विवोच्या Y मालिकेतील Y95 सादर


विवोकडून आज त्यांच्या Y मालिकेतील Y95 स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे.  हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल, अॅमॅझॉन बरोबरच विवो स्टोअरवर विक्रीस उपलब्ध करण्यात आला आहे. सोबतच हा स्मार्टफोन ऑफलाईन मार्केटमध्ये सुद्धा उपलब्ध असेल. या स्मार्टफोनद्वारे सध्या उपलब्ध असणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये विवोतर्फे आणखी भर पडली आहे.

विवो Y95 मध्ये स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसरचा समावेश असून Halo FullView HD+ डिस्प्ले, मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर अशा गोष्टींचा समावेश आहे. याबरोबरच ड्युअल कॅमेरा, AI सेल्फी लाइटनिंग, AR सेल्फी स्टिकर, बोके मोड, फेस अनलॉक, AI गेम मोड,  अधिक क्षमतेची बॅटरी यांसारख्या सुविधा असतील. सोबतच ड्युअल सिमसोबत 256GB पर्यंत मेमरी वाढविण्यासाठी अधिकचा स्लॉट उपलब्ध असेल.


Vivo Y95 Specs :

डिस्प्ले : 6.22inch (1520х720) HD+ Halo FullView Display 
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 439
रॅम : 4GB
स्टोरेज : 64GB (Expandable Upto 256GB)
बॅटरी : 4030 mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : Funtouch OS 4.5 (Based on Android Oreo 8.1)
कॅमेरा : 13MP + 2MP
फ्रंट कॅमेरा : 20MP
रंग : Starry Black, Nebula Purple
सेन्सर : Fingerprint Scanner, Ambient Light Sensor, Proximity Sensor, Accelerometer, E-compass, Gyroscope
इतर : USB 2.0,  Dual Sim + MicroSD Card slot, 3.5mm Audio Jack, Bluetooth 4.2, GPS/BeiDou/GLONASS, OTG Support
बॉक्समध्ये : Vivo Y95 /USB  Power adapter / USB 2.0 cable / Warranty card / User Manual /Protective Case / SIM Insertion tool / Earphone
किंमत – ₹१६,९९०
लिंक - Amazon / Flipkart / Vivo Store

विवोच्या Y मालिकेतील Y95 सादर विवोच्या Y मालिकेतील Y95 सादर Reviewed by Swapnil Bhoite on November 26, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.