MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Security

डिलीट फेसबुक? : यूजर डाटाचा गैरवापर केल्याबद्दल फेसबुकवर आरोप!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 21, 2018
in Security, Social Media

केंब्रिज अनॅलिटिका नावच्या लंडनच्या कंपनीच्या अमेरिकेतील २०१६ च्या निवडणुकीदरम्यान फेसबुककडून तब्बल ५० मिलियन (५ कोटी) यूजर्सच्या डाटाचा गैरवापर झाल्यामुळे मोठा वादंग माजला आहे. फेसबुकवर नेहमीच प्रायव्हसीवरुन आरोप होत असतात मात्र यावेळी नक्कीच ते मोठ्या संकटात सापडले असून फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर गोपनीयतेच्या नियमांचं सर्रास होत असलेलं उल्लंघन या निमित्ताने बाहेर पडलं आहे.

हे प्रकरण इतक मोठ ठरलं आहे की खुद्द व्हॉट्सअॅपचे सह संस्थापक ब्रायन अॅक्टन यांनी ट्विटद्वारे चक्क फेसबुक डिलीट करण्याचं आवाहन केलं आहे! याप्रकरणी फेसबुक संस्थापक मार्क झकरबर्ग यांचीही चौकशी केली जाणार आहे! केंब्रिज अनॅलिटिका या डाटा मायनिंग आणि अनॅलिटिक्स कंपनीच्या सीईओचंसुद्धा लाच व गैरप्रकारामुळ निलंबन करण्यात आलं आहे! Aleksandr Kogan याने त्याच्या अॅप्लिकेशनद्वारे तब्बल  ३,००,००० फेसबुक यूजर आणि त्यांचे यांचा डेटा गोळा करून केंब्रिज अनॅलिटिकाला विकला. मात्र हे करताना केंब्रिज अनॅलिटिकाने अलेक्झांडरने गैरमार्गाने हा डेटा मिळवला असल्याचं ठाऊक झाल्यावर हा डेटा डिलीट केल्याचा दावा केला मात्र नव्या माहितीनुसार (न्यूयॉर्क टाइम्स) त्यांनी हा डेटा अजूनही डिलीट केला नव्हता. अर्थात केंब्रिज अनॅलिटिका हे आरोप आता फेटाळून लावत आहे म्हणून त्यांची चौकशी केली जात असून फेसबुकसुद्धा याबाबतीत अभ्यास करत आहे.     

ADVERTISEMENT

या सर्व डाटाच्या गैरवापरास बळी पडलेल्या यूजर्सच्या डाटामध्ये त्यांच्या नावे, आवडीनिवडी यांच्या माहितीचाही समावेश आहे! या गैरवापरामुळे फेसबुकचा वापर सरळसरळ लोकांच्या मतांवर परिणाम करणारी ठरत असल्यामुळे आणि याचा संबंध थेट अमेरिकेच्या निवडणुकांशी जोडला गेल्यामुळे प्रकरण आणखीच संशयास्पद ठरतं. फेसबुक यूजर्सचा डेटा गोळा करून तो स्वतःच्या फायद्यासाठी अथवा गैरवापरासाठी कंपन्याकडून विकला जात आहे अशा गोष्टी समोर आल्या आहेत. खरेतर हा डेटा केवळ यूजर आणि फेसबुक दोघांकडेच राहणे अपेक्षित आहे. मात्र अशा प्रकारे गैर वापर करून खोट्या बातम्या (फेक न्यूज पसरवणे), राजकीय पक्ष/उमेदवार यांना मदत करत मतदारांची दिशाभूल करणारा कंटेन्ट पसरवणे, यूजर्सच्या परवानगी शिवाय किंवा त्यांना माहिती न देता परस्पर डेटा विक्री करणे असे प्रकार घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच रशियन हॅकर लोकांनी अमेरिकन निवडणुकीवेळी असेच प्रयत्न फेसबुकद्वारे केल्याचं उघडकीस आलं आहे! काही महिन्यांपूर्वी भारतात पासवर्ड रिसेटसाठी आधार मागण्याचा प्रताप सुद्धा फेसबुकने केला होता विरोध सुरु होताच केवळ चाचणी होती असे जाहीर करून वेळ मारून नेली होती! या गोष्टींमुळे लोकशाही असलेल्या देशांमध्ये/ अशा प्लॅटफॉर्मवर मोठ्या अडचणी संभवतात…

दरम्यान फेसबुकच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली असून स्वतः मार्क झकरबर्गलासुद्धा अब्जावधीचा फटका बसला आहे! अनेकांनी या गोष्टीचा निषेध म्हणून फेसबुक डिलीट करण्यास सुरुवात केली असून इतरांनाही त्याबाबत आवाहन केलं जात आहे. भारतात केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही या गैरप्रकारात तथ्य आढळल्यास फेसबुकची चौकशी केली जाईल असं सांगितलं आहे. एव्हढं सगळं घडत असलं तरी प्रत्यक्षात फेसबुकच्या फारच कमी वापरकर्त्यांना याबाबत माहिती असून त्यामुळे जाणकारांनी या घडामोडींचा फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्रामच्या वापरकर्त्यांमध्ये फारसा परिणाम होणार नसल्याचं सांगितलं आहे.
या प्रकरणावर मार्क झकरबर्गकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे :

तुमचा डेटा आमची जबाबदारी आहे आणि जर ती आम्ही पार पाडू शकत नसू तर आम्हाला तुमची सेवा करण्याचा अधिकार नाही. होय आमची चूक झाली. आम्ही ही गोष्ट पुन्हा घडणार नाही यासाठी काय करता येईल हे पाहून त्या दृष्टीने पावले उचलली आहेत. यासंबंधी एक टूल न्यूज फीडवर दिसेल त्याद्वारे अॅप्सचा ऍक्सेस पाहता येईल. असा प्रकार यानंतर होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेऊ…   

इलॉन मस्क प्रमुख असलेल्या टेस्ला मोटर्स आणि स्पेसएक्स संस्थाची फेसबुक पाने डिलीट केली गेली आहेत ! डिलीट फेसबुक मोहिमेला इलॉन मस्कचाही पाठिंबा…!


फेसबुककडे तुमचा वैयक्तिक  डेटा कमीत कमी देण्यासाठी खालील बदल करून घ्या :

  • लोकेशन सर्व्हिस बंद करा 
  • Settings > Privacy मध्ये योग्य पर्याय निवडून माहिती स्वतःपुरतीच ठेवा 
  • Privacy Checkup करून घ्या (पर्याय सेटिंग्समध्ये उपलब्ध)
  • जाहिरातींसाठी तुमची माहिती देणं बंद करा : Facebook Ads Preferences
  • Settings > Apps तुम्हाला ठाऊक नसलेल्या/ महत्वाच्या नसलेल्या सगळ्या अॅप्सच्या permission/access revoke करा.   
search terms : Cambridge Analytica Facebook data privacy scandal Mark Zuckerberg
Tags: FacebookPrivacySecuritySocial Media
ShareTweetSend
Previous Post

PUBG आता अँड्रॉइड आणि iOS स्मार्टफोन्सवर उपलब्ध!

Next Post

अॅपलचा नवा आयपॅड सादर : 9.7 इंची आयपॅड आता अॅपल पेन्सिल सपोर्टसह!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Ronaldo YouTube Channel

फुटबॉलपटू रोनाल्डोचं यूट्यूब चॅनल : २४ तासात तब्बल २ कोटी सबस्क्रायबर्स!

August 22, 2024
MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

June 2, 2024
इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

April 19, 2024
Community Notes India

X (ट्विटर) वरील Community Notes आता भारतात उपलब्ध!

April 4, 2024
Next Post
अॅपलचा नवा आयपॅड सादर : 9.7 इंची आयपॅड आता अॅपल पेन्सिल सपोर्टसह!

अॅपलचा नवा आयपॅड सादर : 9.7 इंची आयपॅड आता अॅपल पेन्सिल सपोर्टसह!

Comments 1

  1. Ramesh says:
    7 years ago

    This again proves facebook lacks privacy for its users. There are many cambridge analytica out there

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025
मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

February 22, 2025
Apple iPhone 16e

ॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन

February 20, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

ॲपलचा iPhone 16e सादर : नवा स्वस्त (!) फोन

डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech