हुवावे P20 Pro सादर : तीन कॅमेरा (त्यातील एक 40MP) असलेला पहिलाच फोन

Huawei P20 Pro
अलीकडे सुरु झालेला ड्युअल कॅमेराचा ट्रेंड आता कुठे स्वस्त स्मार्टफोनमध्ये शिरू लागला आहे तोवर हुवावे (Huawei) या चिनी कंपनीने फोनच्या मागे तीन कॅमेरा असलेला फोन सादर केला आहे!  यांचं वैशिष्ट्य म्हणजे यातील एक कॅमेरा तब्बल ४० मेगापिक्सलचा आहे! उर्वरित दोन कॅमेरा 20MP आणि 8MP असे आहेत. DxO मार्क या कॅमेराच्या रेटिंग संस्थेने १०९ रेटिंग दिलं आहे! कॅमेरा सोबत AI (कृत्रिम बुद्धिमत्ते)ची जोड दिली आहे.
डिस्प्ले : 6.1" OLED, FHD 1080 x 2240, 408 PPI
प्रोसेसर : HUAWEI Kirin 970
ऑपरेटिंग सिस्टिम : अँड्रॉइड 8.1 Android Oreo
रॅम : 6GB स्टोरेज: 128GB
कॅमेरा :  Tri-lens 40MP (RGB, f/1.8 aperture) + 20MP (Monochrome, f/1.6) + 8MP (Telephoto, f/2.4)
फ्रंट कॅमेरा : 24 MP, f/2.0 aperture
बॅटरी : 4000mAh

हुवावेने आणखी एक सोय दिली आहे ती म्हणजे नॉच लपवण्याचा पर्याय ज्यामुळे स्क्रिनच्या वरच्या मधल्या भाग काही भागाऐवजी पूर्ण व्यापून टाकता येतो!

search terms : huawei p20 pro 40MP tri lens camera
हुवावे P20 Pro सादर : तीन कॅमेरा (त्यातील एक 40MP) असलेला पहिलाच फोन हुवावे P20 Pro सादर : तीन कॅमेरा (त्यातील एक 40MP) असलेला पहिलाच फोन Reviewed by Sooraj Bagal on March 27, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.