलब्ध)

गूगल पिक्सलबुक Google Pixelbook : लॅपटॉप आणि टॅब्लेटचं मिश्रण असलेली क्रोमबुक म्हणजे पिक्सलबुक
मायक्रोसॉफ्ट आणि अॅपलनंतर आता गूगलनेही त्यांच्या लॅपटॉपला टचस्क्रिन व पेन इनपुट दिलं आहे! या पिक्सलबुकचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्ले स्टोर चालतं त्यामुळे सर्व अॅप्स लॅपटॉपवर मोठ्या स्क्रिनमध्ये पाहता/वापरता येतील!  सोबतच यामध्ये गूगल असिस्टंट सुद्धा आहे! यामध्ये गुगलची ChromeOS असून i5/i7 प्रॉसेसर,512GB SSD, 12.2″ स्क्रिन मिळेल. याची किंमत $999 ते  $1,649 पर्यंत आहे! याबरोबर पिक्सल नावाचा पेन (Wacom ने बनवललेला) स्वतंत्र विकत घेता येईल जो चित्र, एडिटिंगसाठी मदत करेल त्याची किंमत $99 असेल. एखाद्या चित्रावर गोल करताच त्याबद्दल माहिती सुद्धा दाखवली जाईल! https://youtu.be/umhPrOo47-A

गूगल होम मिनी Google Home Mini : गूगल होमच्या स्मार्ट होम मालिकेत ह्या छोट्याश्या उपकरणाची जोड मिळाली आहे! हा एक स्मार्ट होम असिस्टंट असून यामध्ये गूगल असिस्टंट जोडलेला आहे त्यामुळं आपण दिलेल्या आज्ञा जसे कि Play Music,Whats the weather today?, Alarm, लाइट्स, रीमोट कंट्रोल, सीसीटीव्ही कॅमेरा याच्याशी बोलून नियंत्रित करता येतात! याची किंमत 49$ (₹ ३२००) Meet Google Home Max | Big help meets big sound : https://youtu.be/jT13rEAq9d8

गूगल होम मॅक्स Google Home Max : हा आहे गुगलचा नवा स्मार्ट होम स्पीकर, स्मार्ट होम स्पीकर गूगल वॉइस असिस्टंट, साऊंड वुफर्स, स्मार्ट AI सुविधा उपलब्ध. ब्लुटुथ/ऑक्स केबल/गुगल कास्ट असे पर्याय उपलब्ध. गूगल होमची सर्व कामे करून उत्तम आवाजात ऐकवतो! किंमत $399 (₹ २६०००) Meet Google Home Max | Big help meets big sound : https://youtu.be/2_pE3f4lJio

पिक्सल बड्स Pixel Buds : कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले हे ईयरफोन जगातील ४० भाषांमध्ये लाईव्ह भाषांतर करतो! म्हणजे समोरचा माणूस त्याच्या भाषेतच बोलेल मात्र आपल्याला त्याच बोलणं भाषांतरित करून यामध्ये ऐकू येईल व आपलेही भाषांतरित होऊन त्याला ऐकायला जाईल! यामध्ये देखील Artificial Intelligence ची जोड देण्यात आली आहे! आहे न कमाल! यांची किंमत $159 (₹ ११०००)

गूगल क्लिप्स Google Clips : आपल्या घरातील घडामोडी कायम टिपत राहत त्या आठवणी जपण्यासाठी गुगलचा हवा नवा कॅमेरा जो कोठेही ठेऊन देता येतो. आपल्याला आवडतील अशा घडामोडी बनवून आपल्याला दाखवतो. हा कॅमेरा पालकांना समोर ठेऊन बनवण्यात आला आहे. यामध्ये सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश आहे! याची किंमत $249 (₹ १७०००) Meet Google Clips : https://youtu.be/JXh1yyvXpwo

डे ड्रीम व्हयू : हा एक VR हेडसेट असून उच्च प्रतीच्या फॅब्रिकपासून बनवलेला आभासी दुनियेची सफर करण्यासाठी बनवलेला हा हेडसेट $99 मध्ये मिळेल, पिक्सल सोबत सॅमसंग एस ८, LG V30 अशा फोन्सना देखील सपोर्ट करतो! Meet Google Daydream View https://youtu.be/PNBL2DpB1YE

Tags: AIAudioCamerasDaydream VRGoogleGoogle ClipsGoogle HomeLaptopsMachine LearningPixelPixelbookSmart HomeSmartphonesVR
ShareTweetSend
Previous Post

गोप्रो हीरो 6 व गोप्रो फ्युजन अॅक्शन कॅमेरा सादर

Next Post

एयरटेलचा १३९९ रुपयात 4G स्मार्टफोन! : कार्बन ए४०

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
ChatGPT India Plans Whats Included

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

August 19, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Next Post
एयरटेलचा १३९९ रुपयात 4G स्मार्टफोन! : कार्बन ए४०

एयरटेलचा १३९९ रुपयात 4G स्मार्टफोन! : कार्बन ए४०

Comments 2

  1. Ramesh B says:
    8 years ago

    उत्तम माहिती, सुंदर लेख असेच लिहीत रहा
    Google Pixel 2 भारतात आल्यावर पण माहिती द्या

    Reply
  2. GST Training Delhi says:
    8 years ago

    Blogging is that the new poetry. I notice it terrific and wonderful in some ways.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
microsoft 365 Office Icons 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

October 4, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

September 22, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

microsoft 365 Office Icons 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

October 4, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech