स्टेट बँक ऑफ इंडिया आणि रिलायन्स जिओ यांची डिजिटल भागीदारी!

भारतातील सर्वात मोठी बँक SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) आणि रिलायन्स जिओ एकत्रितपणे त्यांची डिजिटल भागीदारी वाढविण्यावर भर देणार असून याअंतर्गत SBI च्या YONO अॅपमधील सोयी उदा. डिजिटल बँकिंग, पेमेंट, कॉमर्स या  My Jio अॅपवर सुद्धा मिळणार आहेत. SBI ने मागील वर्षी YONO (You Only Need One) हे अॅप लाँच केले ज्याअंतर्गत डिजिटल बँकिंग, शॉपिंग, Fiancial प्रॉडक्टस अशा सर्व सोयी एकाच ठिकाणी मिळवता येतात.

या भागीदारीमधून जिओ आणि SBI च्या ग्राहकांना फायदा होईल. जिओ प्राइमकडून रिलायन्स रिटेल, जिओ, आणि पार्टनर ब्रॅण्ड्स वर खास ऑफर मिळतील. तसेच SBI रिवॉर्ड्स (SBI चा लॉयल्टी प्रोग्रॅम) आणि जिओ प्राइम ग्राहकांना अधिक लॉयल्टी पॉईंट्स तसेच ते पॉईंट्स वापरण्यासाठी रिलायन्स, जिओ आणि त्यांच्या ऑनलाईन व ऑफलाईन पार्टनर स्टोअर्सवर पर्याय दिले जातील.

SBI त्यांच्या नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी सोल्युशन्ससाठी जिओला अग्रक्रम देईल. त्याचप्रमाणे जिओच्या शहरी त्याचबरोबर ग्रामीण भागात असणाऱ्या नेटवर्कमुळे SBI त्याचा वापर करून व्हिडिओ बँकिंग, ऑन डिमांड सर्व्हिसेस सारख्या सुविधा ग्राहकांना देईल. 
अधिकृत माहिती : SBI and Jio
तसेच जिओ फोन्स सुद्धा SBI ग्राहकांना खास ऑफर्स मध्ये मिळतील. रिलायन्सच्या जिओ पेमेंट बँकमध्ये एसबीआयचा सुद्धा ३० टक्के हिस्सा आहे


स्टेट बँक ऑफ इंडिया आणि रिलायन्स जिओ यांची डिजिटल भागीदारी! स्टेट बँक ऑफ इंडिया आणि रिलायन्स जिओ यांची डिजिटल भागीदारी! Reviewed by Swapnil Bhoite on August 04, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.