गूगल ट्रान्सलेट वेबसाईट आता नव्या रूपात!

गूगलने त्यांच्या भाषांतर करणारी सेवा गूगल ट्रान्सलेटला आता नवं रूप दिलं असून आता वेगळं डिझाईन असलेली ही वेबसाईट उपलब्ध झाली आहे. नवी वेबसाईट रेस्पॉन्सिव्ह प्रकारची असून यामुळे आपण ब्राउजर कशाही प्रकारे resize केला तरी साईट त्या आकाराला साजेसं डिझाईन आपोआप समजून घेऊन दाखवेल! आता सेव्ह केलेल्या भाषांतराला लेबल लावणं आणि ते पाहणं सोपं झालं आहे.
 
नव्या बदलांबद्दल अधिकृत माहिती : 
गूगल ट्रान्सलेट सादर होऊन आता १२ वर्षं झाली असून आधी केवळ इंग्लिश ते अरेबिक असलेली ही सुविधा आता १०३ भाषांमध्ये उपलब्ध आहे! गूगल ट्रान्सलेट आता वर्षाला तब्बल तीस लाख कोटी वाक्य भाषांतरित करत आहे! ही एक महत्वाची सोय झाली असून आम्ही ही वेबसाईट वापरणं अधिक सोपं व्हावं यासाठी नवे बदल केले आहेत.

  • नवं रूप गूगलच्या इतर उत्पादनांशी साधर्म्य साधणारा असेल ज्यामध्ये लेबल करणं आणि सुटसुटीत अक्षरांचा वापर केला आहे. उदा गूगलवर आधीपासून डॉक्युमेंट अपलोड करण्याची असलेली सोय आता सहज सापडेल अशी बदलण्यात आली आहे. 
  • आता भाषांतरं सेव्ह करणं आणि त्यांची वर्गवारी करणंसुद्धा सोपं झालं आहे. नियमित वापर होत असलेली भाषांतरे लेबल लावून ठेवता येतील तसेच त्यांची अनेक भाषानुसार वर्गवारी पण शक्य आहे. 
  • वेबसाईट आता रेस्पॉन्सिव्ह असून यामुळे स्क्रिनच्या आकारानुसार वेबसाईटसुद्धा डिझाईन बदलेल आणि त्या आकाराला सहज दिसेल अशा स्वरूपात मोबाईल, टॅब्लेट व लॅपटॉपवर वेबसाईट वापरता येईल!
नवं डिझाईन पाहण्यासाठी लिंक : translate.google.com
अधिकृत माहिती : A new look for Google Translate on the web
गूगल ट्रान्सलेट वेबसाईट आता नव्या रूपात! गूगल ट्रान्सलेट वेबसाईट आता नव्या रूपात! Reviewed by Sooraj Bagal on December 01, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.