अॅपलचा नवा आयपॅड सादर : 9.7 इंची आयपॅड आता अॅपल पेन्सिल सपोर्टसह!

अॅपलने आज झालेल्या शैक्षणिक कार्यक्रमात नवा आयपॅड आणि इतर गोष्टींचं सादरीकरण केलं. नवा आयपॅड आता अॅपल पेन्सिल सपोर्टसह मिळेल! विद्यार्थ्यांसाठी $299 (~₹ २०,०००) या नेहमीपेक्षा कमी किंमतीत मिळेल! इतर ग्राहकांना याची किंमत $329 (~₹ २१,५००) असेल. अॅपल पेन्सिल स्वतंत्र विकत घ्यावी लागेल जी विद्यार्थ्यांना $89 तर इतर ग्राहकांना $99 मध्ये मिळेल! सोबत $49 मध्ये लॉजीटेकचा Crayon नावाचा स्टायलस सुद्धा सादर करण्यात आला आहे. या नव्या आयपॅडमध्ये AR साठी सुद्धा खास सोयींचा समावेश केला गेला असून त्यानुसार विद्यार्थ्यांना या सोयींद्वारे अभ्यास करणं अधिक सोपं जाईल. या नव्या आयपॅडमध्ये जुन्या आयपॅडच्या मानाने बऱ्याच सोयी (ProMotion, True Tone, Smart Connector, OIS, 4K video) दिल्या गेल्या नाहीयेत अशीही तक्रार ऐकायला मिळत आहे.
डिस्प्ले : 9.7" Retina Display 2048x1536 resolution at 264 ppi
प्रॉसेसर : A10 Fusion Chip 
ऑपरेटिंग सिस्टम : iOS 11
कॅमेरा : 8MP (1080p Video Recording) ƒ/2.4 aperture
फ्रंट कॅमेरा : 1.2MP ƒ/2.2 aperture (FaceTime)
बॅटरी : १० तासांचा बॅटरी बॅकअप !
स्टोरेज : 32GB/128GB
इतर : GPS, Gyroscope, 300Mbps LTE, Apple Pencil Support, Accelerometer, Bluetooth 4.2, Touch ID

search terms apple ipad 9.7 2018 with apple pencil support
अॅपलचा नवा आयपॅड सादर : 9.7 इंची आयपॅड आता अॅपल पेन्सिल सपोर्टसह! अॅपलचा नवा आयपॅड सादर : 9.7 इंची आयपॅड आता अॅपल पेन्सिल सपोर्टसह! Reviewed by Sooraj Bagal on March 27, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.