नोकिया ७.१ स्मार्टफोन सादर : सोबत ट्रू वायरलेस इअरपॉड्स


लंडन येथे झालेल्या कार्यक्रमात नोकियातर्फे नोकिया ७.१ स्मार्टफोन तसेच दोन ऑडियो प्रॉडक्ट्स लाँच करण्यात आले आहेत. नोकिया ७.१ हा या वर्षीच सादर करण्यात आलेल्या नोकिया ७ प्लसचे पुढील व्हर्जन आहे. नोकिया ७.१ मध्ये HDR सपोर्ट देण्यात आला असून SDR मधून HDR मध्ये कन्टेन्ट कन्व्हर्ट करून सुद्धा दाखवला जाणार आहे जेणेकरून आणखी चांगला अनुभव येईल, यासाठीच नोकियाने पिक्सेल वर्क्स कंपनीशी सुद्धा पार्टनरशीप केली आहे.

नोकिया ७.१ मध्ये ZEISS ऑप्टिक्सचा समावेश आहे. त्याचबरोबर सनलाईट रिडेबीलिटी, Bokeh Effect, Pro Camera  यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत तसेच हा फोन Android Enterprise Recommended आहे. अशा फोन्सना रेग्युलर सिक्युरिटी पॅच ९० दिवसांमध्ये दिले जातात तसेच या फोन्सना कमीतकमी एक ओएस अपडेटची हमी दिली जाते.Nokia 7.1 Specifications
डिस्प्ले : 5.84 inch (2280х1080) FHD+ 19:9 Pure Display with Notch + HDR10 Support
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 636
रॅम : 3/4GB
स्टोरेज : 32/64GB (Expandable Upto 400GB)
बॅटरी : 3060 mAh Battery
ऑपरेटिंग सिस्टिम : Android Oreo 8.1
कॅमेरा : 12 MP(f1.8) + 5MP f(2.4)
फ्रंट कॅमेरा : 8 MP (f/2.0)
रंग : Gloss Midnight Blue, Gloss Steel
सेन्सर : Fingerprint Reader (On the Back), Ambient Light Sensor, Proximity Sensor, Accelerometer, E-compass, Gyroscope
इतर : USB Type-C, GPS/AGPS+GLONASS, 3.5mm Audio Jack, Bluetooth 5.0, Gorilla Glass 3
किंमत - €299-€349

नोकिया ७.१ उद्यापासून यूरोप मध्ये उपलब्ध होणार असून पुढील आठवड्यापासून जगभरात उपलब्ध होईल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. भारतातील किंमत आणि उप्लब्धतेबद्दल काही दिवसांत सांगण्यात येईल.

याबरोबरच कोणत्या नोकिया फोन्ससाठी केव्हा अँड्रॉइड पाय अपडेट मिळेल याबद्दलही नोकिया कडून माहिती देण्यात आली असून Snapdragon 600 सिरीज प्रोसेसर असणाऱ्या फोन्सना लवकरच अपडेट दिला जाईल. नोकिया ६.१ व नोकिया ६.१ प्लसला ऑक्टोबर मध्ये अपडेट उपलब्ध करून दिले जाईल तर नोकिया ८ व नोकिया ८ सिरोकोला नोव्हेंबर मध्ये अपडेट मिळेल.
नोकिया ट्रू वायरलेस इअरपॉड्स व नोकिया प्रो वायरलेस इअरफोन्स सुद्धा यावेळी सादर करण्यात  आले आहेत. नोकिया ट्रू वायरलेसमध्ये जवळपास ३.५ तास ऑडियो ऐकता येतील तर प्रो मध्ये १० तासांपर्यंत प्ले बॅक टाईम मिळेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. नोकिया ट्रू वायरलेस इअरपॉड्स €129 तर प्रो € 69 मध्ये मिळतील.
search terms : nokia 7.1 plus true wireless headphones marathi
नोकिया ७.१ स्मार्टफोन सादर : सोबत ट्रू वायरलेस इअरपॉड्स नोकिया ७.१ स्मार्टफोन सादर : सोबत ट्रू वायरलेस इअरपॉड्स Reviewed by Swapnil Bhoite on October 05, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.