गूगल Areo सेवा आता पुण्यात उपलब्ध : घरगुती सेवा आणि फूड डिलिव्हरी!

गूगलने काही महिन्यांपूर्वी एरीओ नावाचं अॅप सादर केलं होतं ज्याद्वारे फूड डिलिव्हरी सोबत घरगुती कामे करण्यासाठी स्थानिक जसे की प्लंबर, एलेक्ट्रिशियन, पेंटर, स्वच्छता कामगार यांची सेवा घरपोच मिळवता येते!  ही सेवा बेंगळुरू, मुंबई शहरात प्रथम सुरू करण्यात आली होती त्यानंतर दिल्ली, गुरुग्राम व आता पुणे शहरात सुद्धा ही सेवा उपलब्ध झाली आहे!
डाऊनलोड लिंक : Google Areo on Google Play
या सेवेद्वारे घरी जेवण/पदार्थ मिळवण्यासाठी Faasos, Behrouz Biryani, OvenStory, Box8, MojoPizza, Zimmber तर प्लंबर, एलेक्ट्रिशियन, पेंटर, स्वच्छता कामगार अशा सेवांसाठी Timesaverz and Mr. Right यांच्याशी भागीदारी करण्यात आली आहे! पैसे देण्यासाठी नेटबँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड, कॅश ऑन डिलिव्हरी असे अनेक पर्याय आहेत
Download Areo

search terms google areo pune mumbai food delivery home utility services electricians, painters, cleaners, plumbers
गूगल Areo सेवा आता पुण्यात उपलब्ध : घरगुती सेवा आणि फूड डिलिव्हरी! गूगल Areo सेवा आता पुण्यात उपलब्ध : घरगुती सेवा आणि फूड डिलिव्हरी! Reviewed by Sooraj Bagal on March 06, 2018 Rating: 5

1 comment:

  1. Hi, extremely nice effort. everybody should scan this text. Thanks for sharing.

    ReplyDelete

Powered by Blogger.