गूगलचं शास्त्रज्ञांसाठी नवं सर्च इंजिन : डेटासेट शोधणं सोपं!

गूगलच्या या नव्या सेवेच नाव डेटासेट सर्च असं असून गूगल स्कॉलरच्या प्रकारात मोडणारी ही सेवा विद्यापीठं, सरकारी संस्था यांनी प्रकाशित केलेला डेटा मेटाडेटा टॅग्स वापरून सहज शोधण्यायोग्य बनवेल ज्यामुळे संबंधित माहिती हवी आहे (शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, पत्रकार) अशा सर्वाना  त्यांना एकाच जागी मिळवता येईल! ही माहिती गूगलच्या डेटामध्ये इंडेक्स करून नॉलेज ग्राफला जोडली जाईल. ज्यामुळे माहिती प्रकाशित करणाऱ्या संस्थेबद्दलसुद्धा माहिती मिळवता येईल! या सेवेची चाचणी प्रक्रिया सुरु आहे.
Google Dataset Search Link : http://g.co/datasetsearch
सद्यस्थितीत अशा प्रकारचा डेटा साठवण्याची पद्धत विखुरलेली आहे.  अनेकविध साईट्स उपलब्ध आहेत पण त्यापर्यंत पोहोचणं किंवा त्यांना शोधणं काहीसं अवघड काम आहे. म्हणूनच गूगल याबाबत प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे मात्र यासाठी जे लोक अशा प्रकारचं साहित्य इंटरनेटवर प्रकाशित करतात त्यांनीसुद्धा प्रकाशित करताना योग्य टॅग्सचा वापर करायला हवा आहे. डेटाच्या बाबतीत गूगल दिवसेंदिवस अधिकाधिक प्रयत्न करत असून लोक नवनव्या टूल्सचा जितका जास्त वापर करतील तितक्या प्रमाणात त्यांना ह्या डेटाच वर्गीकरण करणं सोपं जातं. हा डेटा प्रबंध, संशोधन, सांख्यिकी अशा कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो.  शास्त्रज्ञाना यापूर्वी अशी एका ठिकाणी माहिती मिळवणं सोपं नव्हतं एका ठराविक विषयाला वाहिलेल्या साईट खेरीज अधिक माहिती मिळवायला सर्व सर्च पुन्हा सुरु करावा लागायचा. मात्र या डेटासेट सर्चद्वारे हा त्रास काही प्रमाणात कमी होईल असा विश्वास गूगलला वाटतो आहे.

search terms : Google Dataset Search for Scientists query scientific data, government data, or data provided by news organization marathi
गूगलचं शास्त्रज्ञांसाठी नवं सर्च इंजिन : डेटासेट शोधणं सोपं! गूगलचं शास्त्रज्ञांसाठी नवं सर्च इंजिन : डेटासेट शोधणं सोपं!     Reviewed by Sooraj Bagal on September 07, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.