MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

विवो V11 Pro सादर : डिस्प्लेखालीच फिंगरप्रिंट असलेला आणखी एक फोन!

Swapnil Bhoite by Swapnil Bhoite
September 7, 2018
in स्मार्टफोन्स

विवोकडून आज त्यांच्या V मालिकेतील V11 Pro हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी सादर केलेला विवो नेक्स स्मार्टफोन, त्यातील नवीन गोष्टी जश्या की पुढील बाजूस पूर्णत: डिस्प्ले, डिस्प्लेखालीच फिंगरप्रिंट, फोनमधून वर येणारा फ्रंट कॅमेरा यांमुळे चर्चेचा विषय बनला होता.

V11 Pro मध्ये सुद्धा डिस्प्लेखालीच फिंगरप्रिंट स्कॅनरचा समावेश असून कमी आकारातील नॉच आहे त्याचबरोबर खूपच लहान बेझल असतील. ९१.२७% स्क्रीन टू बॉडी रेशो, नेक्सच्या तुलनेत ५०% अधिक अचूक इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, ड्युअल पिक्सेल सेन्सर, बोके इफेक्ट, AI फेस अनलॉक, FunMoji, फास्ट चार्जिंग यांसारखे फिचर्स यामध्ये आहेत.

२०१७ ते २०१८ च्या दुसऱ्या तिमाही पर्यंत विवो मार्केट शेअरनुसार पहिल्या दोन  ब्रँडमध्ये असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. V11 Pro हा सुद्धा मेड इन इंडिया अंतर्गत असून ग्रेटर नोएडा मधील फॅक्टरीमध्ये मॅन्युफॅक्चर केला जाईल.

V11 Pro Specifications 

डिस्प्ले : 6.41 inch (2340х1080) FHD+ 19.5:9 FullView Display 3.0
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 660 AIE Octa Core
रॅम : 6GB
स्टोरेज : 64GB (Expandable Upto 256GB)
बॅटरी : 3400 mAh Battery with Fast Charging
ऑपरेटिंग सिस्टिम : Funtouch OS 4.5 (Based on Android Oreo 8.1)
कॅमेरा : 12MP + 5MP (f/1.8 + f/2.4) Dual Pixel Rear Camera
फ्रंट कॅमेरा : 25MP (f/2.0)
रंग : Starry Night, Dazzling Gold
सेन्सर : In-Display Fingerprint Scanner, Ambient Light Sensor, Proximity Sensor, Accelerometer, E-compass,
इतर : USB 2.0, Dual Sim + MicroSD Card slot, 3.5mm Audio Jack, Bluetooth 5.0, 2.5 D Glass, GPS/GLONASS/Beidou
किंमत – ₹२५,९९०
लिंक – Amazon / V11 Pro

व्हिडीओ : https://youtu.be/TlG4zZu1amk

१२ सप्टेंबर  रोजी पहिला सेल असून आजपासून प्री बुकसाठी अॅमॅझॉन व विवो इंडियाच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल. याबरोबरच खरेदीवर HDFC बँकेतर्फे २००० कॅशबॅक, जिओतर्फे ऑफर तसेच  स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफर यांचा समावेश आहे.

ADVERTISEMENT
Tags: SmartphonesVivo
Share12TweetSend
Previous Post

गूगल असिस्टंट मराठी भाषेत कसा वापरायचा ?

Next Post

गूगलचं शास्त्रज्ञांसाठी नवं सर्च इंजिन : डेटासेट शोधणं सोपं!

Swapnil Bhoite

Swapnil Bhoite

Related Posts

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

February 7, 2023
Samsung Galaxy S23

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

February 1, 2023
Redmi Note 12 Series

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

January 5, 2023
गूगलचे Pixel 7 & 7 Pro सादर : भारतातही मिळणार!

गूगलचे Pixel 7 & 7 Pro सादर : भारतातही मिळणार!

October 6, 2022
Next Post
गूगलचं शास्त्रज्ञांसाठी नवं सर्च इंजिन : डेटासेट शोधणं सोपं!

गूगलचं शास्त्रज्ञांसाठी नवं सर्च इंजिन : डेटासेट शोधणं सोपं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!